युद्धास कोण जबाबदार आहे?
मानवजातीने लढलेल्या युद्धांसाठी देव जबाबदार आहे का? “नाही, देवाला युद्ध नको.” असे दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच, मार्टिन नाईमॉलर नामक एका सुप्रसिद्ध प्रॉटेस्टंट पाळकाने, या प्रश्नाच्या उत्तरात म्हटले. त्याचे विवेचन १९४६ मध्ये प्रकाशित झालेल्या, आह गॉट फॉम हिम्मेल झी डॉरैन—झेक्स् प्रिडिगटेन [हे देवा, स्वर्गातून पहा—सहा प्रवचने (इंग्रजी)] या पुस्तकामध्ये मांडण्यात आले.a हे पुस्तक सांगते:
“जो कोणी युद्धाबद्दल देवाला जबाबदार ठरवितो त्याला देवाच्या वचनांची माहिती नाही किंवा त्याविषयी माहिती करून घेण्याचीही त्याला इच्छा नाही. निश्चितच, सतत चालणाऱ्या युद्धांमुळे आम्हा ख्रिश्चनांवर अधिक दोषारोप आला आहे किंवा नाही, हा वेगळा प्रश्न आहे. तसेच आपण या प्रश्नाला इतक्या सहज टाळू शकत नाही. . . . ख्रिस्ती चर्चने पिढ्यान्पिढ्या युद्धांवर, सैनिकांवर आणि शस्त्रास्त्रांवर पुन्हापुन्हा आशीर्वाद देणे आणि युद्धांमध्ये त्यांच्या शत्रूंचा नाश व्हावा म्हणून त्यांनी अतिशय गैरख्रिस्ती मार्गाने प्रार्थना केली, हे देखील आपण अचूकपणे आठवू शकतो. ही आपली व आपल्या पूर्वजांची चूक आहे, पण देवाला मुळीच जबाबदार ठरवता येणार नाही. आम्ही आजचे ख्रिस्ती, द अर्नस्ट बायबल स्टुड्न्टस् [यहोवाचे साक्षीदार] या नामांकित पंथासमोर लाजले जातो, जे लष्करी सेवेमध्ये भाग घेण्यासाठी नकार दिल्यामुळे हजारोंच्या संख्येंनी छळछावण्यांमध्ये गेले व सहमानवांवर गोळीबार करण्यास नाकारल्यामुळे ज्यांनी मरण देखील पत्करले.”
आज, दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारे ५० वर्षांनंतरसुद्धा नाईमॉलरचे शब्द शांतीप्रिय लोकांसाठी विचार करण्याची गोष्ट आहे. नाही, राष्ट्रांच्या रक्तपातासाठी देवाला जबाबदार ठरवता येणार नाही! वस्तुतः, देव जगाच्या झगड्यांमध्ये भाग न घेणाऱ्या त्याच्या खऱ्या उपासकांद्वारे लवकरच सर्व युद्धाचा अंत घोषित करत आहे.—स्तोत्र ४६:९; योहान १७:१६.
[तळटीप]
a पुढे मार्टिन नाईमॉलरची प्रवचने गुन्हा व आशा या इंग्रजी पुस्तकामध्ये प्रकाशित झाली. तरीपण, इंग्रजी भाषांतर मूळ जर्मन ग्रंथापासून वेगळे आहे, म्हणूनच हा संदर्भ सरळ जर्मन भाषेतून भाषांतरीत करण्यात आला आहे.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
USAF photo