शांत अंतःकरणाचे लाभ
अनियंत्रित रागामुळे मानवी शरीरावर हानीकारक परिणाम होतो, हे आधुनिक वैद्यकिय शास्त्रास फार पूर्वीच समजले आहे. शेकडो वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी द जर्नल ऑफ द अमेरिकन असोसिएशन (जामा) या नियतकालिकाने असे म्हटले: “रागाच्या उद्रेकामुळे मनुष्याचा मृत्यू होतो आणि असे म्हटले जाते, की कदाचित त्याचे हृदय कमकुवत होते जे मानसिक स्थितीमुळे आलेल्या तणावास सहन करू शकले नाही. वेडसरपणाच्या उद्रेकांच्या दीर्घ मालिकेच्या पराकाष्ठेमुळे संबंधिताच्या कमकुवत हृदयावर परिणाम झाला आहे, असा कोणी सुद्धा विचार करत नाही असे वाटते.”
देवाच्या वचनाचे अर्थात बायबलचे विद्यार्थी असलेल्यांना वरील शब्दांचे आश्चर्य वाटत नाही. जामा या नियतकालिकाने वाईट क्रोधामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी सांगण्याच्या सुमारे २९ शतकांपूर्वी शलमोन राजा असे लिहिण्यास प्रेरित झाला: “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.” (नीतिसूत्रे १४:३०) हे शब्द आजही सत्य शाबीत होतात.
शांत मनोवृत्ती बाळगल्याने तणावामुळे होणारे अनेक आजार जसे, की रक्तदाब वाढणे, डोकेदुःखी आणि श्वासोच्छावासासंबंधाच्या समस्या आपण टाळतो. तथापि, आपले शारीरिक आरोग्य सुधारण्याखेरीज आपण ‘राग सोडून देण्याचा आणि क्रोधाविष्टपणाचा त्याग’ करण्याचा सर्वंकष प्रयत्न केल्यास इतरांसोबत असणारे आपले संबंध सुधारतील. (स्तोत्र ३७:८) येशू सौम्य स्वभावाचा असल्यामुळे आणि त्याला लोकांची मनःपूर्वक चिंता असल्याने लोकांना त्याच्याकडे अगदी सहजरीत्या जाता आले. (मार्क ६:३१-३४) त्याचप्रमाणे, शांत अंतःकरण विकसित केल्यास आपण इतरांसाठी उत्साहवर्धनाचा स्रोत होऊ.—मत्तय ११:२८-३०.