वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ७/१५ पृ. ३२
  • तुमचे “हृदय सिंहासारखे” असू शकते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे “हृदय सिंहासारखे” असू शकते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ७/१५ पृ. ३२

तुमचे “हृदय सिंहासारखे” असू शकते

काही वेळेस बायबल सिंहास धैर्य व आत्मविश्‍वासाचे प्रतीक म्हणून चित्रित करते. शूरवीर किंवा धैर्यवान पुरुषांचे “हृदय सिंहासारखे” असल्याचे वर्णन केले जाते व धार्मिक जन “सिंहासारखे निर्भय” राहतात असे म्हटले जाते. (२ शमुवेल १७:१०; नीतिसूत्रे २८:१) विशेषतः, एखाद्या सिंहास ललकारण्यात येते तेव्हा तो हे दाखवून देतो की त्याला “सर्व वनपशूंत बलवान” ही ख्याती काही उगाच मिळालेली नाही.—नीतिसूत्रे ३०:३०.

यहोवा देव स्वतःच्या लोकांचे संरक्षण करण्याच्या आपल्या निर्धाराची तुलना सिंहाच्या निर्भयतेशी करतो. यशया ३१:४, ५ म्हणते: “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरावयाचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबावयाचा नाही, तसा सेनाधीश परमेश्‍वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढावयास उतरेल . . . परमेश्‍वर . . . रक्षण करील, तो तिचा बचाव करून तिला सोडवील, तिला ओलांडून (सलामत राखून) मुक्‍त करील.” अशा प्रकारे यहोवा स्वतःच्या सेवकांना, विशेषतः शत्रुंकडून संकट आले असता, त्यांच्याविषयी काळजी असल्यामुळे कार्य करील अशी खात्री देतो.

बायबल मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू अर्थात दियाबल सैतान याची तुलना एका गर्जणाऱ्‍या हिंस्र सिंहाशी करते. त्याचे भक्ष्य बनण्याचे टाळावयाचे असल्यास, शास्त्रवचने आपणास सांगतात: “सावध असा, जागे राहा.” (१ पेत्र ५:८) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, जीवघेण्या आध्यात्मिक सुस्तीपासून बचावून राहणे. या बाबतीत येशूने म्हटले: ‘तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जातील.’ (लूक २१:३४-३६) होय, या ‘शेवटल्या दिवसांत’ आध्यात्मिकपणे जागृत राहिल्यामुळे आपले “हृदय सिंहासारखे” बनू शकते, असे हृदय, जे “परमेश्‍वरावर भाव ठेवून अढळ राहते.”—२ तीमथ्य ३:१; स्तोत्र ११२:७, ८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा