कोणाच्या कह्यात आहे?
”जगावर कोण अधिपत्य गाजवतो?” एखाद्याने तुम्हाला हा प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय उत्तर दिले असते? या प्रश्नाचे उत्तर बहुतेक धार्मिक लोक “देव” किंवा “येशू” असे देतील. द फ्रीपोर्ट न्यूज, या बहामियन वृत्तपत्रातील लेखाने अनेकांनी अपेक्षा देखील केली नसेल असे या प्रश्नाचे उत्तर दिले.
“माझ्या घराच्या पायऱ्यांवर मला एक पत्रिका सापडली,” या शब्दांत या लेखाची लेखिका सुरवात करते. “खरे तर, माझ्या घराच्या पायऱ्यांवरील असल्या प्रकारच्या पत्रिका वाचण्याची मी तसदी घेत नाही; पण यावेळी मला ती पत्रिका वाचण्याचा मोह आवरला नाही. या पत्रिकेच्या शीर्षकाने असा प्रश्न विचारला होता, ‘जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो?’” बायबलवर आधारित असलेली ही पत्रिका वाचल्यानंतर या स्त्रीला समजले, की या जगाचा अधिपती देव किंवा येशू नाही, तर दियाबल सैतान आहे.—योहान १२:३१; १४:३०; १६:११; १ योहान ५:१९.
“भयंकर निष्ठुरपणातील क्रूर अतिरेकीपणाचा विचार करा,” ही पत्रिका स्पष्ट करते. “मानवांनी, एकमेकांना यातना देण्यासाठी किंवा एकमेकांचे निर्दयीपणे बळी घेण्यासाठी गॅस चेंबरचा, छळ छावण्यांचा, अग्निप्रक्षेपकांचा, नेपाम बॉम्बचा आणि इतर अघोरी पद्धतींचा वापर केला आहे. . . . कोणत्या प्रकारच्या शक्ती लोकांना अशा प्रकारची तिटकारा आणणारी कामे करायला लावतात किंवा त्यांच्यासमोर चतुराईने असे प्रसंग उभे करतात ज्यामुळे त्यांना अघोरी कृत्ये करणे भाग पडते? अशा प्रकारची हिंसाचारी कृत्ये करण्यासाठी दुष्ट, काही अदृश्य शक्ती लोकांना प्रभावित करीत आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?” बायबल सैतानाला ‘या युगाचे दैवत’ म्हणते, हे आश्चर्याचे नाही का?—२ करिंथकर ४:४.
आनंदाची गोष्ट अशी, की थोड्या कालावधीनंतर सैतान आणि त्याचे दुरात्मे अस्तित्वात राहणार नाहीत. “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) होय, बायबल अभिवचन देते, की देवाच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्यांना धार्मिक नवीन जगात सार्वकालिक जीवन व्यतीत करण्याची आशा मिळेल. (स्तोत्र ३७:९-११; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांच्या दुष्ट प्रभावास काढले जाईल तेव्हा किती मोठे सांत्वन मिळेल!
या छोट्या पत्रिकेचा सारांश दिल्यानंतर द फ्रीपोर्ट न्यूज यातील लेखाच्या लेखिकेने पुढील शब्दांनी समारोप केला: “ही पत्रिका वाचून मला खरोखरच आनंद झाला. . . . कारण या जगाच्या स्थितीबद्दल आणि ते कोणाच्या कह्यात आहे याविषयी मी देखील चिंतित झाले आहे.”