वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१ पृ. ३२
  • हृदयस्पर्शी नियतकालिक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हृदयस्पर्शी नियतकालिक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१ पृ. ३२

हृदयस्पर्शी नियतकालिक

माहिती किंवा मनोरंजनाबद्दल वाचकाला असलेली क्षुधा शमविण्यासाठी संपूर्ण विश्‍वभरात अगणित नियतकालिके प्रकाशित केली जातात.

तुमच्या हातातील नियतकालिक कशामुळे इतके विशेष आहे? जर्मनीतील वॉच टावर सोसायटीच्या शाखा दप्तराला मिळालेले पत्र कदाचित या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकेल:

“प्रिय बांधवांनो, तुमच्या परिश्रमाबद्दल व कार्याबद्दल खूप खूप आभार. माझे दोन मुलगे आणि मी सभा संपल्यावर घरी आलो व रात्रीचे ९:३० वाजले होते तरी, मला अलीकडचे टेहळणी बुरूज [ऑडियोकॅसेटवर] ऐकायचे होते. भांडी धूत असताना मी पहिला अभ्यास लेख (एप्रिल १, १९९५) ऐकू लागले. मी तो आणखी एकदा ऐकला पाहिजे असे मला वाटले म्हणून स्वयंपाक घरातील काम अर्धवट सोडून मी टेपसोबत टेहळणी बुरूज मधील [“तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!”] अंक वाचून काढला. त्या अंकाने, विशेषकरून चौथ्या आणि पाचव्या परिच्छेदाने माझ्या हृदयास स्पर्श केला. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले—पण अधिक काळासाठी नाही. मी यहोवाचे आभार मानते कारण मी जिवंत आहे व त्याच्या लोकांपैकी एक आहे, शिवाय आणखी कितीतरी लोकांबरोबर मी त्याचे नाव विदित करू शकते. मी निरूपयोगी आहे असे मला वाटण्याचे खरेच काहीएक कारण नाही. यहोवाचा आत्मा त्याच्या लोकांबरोबर आहे. आपण सर्वजण एकजुटीने शेवटपर्यंत टिकून विश्‍वासात दृढ होऊ या. ख्रिस्ती प्रेमाने पूर्ण करते, विश्‍वासातील आपली बहीण.”

टेहळणी बुरूज नियतकालिक केवळ माहितीच देत नाही. त्यांचे वाचन करणाऱ्‍यांच्या हृदयास ते स्पर्श करते आणि आध्यात्मिक पौष्टिकता तसेच समयोचित उत्तेजन यांबद्दल असलेली त्यांची इच्छा तृप्त करते. होय, टेहळणी बुरूज ‘यथाकाळी अन्‍न’ पुरवते.—मत्तय २४:४५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा