देवाचे वचन “चमत्कार” घडवते
तेरेज एओनद्वारे कथित
मी १९६५ मध्ये एके दिवशी व्यापार समूहामध्ये प्रवेश केला आणि तेथील व्यापाऱ्यांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या प्रती सादर केल्या. तेथून निघताना मी मागे वळले तेव्हा एक मोठा आवाज मला ऐकू आला. माझ्या पायाच्या जमिनीलगतच ती गोळी झाडण्यात आली होती. “यहोवाच्या साक्षीदारांसोबत असेच वागले पाहिजे,” एका व्यापाऱ्याने टोमणा मारला.
या प्रसंगामुळे मला भय वाटले—परंतु पूर्ण-वेळेचे सेवाकार्य सोडण्याइतपत मी घाबरले नाही. मी ज्या बायबल सत्यांना शिकले होते ती फारच मौल्यवान होती. माझे सेवाकार्य सोडण्याकरिता कोणतीही गोष्ट कारणीभूत ठरण्यास ती मला अनुमती देत नव्हती. मी असे का म्हणते, याचे मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते.
जुलै १९१८ मध्ये माझा जन्म झाला आणि त्यानंतर माझे पालक कॅनडामधील, क्युबेक, केप-डी-ला-मेडलीन या एका छोट्याशा गावात स्थायिक झाले; या गावास चमत्काराचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. यात्रेकरू या ठिकाणी कुमारी मारियाच्या पवित्र स्थानी पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असत. मारियाचे अभिकथित चमत्कार शाबित होऊ शकत नाहीत परंतु हे गाव जसजसे ३०,००० पेक्षा अधिक रहिवाशांनी वाढत गेले तसतसे देवाच्या वचनाने असे कार्य केले आहे जे अनेक लोकांच्या जीवनांत वस्तुतः चमत्कारिकच आहे.
मी जवळजवळ २० वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांनी धार्मिक गोष्टींतील माझी आस्था पाहिली आणि मला त्यांचे बायबल वाचण्यास दिले. मी त्याचे वाचन करण्यास सुरवात केली; तेव्हा पाहते तो काय, मूर्तीची उपासना स्पष्टपणे निषिद्ध आहे, हे निर्गमच्या २० व्या अध्यायातून कळल्यानंतर मला धक्काच बसला. कॅथलिक चर्चच्या शिकवणींवरील माझा विश्वास लगेचच उडाला आणि मी मासला उपस्थित राहण्याचे बंद केले. मूर्तींची उपासना करण्याची माझी इच्छा नव्हती. माझ्या बाबांचे शब्द अजूनही मला ऐकू येतात, “तेरेज तुला चर्चला जायचं नाही का?” “नाही,” मी उत्तर दिले, “मी बायबल वाचत आहे.”
सप्टेंबर १९३८ मध्ये माझा विवाह झाल्यानंतरही बायबल वाचन माझ्या जीवनाचा एक भाग राहिला होता. रोजर, माझे पती बहुतेकवेळा रात्री कामाला जात असत त्यामुळे ते कामावर असताना बायबल वाचन करण्याची सवय मी स्वतःला लावून घेतली. लवकरच मी या अनुमानास पोहंचले, की देवाचे काही लोक असतीलच आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरवात केली.
देवाच्या लोकांसाठी माझा शोध
मी चर्चमध्ये जे काही शिकले होते त्यामुळे, मी जेव्हा लहान होते तेव्हा या विचाराने झोपण्यास भीत असे, की मला जाग आल्यानंतर मी तप्त नरकात तर नसेल ना. अशा भयास तोंड देण्यासाठी मी स्वतःची समजूत काढत असे, की प्रेममय देव असे काही भयानक होऊ देणार नाही. पूर्ण विश्वासानिशी, सत्याच्या शोधार्थ मी बायबलचे वाचन करीत राहिले. माझी अवस्था कूशी षंढाप्रमाणे झाली होती ज्याने वाचले तर खरे परंतु त्याचे त्याला आकलन झाले नाही.—प्रेषितांची कृत्ये ८:२६-३९.
माझा भाऊ ऑन्ड्रे आणि त्याची पत्नी आमच्या घराच्या खालील मजल्यावर राहत होते; त्यांनी सुमारे १९५७ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली. साक्षीदार प्रचार करण्यासाठी इमारतीमध्ये आल्यानंतर माझ्या वहिनीला घराच्या छतास खटखट करण्याद्वारे मला सावध करण्यास मी सांगितले. आपण आता दरवाजा उघडू नये हे मला यामुळे समजत होते. एक दिवस मला सावध करण्याचे ती विसरली.
त्या दिवशी मी दरवाजा उघडला आणि यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पूर्ण-वेळेचा सेवक म्हणून संबोधण्यात येणाऱ्या के मेनडे नामक एका पायनियर सोबत माझी भेट झाली. ती माझ्याशी यहोवाच्या नावाविषयी बोलली आणि देवास देखील एक व्यक्तिगत नाव असून ते यहोवा आहे, असे तिने मला सांगितले. ती गेल्यानंतर, तिने सांगितलेल्या गोष्टींस बायबल समर्थन देते किंवा कसे याचा शहानिशा करण्यासाठी मी माझ्या बायबलमध्ये त्याचा शोध घेतला. माझ्या संशोधनामुळे मी फार आनंदित झाले—निर्गम ६:३, डुवे व्हर्शन तळटीप; मत्तय ६:९, १० योहान १७:६.
के पुन्हा आल्यानंतर आम्ही त्रैक्याविषयी असणाऱ्या कॅथलिक सिद्धांताबद्दल चर्चा केली, ज्याचा असा दावा आहे, की तीन देव मिळून एक देव आहे. त्यानंतर, बायबल त्रैक्य शिकवत नाही, याविषयी माझे समाधान व्हावे म्हणून मी लक्षपूर्वक माझ्या स्वतःच्या बायबलचे परीक्षण केले. (प्रेषितांची कृत्ये १७:११) येशू देवाइतका मोठा नाही हे माझ्या अभ्यासाद्वारे मला पटले. त्याला निर्माण करण्यात आले होते. त्यास एक आरंभ होता, परंतु यहोवाच्या बाबतीत तसे नाही. (स्तोत्र ९०:१, २; योहान १४:२८; कलस्सैकर १:१५-१७; प्रकटीकरण ३:१४) मी जे काही शिकत होते त्याबद्दल समाधानी असल्यामुळे बायबल चर्चा चालू ठेवण्यास मला आवडले.
सन १९५८ मधील एके दिवशी, नोव्हेंबरच्या बर्फाच्या वादळाच्या वेळी, केने मला भाड्याने घेतलेल्या सभागृहात त्याच संध्याकाळी आयोजित केलेल्या विभागीय संमेलनास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. मी आमंत्रण स्वीकारले आणि मला तो कार्यक्रम आवडला. त्यांनतर माझ्याकडे आलेल्या एका साक्षीदारासोबत चर्चा करताना मी विचारले, “खऱ्या ख्रिश्चनांना घरोघरचा प्रचार करण्याची गरज आहे का?”
“होय,” त्याने उत्तर दिले, “सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे आणि लोकांना त्यांच्या घरी भेटणे ही प्रचार कार्याची एक महत्त्वपूर्ण पद्धत असल्याचे बायबल दाखवते.”—प्रेषितांची कृत्ये २०:२०.
त्याच्या उत्तरामुळे मला किती आनंद झाला! यामुळे देवाच्या लोकांचा शोध घेतल्याची मला आता खात्री पटली होती. “नाही, याची काही गरज नाही,” असे जर त्याने उत्तर दिले असते तर मी साशंक झाले असते कारण बायबल घरोघर प्रचार करण्याविषयी सांगते हे मला ठाऊक होते. तेव्हापासून मी त्वरेने आध्यात्मिक प्रगती केली.
त्या विभागीय संमेलनानंतर, मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित होण्यास सुरवात केली; या सभा ट्रो-रिव्यर या नजीकच्या नगरात होत असत. त्यावेळी के आणि तिची सोबतीण फ्लोरेन्स बोमेन, केप-डी-ला-मेडलीन याठिकाणी राहणारे एकमेव साक्षीदार होते. एके दिवशी मी म्हटले, “मी उद्या तुमच्यासोबत प्रचार करण्यास येणार आहे.” माझ्या सोबतीमुळे त्यांना आनंद झाला होता.
माझ्या गृह-नगरामध्ये प्रचार करणे
सर्वजण बायबल संदेशाचा स्वीकार करतील, असे मला वाटले होते; परंतु वास्तविक परिस्थिती काही वेगळीच असल्याचा प्रत्यय मला लवकरच आला. के आणि फ्लोरेन्सला दुसऱ्या ठिकाणी नियुक्त केले तेव्हा त्या नगरात घरोघरी बायबल सत्याचा प्रचार करणारी मी एकटीच होते. निर्भयपणे, सुमारे दोन वर्षांपर्यंत म्हणजे जून ८, १९६३ मध्ये माझा बाप्तिस्मा होईपर्यंत मी एकटीने प्रचार करण्याचे चालू ठेवले. बाप्तिस्म्याच्या दिवशीच सुटीची पायनियर सेवा म्हणून संबोधण्यात येणाऱ्या सेवेत मी नाव नोंदविले.
मी एक वर्षापर्यंत सुटीचे पायनियर म्हणून कार्य केले. त्यानंतर डेल्वीना सान्लोरॉन् हिने मला याचे अभिवचन दिले, की मी नियमित पायनियर झाल्यास ती केप-डी-ला-मेडलीन येथे येऊन आठवड्यातून एक वेळा माझ्या सोबत काम करील. यास्तव मी पायनियर अर्ज भरला. तथापि, दुःखाची गोष्ट म्हणजे, मी पूर्ण-वेळेचे सेवाकार्य सुरू केल्यानंतर मात्र दोन आठवड्यांच्या आतच डेल्वीना मरण पावली. आता मी काय करणार होते? मी तर अर्ज आधीच भरला होता आणि आता माझी माघार घेण्याची इच्छा नव्हती. म्हणून ऑक्टोबर १९६४ मध्ये माझ्या पूर्ण वेळेच्या सेवाकार्यास मी प्रारंभ केला. त्यानंतरची चार वर्षे मी एकटी घरोघर गेले.
केप-डी-ला-मेडलीनचे धर्मपरायन कॅथलिक अनेकदा विरोध करीत होते. मला प्रचार करण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात ते पोलिसांना बोलावत असत. एके दिवशी, सुरवातीस उल्लेख केल्याप्रमाणे एका व्यापाऱ्याने मला घाबरविण्यासाठी माझ्या पायाजवळ गोळी झाडली. या गोष्टीची नगरात मोठी चर्चा झाली. स्थानिक दूरचित्रवाणी केंद्राने यास यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध एक मोहीम, असे म्हटले. या संपूर्ण घटनेचा अनुकूल परिणाम झाला. योगायोगाने, दहा वर्षांनंतर ज्या व्यापाऱ्याने माझ्यावर गोळी झाडली होती त्याचाच एक नातेवाईक यहोवाचा साक्षीदार झाला.
देवाच्या वचनाद्वारे करण्यात आलेले “चमत्कार”
अनेक वर्षांच्या दरम्यान केप-डी-ला-मेडलीनमध्ये सत्याला विरोधक असणारी भींत हळूहळू खचताना मी पाहिले आहे. सुमारे १९६८ पर्यंत इतर साक्षीदार येथे आले आणि स्थानिक रहिवाशी बायबल सत्यांस अनुकूल प्रतिक्रिया दाखवू लागले. १९७० या दशकाच्या सुरवातीपर्यंत वास्तविकरित्या बायबल अभ्यासाच्या संख्येत जणू मोठा स्फोटच घडला होता. ही वृद्धी इतकी झाली होती, की मी संचालित करीत असलेले अनेक बायबल अभ्यास इतर साक्षीदारांनी घ्यावेत असे मला त्यांना सांगण्यास भाग पडले जेणेकरून घरोघरच्या सेवाकार्यात काही वेळ घालवण्यास मला शक्य होणार होते.
एके दिवशी एका तरुणीने माझ्याकडून बायबल अभ्यासाचे माध्यम सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते स्वीकारले. त्यावेळी तिचा सोबती एन्ड्रे नामक एक तरुण होता, त्याचा अवतार अगदी गबाळ्यासारखा एखाद्या आरोप्याप्रमाणे होता; त्याने देखील चर्चेमध्ये भाग घेतला. एन्ड्रेसोबत केलेल्या चर्चेमुळे त्याची आस्था जागृत झाली आणि एका बायबल अभ्यासास सुरवात करण्यात आली. त्यानंतर लवकरच तो जे शिकत होता त्याविषयी आपल्या मित्रांसोबत बोलू लागला.
एकदा, मी चार मवाल्यांबरोबर बायबलचा अभ्यास करीत होते, ज्यांपैकी एक जास्त बोलत नसे परंतु जास्त ऐकत असे. त्याचे नाव पायर होते. एके दिवशी भल्या पहाटे दोन वाजता, माझ्या पतीने आणि मी दरवाजा ठोठवल्याचा आवाज ऐकला. या दृश्याची कल्पना करा: दरवाजासमोर हे चार मवाली मला प्रश्न विचारण्यासाठी उभे होते. सुदैवाने, रोजरने अशा अवेळी झालेल्या भेटींबद्दल केव्हाही तक्रार केली नाही.
सुरवातीस हे चार पुरुष सभांना आले. परंतु एन्ड्रे आणि पायर यांनीच केवळ सभांना उपस्थित राहण्याचे चालू ठेवले. त्यांनी आपल्या जीवनांस देवाच्या दर्जांच्या एकवाक्यतेत आणले आणि बाप्तिस्मा घेतला. आता सुमारे २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून या दोन पुरुषांनी यहोवाची विश्वासूपणे सेवा केली आहे. जेव्हा त्यांनी अभ्यास सुरू केला होता, तेव्हा ते आपल्या गुन्हेगारी कारवायांबद्दल कुप्रसिद्ध होते आणि पोलिसांचा त्यांच्यावर डोळा होता. काही वेळा तर आमच्या बायबल अभ्यासानंतर किंवा मंडळीच्या सभेच्या दरम्यान पोलीस त्यांना शोधत येत असत. “सर्व प्रकारच्या लोकांना” प्रचार केल्यामुळे मी आनंदित आहे आणि अशा प्रकारे मी स्वतः पाहिले आहे, की देवाचे वचन कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणते जे खरोखरच एखाद्या चमत्काराप्रमाणेच आहे.—१ तीमथ्य २:४, NW.
केप-डी-ला-मेडलीनमध्ये एक राज्य सभागृह असेल आणि ते यहोवाच्या लोकांनी भरलेले असेल, असे मला माझ्या सेवाकार्याच्या सुरवातीस सांगितले असते तर मी त्यावर विश्वासच ठेवला नसता. ट्रो-रिव्यर शहराच्या एका लहान मंडळीची सहा भरभराटीच्या मंडळ्यांमध्ये वाढ झाली आहे आणि ह्या मंडळ्या तीन राज्य सभागृहांत एकत्र येतात ज्यांमध्ये केप-डी-ला-मेडलीन या मंडळीचा देखील समावेश होतो.
व्यक्तिशः मला सुमारे ३० लोकांना समर्पण आणि बाप्तिस्म्यापर्यंत नेण्यासाठी मदत केल्यामुळे आनंद मिळाला आहे. आता ७८ वर्षांच्या वयात मी खरोखरच म्हणू शकते, की मी आपले जीवन यहोवाला समर्पित केल्याची मला धन्यता वाटते. तथापि, माझ्या जीवनात निरुत्साहित गोष्टी आल्या होत्या, हे मला मान्य करावे लागेल. अशा वेळी यशस्वीपणे तोंड देण्यासाठी मी नेहमी आपले बायबल उघडून काही असे उतारे वाचत होते ज्यामुळे मला ताजेतवाने झाल्याचे वाटत असे. एक दिवस देवाचे वचन न वाचणे माझ्याकरिता अशक्य कोटीतील गोष्ट आहे. योहान १५:७ विशेषतः प्रोत्साहनदायक आहे ते म्हणते: “तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल.”
रोजरला नजीकच्या नव्या जगात पाहण्याची माझी आशा आहे. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४) १९७५ मध्ये त्याच्या मृत्यूच्या पूर्वी बाप्तिस्मा घेण्याच्या दृष्टीने तो चांगल्या प्रकारे प्रगती करीत होता. आता, पूर्ण वेळेच्या सेवाकार्यामध्ये टिकून राहण्याचा आणि यहोवाच्या कार्यात कायम आनंदित राहण्याचा माझा ठाम निर्णय आहे.