बायबलच्या भविष्यवाणीची पूर्णता
इंग्लंड, लंडनमधील इम्पिरिअल वॉर म्युझियममध्ये एक अतुलनीय घड्याळ आणि इलेक्ट्रॉनीय गणन-यंत्र आहे. घड्याळ जसजसे फिरते तसतसे हे गणन-यंत्र प्रत्येक ३.३१ सेकंदांस किट् असा आवाज करते. प्रत्येक आवाजाच्यावेळी एकूण संख्येत एका अंकाची भर टाकली जाते. प्रत्येक किट् आवाज, प्रत्येक अंक, या शतकाच्या दरम्यान युद्धामुळे मरण पावलेल्या पुरुष, स्त्री किंवा मुलास सूचित करतो.
जून १९८९ पासून या गणन-यंत्राने मोजण्यास सुरवात केली आणि अशी अपेक्षा केली जाते, की २००० वर्षाच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री ही गणना पूर्ण होईल. तोपर्यंत या गणन-यंत्रावर दहा कोटी इतकी संख्या नोंदवलेली असेल—या संपूर्ण २० व्या शतकात युद्धामुळे मरण पावलेल्यांची अजमासे संख्या.
सुमारे २,००० वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने अशा काळाविषयी भाकीत केले जो ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठण्याद्वारे’ चिन्हित होणार होता. यानुसार, या शतकातील विध्वंसक युद्धे, तसेच अनेक भूकंप, मऱ्या, अन्नटंचाई आणि इतर उद्भवणाऱ्या गोष्टी आपण ‘शेवटल्या काळात’—ख्रिस्त स्वर्गात १९१४ मध्ये राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ झाल्यानंतरच्या काळात जगत असल्याचा सामुदायिकरीत्या पुरावा देतात, असा प्रचार यहोवाचे साक्षीदार पुष्कळ काळापासून करीत आहेत.—लूक २१:१०, ११; २ तीमथ्य ३:१.
बायबल प्रमाणभूत मानून, टेहळणी बुरूज या सुवार्तेची घोषणा करते, की देवाचे राज्य लवकरच सहमानवास जाचणाऱ्या लोकांचा नाश करील व या पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करील. भवितव्यातील युद्धतंत्राबद्दल काय? बायबल सांगते: “या परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; [युद्ध] रथ अग्नीत जाळून टाकितो.”—स्तोत्र ४६:८, ९.