४०३ वर्षांचा विवाह धोक्यात आहे
चर्च आणि राजसत्तेने, स्वीडनमध्ये ४०० हून अधिक वर्षे एका निकटच्या ऋणानुबंधाचा आनंद लुटला आहे. आता मात्र धर्म आणि सरकार यांच्यातले विवाहबंधन नाजूक होत आहे.
सन १५९३ साली एक राजकीय धर्म म्हणून लुथेरनिझमची प्रस्थापना झाली; स्वीडनचे सर्व रहिवाशी बाप्तिस्माप्राप्त सदस्य असणे आवश्यक होते. यामध्ये कित्येक वर्षांनंतर, म्हणजे १८५० च्या दशकादरम्यान एक तडजोड करण्यात आली. स्वीडनच्या रहिवाशांना बाप्तिस्माप्राप्त असणे आता आवश्यक नव्हते; तथापि, ते अद्यापही लुथेरन चर्चचे सदस्य म्हणून गणले जात होते. या नात्याने, ज्यावर कर लावला जातो अशा आपल्या प्राप्तीतून १ टक्का भाग, मदत म्हणून चर्चला देणे तसेच चर्चने पुरवलेल्या काही नागरी सेवांकरता देणे त्यांना आवश्यक होते. अलीकडेच आणखी एक बदल करण्यात आला. १९५२ सालाच्या सुरवातीस, स्वीडनचे रहिवासी कायदेशीररित्या चर्चमधून आपले सदस्यत्व काढून घेऊ शकत होते आणि परिणामी, चर्चचा बहुतांश कर भरण्याच्या बंधनातून ते मुक्त होऊ शकत होते.
अलीकडील वर्षांत, स्वीडनवरील लुथेरन चर्चची पकड सैल होत चालली आहे. हे अपरिहार्य होते, कारण स्वीडनचे १० टक्के रहिवासी गैर-लुथेरन आप्रवासी आहेत; यात ज्यू, कॅथलिक व मुस्लिम लोकांचाही समावेश आहे. म्हणूनच, १९९६ सालाच्या सुरवातीस स्वीडनचे केवळ ८६ टक्के रहिवासी लुथेरन चर्चचे सदस्य होते व ही संख्या सातत्याने घटत आहे.
वाढत असलेले औदासिन्य, चर्च व राजसत्ता यांच्यामध्ये एक खोल दरी निर्माण करत आहे. आधीच अशी घोषणा करण्यात आली आहे, की राजाने लुथेरन असणे आवश्यक नाही तसेच लुथेरन पालकांना झालेली मुले देखील आपोआप लुथेरन राजकीय चर्चचे सदस्य बनत नाहीत. पुढे, द डालस मॉर्निंग न्यूझ यानुसार, २००० सालापर्यंत, “स्थानिक पॅरिशांनी आणि राजसत्तेने किंमत ठरवून भरघोस संपत्तीची वाटणी करावी. यातून चर्चने १६८ कोटी डॉलरचे वार्षिक बजेट कमी करावे ज्यातील बहुतेक भाग कराच्या रूपात गोळा केला आहे.” हे शतक उलटल्यानंतर, चर्च आपल्या स्वतःच्या बिशपांची नेमणूक करील.
ख्रिस्ती धर्मजगताला, औदासिन्य व अपघटित सदस्यत्व पछाडत असता स्वीडनमधील यहोवाच्या साक्षीदारांची मात्र सातत्याने भरभराट होत आहे. १९९७ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक अहवाल पुस्तक (इंग्रजी) अहवाल देते, की त्या राष्ट्रात २४,४८७ देव राज्याचे प्रचारक आहेत आणि जवळजवळ १० टक्के पूर्ण वेळेचे पायनियर सेवक या नात्याने प्रचार करत आहेत. यांच्यापैकी अनेक जण सेवेच्या अधिक मोठ्या विशेषाधिकारांकरता आटोकाट प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ, १९९५ मधील यहोवाच्या साक्षीदारांच्या जिल्हा अधिवेशनांदरम्यान, २० वैवाहिक दांपत्यांनी वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या मिशनरी प्रशिक्षणासाठी आपले अर्ज सादर केले. त्यावेळी, आधीच्या वर्गांतले सुमारे ७५ स्वीडिश पदवीधर जगाच्या वेगवेगळ्या भागांत मिशनरी सेवेत कार्यरत होते. निःशंकपणे, त्यांचे उत्तम उदाहरण व प्रोत्साहनदायक पत्रे आणि भेटी यांचा, हा महान विशेषाधिकार प्राप्त करण्याचा सध्या विचार करत असलेल्यांवर उत्तेजनात्मक प्रभाव पडतो.
यास्तव, ख्रिस्ती धर्मजगतातील लक्षावधी लोक भग्न हृदयाने पीडित होत असता यहोवाचे साक्षीदार मात्र ‘हर्षित चित्ताने जयजयकार करतात.’—यशया ६५:१३, १४.
[३० पानांवरील चित्र]
स्वीडन