वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ११/१ पृ. २७
  • “यहोवाकडून एक अद्‌भुत देणगी”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “यहोवाकडून एक अद्‌भुत देणगी”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • “यहोवाच्या साक्षीदारांविषयीचं माझं मत तुम्ही बदललं”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • सरस गोष्टींची सुवार्ता प्रकाशित करणे
    आमची राज्य सेवा—१९९६
  • जूनमध्ये द वॉचटावर सादर करणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • उपकाराची जाणीव का बाळगावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ११/१ पृ. २७

“यहोवाकडून एक अद्‌भुत देणगी”

मे १, १९९६ च्या टेहळणी बुरूज अंकात, ख्रिस्ती तटस्थता व यहोवा आणि “कैसर” या दोघांबद्दलच्या आपल्या जबाबदाऱ्‍यांमध्ये संतुलन कसे बाळगावे याबद्दलची सखोल चर्चा करण्यात आली होती. (मत्तय २२:२१) पुरवलेल्या नवीन माहितीबद्दल गुणग्राहकतेच्या अनेक अभिव्यक्‍ती ऐकण्यात आल्या आहेत. त्यापैकी, खालील पत्र ग्रीस येथील एका साक्षीदाराकडून आहे व त्याने ते यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाला उद्देशून लिहिले आहे:

“आम्हा सर्वांची आध्यात्मिकरीत्या इतकी चांगली काळजी घेतल्याबद्दल मला तुम्हा सर्व प्रिय बंधूंची मनापासून कृतज्ञता व्यक्‍त करावीशी वाटते. माझ्या ख्रिस्ती विश्‍वासामुळे सुमारे नऊ वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगल्यानंतर, मे १, १९९६ च्या टेहळणी बुरूज अंकातील सुंदर विचारांची मी खरोखरच गुणग्राहकता बाळगतो. (यशया २:४) ती यहोवाकडील अद्‌भुत देणगी होती.—याकोब १:१७.

“हे लेख वाचताना मला पूर्वीच्या एका टेहळणी बुरूज नियतकालिकातील (ऑगस्ट १, १९९४, पृष्ठ १४) एक विधान आठवले: ‘समंजसपणा हा खरोखर मौल्यवान गुण असल्याचे उघड आहे. हा असा गुण आहे जो यहोवावर अधिक प्रीती करण्यास आम्हाला चालना देतो.’ होय बांधवांनो, मी यहोवाची बुद्धी स्पष्टपणे प्रतिबिंबित करणाऱ्‍या त्याच्या दयाळू व प्रेमळ संघटनेचा एक भाग असल्यामुळे त्याचे आभार मानतो.—याकोब ३:१७.

“मे १ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकातील वाढता प्रकाश, येथे ग्रीसमध्ये, विशेषकरून आपल्या विश्‍वासामुळे अनेक वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगलेल्यांनी किंवा अद्यापही भोगत असलेल्यांनी चांगल्याप्रकारे स्वीकारला आहे. पुन्हा एकदा आपले आभार मानतो. या संकटमय काळात आम्हाला मौल्यवान आध्यात्मिक अन्‍न सतत देत राहण्यास यहोवा तुम्हाला त्याच्या आत्म्याने शक्‍ती देवो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा