वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१ पृ. ६
  • ‘आपल्याला प्रामाणिक लोक हवेत’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘आपल्याला प्रामाणिक लोक हवेत’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • सर्व गोष्टींत प्रामाणिकपणे वागा!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • सर्व बाबतीत प्रामाणिक असा
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • प्रामाणिक असणे याचा काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • ‘ते आपल्या धार्मिक शिक्षणाचे पालन करतात’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१ पृ. ६

‘आपल्याला प्रामाणिक लोक हवेत’

आजच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ आहे. पण, ख्रिश्‍चनांकडून केलेली ही मूलभूत अपेक्षा आहे. पौलाने लिहिले: “सर्व बाबतीत चांगले [“प्रामाणिकपणे,” NW] वागण्याची आमची इच्छा” आहे. (इब्री लोकांस १३:१८) इटलीतील फायेन्झामधील यहोवाची साक्षीदार असलेल्या विल्मा नामक स्त्रीची नेमके हेच करण्याची इच्छा होती.

एल्‌ रेस्तो देल कॅर्लिनो हे वृत्तपत्र त्यांच्याविषयी अहवाल देते, की त्यांना शहरातील सुपरमार्केटच्या बाहेर पैशाचे एक पाकीट सापडले त्यात पुष्कळ पैसे होते तरी देखील “मन कोणत्याही प्रकारे विचलित न करता” त्यांनी ते पैशाचे पाकीट ज्याचे असेल त्याला परत करता यावे म्हणून पोलिसांच्या स्वाधीन केले.

नगराध्यक्षकांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी विल्मा यांना आभारप्रदर्शनाचे एक पत्र पाठवले. त्यांनी त्यात लिहिले: “तुम्ही जे काही केले त्याचे मी या शहराच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या आदर्श फायेन्झा शहराला चांगल्या आणि प्रामाणिक लोकांची गरज आहे.”

चांगली कामे लोकांना कळून येवोत अगर न येवोत आपण नेहमीच प्रामाणिक असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पवित्र शास्त्रवचने आपल्याला असा बोध करतात, “केवळ देवाच्याच नव्हे तर मनुष्यांच्याही दृष्टीने जे योग्य तेच करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.”—२ करिंथकर ८:२१, कॉमन लँग्वेज भाषांतर.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा