अशा दृश्यांपासून आपली कधीतरी सुटका होईल काय?
आजकाल जेथे जावे तेथे ताण, संघर्ष आणि युद्धाचे दृश्य आपल्या नजरेस पडतात. परंतु, तुम्हाला आधीच माहीत असलेल्या सर्व वाईट बातम्यांमध्ये आणखीन भर घालणे हा या नियतकालिकाचा उद्देश नाही. उलटपक्षी, हा खास अंक, कमीतकमी दोन सांत्वनदायी सत्यांचा तुम्हाला परिचय करून देईल. पहिले असे की, बायबलमधील प्राचीन भविष्यवाण्यांनी आपल्या युगातील बहुतेक धक्कादायक वाईट बातम्या वास्तविकतः भाकीत केल्या होत्या; दुसरे असे की, भविष्यवाणीचे हेच पुस्तक अशा एका दिवसाविषयी भाकीत करते जेव्हा, येथे दाखवलेल्या चित्रातील साधर्म्य दृश्ये इतिहासजमा होतील. युद्धे नाहीत. बाँबफेक नाही, दबा धरून बसून गोळी घालणारे नाहीत, भू-सुरुंग नाहीत अथवा दहशतवादही नाही. अनाथ किंवा बेघर झालेले पीडित निर्वासितही नाहीत. मनाला दिलासा देणारे, खऱ्या शांतीचे जग. असा एक काळ पाहण्याची तुमची इच्छा आहे का? बायबल काय सांगते ते विचारात घेण्याचा आम्ही तुम्हाला आर्जव करतो. तुम्ही कदाचित कधी विचारही केला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला यामध्ये सांत्वन मिळेल.