वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१ पृ. ३२
  • तारुण्यात जू उचलणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तारुण्यात जू उचलणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१ पृ. ३२

तारुण्यात जू उचलणे

या ‘शेवटल्या कठीण दिवसांत’ तरुण मुले फार मोठ्या दबावांना सामोरे जातात. (२ तीमथ्य ३:१) अनैतिकता, धूम्रपान आणि इतर विनाशकारी वर्तन आत्मसात करण्यासाठी त्यांच्यावर अनेक मतांचा भडिमार करण्यात येतो. बायबलच्या दर्जांनुसार आपले जीवन कंठणारे जेव्हा लोकांच्या मर्जीप्रमाणे वागण्यास नकार देतात तेव्हा त्यांचा उपहास केला जाऊ शकतो आणि काही ख्रिश्‍चनांना कदाचित असेही वाटेल, की त्यांच्यासमोर हात टेकणेच सोपे आहे.

सा.यु.पू. सातव्या शतकाच्या शेवटास यिर्मयाने लिहिले: “मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.” (विलापगीत ३:२७) असे म्हणण्यामागे त्याचा काय अर्थ होता? एखादा इसम त्याच्या तारुण्यात संकटांना तोंड देण्याचे शिकतो तेव्हा तो त्याच्या प्रौढावस्थेत येणाऱ्‍या आव्हानात्मक परिस्थितींना तोंड देण्याचे देखील शिकत असतो. विपत्ती कोणालाच आवडत नाहीत तरी देखील ख्रिस्ती तरुणांना आणि प्रौढांना देखील त्यांना सामोरे जावे लागतेच. (२ तीमथ्य ३:१२) परंतु, हातमिळवणी केल्यामुळे जरी तात्पुरती सुटका झाली तरी विश्‍वासू राहिल्यामुळे मिळणारे लाभ त्यापेक्षाही अधिक आहेत.

तुम्ही तरुण असल्यास विश्‍वासाच्या परीक्षांना प्रामाणिकपणे तोंड द्या. गैरवर्तन करण्यासाठी तुमच्यासमोर पाश येतो तेव्हा हातमिळवणी करू नका. त्या क्षणी असे करणे कदाचित कठीण असले तरी सुद्धा असे केल्यामुळे तुमच्या पुढील जीवनात इतक्या चिंतेच्या बाबी येणार नाहीत. येशूने अभिवचन दिले: “माझे जू आपणावर घ्या . . .  म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२९, ३०.

बायबलच्या दर्जांनुरूप जगण्याचे आव्हान स्वीकारा. असे केल्याने तुम्ही सध्या अगदी उत्तम जीवन जगू शकाल आणि भवितव्याची निश्‍चित खात्री देखील तुम्हाला मिळेल. बायबल म्हणते त्याप्रमाणे, “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा