“मी स्वप्न तर पाहत नाही ना?”
मलावीमध्ये १९९५ च्या उन्हाळ्यात भरलेल्या ऐतिहासिक “आनंदी स्तुतीकर्ते” या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनाच्या संबंधाने आलेला हा अहवाल आहे.
मलावी नदीच्या पश्चिम किनाऱ्याचे अर्धे अंतर पार केल्यावर मुख्य रस्त्यालगत, २९ वर्षांमध्ये पहिल्यांदा एक पाटी लावण्यात आली आहे. त्यावर ‘यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन’ असे लिहिले आहे.
“एक भला मोठा ट्रक त्या पाटीच्या शेजारी उभा करण्यात आला आहे, आणि त्यातून झूझू नावाच्या शहरातून आलेले २०० पेक्षा अधिक प्रतिनिधी बाहेर निघतात. त्यांनी आपल्यासोबत कपड्याचे, व रगीचे गठ्ठे, भांडी, बादल्या, अन्नसामग्री, जळण आणि बायबल आणले आहे; व ते इतर ठिकाणाहून आलेल्या त्यांच्या सुमारे ३,००० बंधू व भगिनींसोबत एकत्र होण्यासाठी आले आहेत.
“ट्रकमधून उतरणाऱ्या बांधवांचे आम्ही स्वागत करत असतानाच, ६३ वर्षांचे जॉर्ज चिकाको वाळूवरून आपली सायकल ढकलत आणतात, कोटाकोटा गावातून सायकलवरून इकडे येण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले. गत वर्षांमध्ये, बंधू चिकाकोंनी बायबल तत्त्वांच्या बाबतीत हातमिळवणी करण्यास नकार दिल्यामुळे चार वेळा तुरुंगवास भोगला. त्यांचा चुलतभाऊ कैदेत असताना मारहाणीमुळे दगावला. बंधू चिकाको विचारतात, ‘मी स्वप्न तर पाहत नाही ना? हे अधिवेशन दिवसाच्या लख्ख प्रकाशात भरवले जात आहे आणि हे लोक मोठ्याने राज्य गीते गात आहेत! कित्येक वर्षांसाठी आम्हाला रात्रीच्या अंधारात एकत्र व्हावे लागत होते, हळू आवाजात राज्य गीते गावी लागत होती, आणि टाळ्या वाजवण्यासाठी आमचे हात घासावे लागत होते. आता आम्ही उघडपणे एकत्र आलो आहोत, आणि आम्हाला पाहून लोकांना आश्चर्य वाटते कारण त्यांना वाटत होते, की आम्ही थोडेच आहोत!’
“अधिवेशनाच्या परिसराला गवताचे कुंपण आहे व सावलीकरता बोरुंनी झाकलेले छप्पर आहे. प्रतिनिधींना राहण्यासाठी लहानलहान गवताच्या झोपड्या व खुले शयनगृह बांधण्यात आले होते. रात्रीच्या हवेत सुमधूर स्वर दुमदुमत आहेत जे आता छळाच्या भीतीने पूर्वीसारखे दाटलेले नाहीत.
“तेव्हा, ‘आनंदी स्तुतीकर्ते’ हे अधिवेशनाचे शीर्षक किती उचित आहे!”