वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१ पृ. २१-२४
  • शेवटपर्यंत तुमची खात्री दृढ राखा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शेवटपर्यंत तुमची खात्री दृढ राखा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वास धरा
  • अनुभवातून भरवसा विकसित करणे
  • संगतीमुळे आपली दिशाभूल होऊ शकते
  • द्रव्याचा मोह
  • विश्‍वास ग्रहणशील अंतःकरणावर अवलंबून असतो
  • आपल्या तारण करणाऱ्‍या देवाकडे दृष्टी लावणे
  • तुम्हाला सुवार्तेवर खरोखर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • विश्‍वास प्रदर्शित करुन देवाच्या अभिवचनांना प्रतिसाद देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१ पृ. २१-२४

शेवटपर्यंत तुमची खात्री दृढ राखा

बिकट हवामानाच्या परिस्थितीत उडत असलेल्या लहानशा विमानाची कल्पना करा. वैमानिकाला कोणत्याही मार्गदर्शक खुणा स्पष्ट दिसत नाहीत. त्याच्या सभोवताली घनदाट ढग आहेत. वारा अडविणाऱ्‍या काचेच्या पलीकडे त्याला काहीच दिसत नाही, तरीही आपण आपला प्रवास सुखरूप पूर्ण करू याची त्याला खात्री आहे. त्याच्या या खात्रीमागे कोणते कारण आहे?

ढगांतून उडण्यास व अंधारात विमान उतरवण्यास मदत करणारी अचूक साधने त्याच्यापाशी असतात. त्याच्या वाटेवर, विशेषतः विमानतळाजवळ, भयसूचक दीप इलेक्ट्रॉनिक संदेश देऊन त्यास मार्गदर्शन देतात, व जमिनीवर असणाऱ्‍या वायू-वाहतूक नियंत्रकांशी त्याचा बिनतारी संपर्क असतो.

तुलना केल्यास, जगाच्या परिस्थिती दिवसेंदिवस अधिक अंधकारमय होत आहेत तरीही, आपण खात्रीने भविष्याला तोंड देऊ शकतो. या दुष्ट व्यवस्थीकरणातून आपला प्रवास काही लोकांनी अपेक्षा केली त्याहून अधिक काळ चालत असावा, परंतु आपण उचित वाटेवर आहोत व वेळेनुसार आहोत याची आपण खात्री बाळगू शकतो. आपण एवढी खात्री का बाळगू शकतो? कारण मानवी दृष्टीला शक्य नाही ते शोधण्यास मदत करणारे मार्गदर्शन आपल्याकडे उपलब्ध आहे.

देवाचे वचन आपल्या “पावलांकरिता दिव्यासारखे” आहे व ते “विश्‍वसनीय आहे . . . भोळ्यांस समंजस” करते. (स्तोत्रसंहिता १९:७; ११९:१०५) वैमानिकाच्या उड्डाणाचा मार्ग सूचित करणाऱ्‍या भयसूचक दीपांसारखे, बायबल अचूकपणे भविष्यातील घटनांचा आराखडा देते व आपण आपल्या ध्येयापर्यंत सुखरूप पोहंचू याची निश्‍चिती करण्यासाठी आपल्याला सुस्पष्ट सूचना देते. तथापि, ईश्‍वरी मार्गदर्शनातून लाभ मिळवण्यासाठी आपण त्यावर भरवसा ठेवला पाहिजे.

इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात पौलाने यहुदी ख्रिश्‍चनांना, ‘आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरण्याचा’ आग्रह केला. (इब्री लोकांस ३:१४) आपण आपला विश्‍वास “दृढ धरिला” नाही तर तो डळमळू शकतो. तर मग, प्रश्‍न उद्‌भवतो की आपण यहोवाच्या बाबतीत आपली खात्री शेवटपर्यंत कशाप्रकारे दृढ राखू शकतो?

विश्‍वास धरा

दृष्टीवर अवलंबून न राहता, पूर्णपणे साधनांच्या व जमिनीवरील नियंत्रणाच्या आधारावर उड्डाण करण्याआधी वैमानिकास पुरेसे प्रशिक्षण व अनेक तास उड्डाणाचा सराव हे अत्यावश्‍यक असतात. त्याचप्रकारे यहोवाच्या मार्गदर्शनाविषयी खात्री कायम राखण्यासाठी ख्रिश्‍चन व्यक्‍तीने सातत्याने विश्‍वास धरणे आवश्‍यक आहे, विशेषतः कठीण परिस्थिती निर्माण होतात तेव्हा असे करणे अगत्याचे आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “मी विश्‍वास धरला म्हणून बोललो, ह्‍या शास्त्रलेखानुसार जो विश्‍वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्‍वास धरतो आणि त्यामुळे बोलतोहि.” (२ करिंथकर ४:१३) अशा प्रकारे, देवाच्या सुवार्तेबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण विश्‍वास धरत असतो व त्यास बळकटी देत असतो.

मागदालेना, जिने दुसऱ्‍या जागतिक महायुद्धाच्या काळात एका छळछावणीत चार वर्षे काढली, प्रचार कार्य किती महत्त्वाचे आहे याचे वर्णन करताना ती म्हणते: “माझ्या आईने मला शिकवले, की विश्‍वास बळकट राखायचा असेल तर इतरांच्या आध्यात्मिक कल्याणाचा विचार करणे आवश्‍यक आहे. याबाबतीत आमचे कसे विचार होते हे स्पष्ट करणारा एक प्रसंग मला आठवतो. रॉवन्सब्रुक छळछावणीतून सुटका झाल्यावर माझी आई व मी एका शुक्रवारी घरी पोहंचलो. दोन दिवसांनंतर, रविवारी, आम्ही बांधवांसोबत घरोघरच्या प्रचार कार्यात सहभागी झालो. देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवण्यास इतरांना मदत करण्यावर आपण आपले लक्ष केंद्रित केले तर तीच अभिवचने आपल्यासाठीही आणखीन वास्तविक बनतील असे माझे ठाम मत आहे.”—पडताळा प्रेषितांची कृत्ये ५:४२.

शेवटपर्यंत आपली खात्री दृढ राखण्यासाठी इतर क्षेत्रांतही आध्यात्मिक कार्ये करणे आवश्‍यक आहे. विश्‍वासास बळकट करणारे आणखी एक उत्कृष्ट कार्य म्हणजे वैयक्‍तिक अभ्यास. आपण बिरुयाच्या लोकांचे अनुकरण केले व दररोज शास्त्रवचनांचे अध्यवसायाने परीक्षण केले तर यामुळे आपल्याला “आशेविषयीची पूर्ण खातरी . . . शेवटपर्यंत” राखण्यास मदत मिळेल. (इब्री लोकांस ६:११; प्रेषितांची कृत्ये १७:११) वैयक्‍तिक अभ्यासासाठी वेळ व निर्धार आवश्‍यक आहे हे खरे आहे. याच कारणाने कदाचित पौलाने इब्री लोकांना या बाबतीत “आळशी” किंवा सुस्त असण्याच्या धोक्याविषयी इशारा दिला.—इब्री लोकांस ६:१२.

सुस्त प्रवत्तीमुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रांत भयंकर परिणाम घडू शकतील. शलमोनास जाणीव झाली, की “हाताच्या सुस्तीने घर गळते.” (उपदेशक १०:१८) छप्पराची योग्य काळजी न घेतल्यास कधीतरी त्यातून पावसाचे पाणी नक्कीच झिरपू लागते. आध्यात्मिक बाबतीत आपण हाताची सुस्ती केली व आपला विश्‍वास दृढ राखण्यात अपेशी ठरलो तर नकळत आपल्या मनात शंका डोकावतील. उलटपक्षी, नियमितपणे देवाच्या वचनावर मनन व त्याचा अभ्यास केल्यामुळे आपल्या विश्‍वासाचे पोषण व संरक्षण होईल.—स्तोत्रसंहिता १:२, ३.

अनुभवातून भरवसा विकसित करणे

अर्थात, वैमानिक आपली साधने भरवसालायक आहेत हे अभ्यासाद्वारे तसेच अनुभवातूनही शिकतो. त्याचप्रकारे, आपल्याला स्वतःच्या जीवनात यहोवाची प्रेमळ काळजी प्रत्ययास येते तेव्हा त्याच्याविषयीची आपली खात्री बळकट होते. यहोशवाने हे अनुभवले व त्याने आपल्या सहइस्राएलांना आठवण करून दिली: “तुम्ही सर्व जण मनांत विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.”—यहोशवा २३:१४.

फिलिपाईन येथील एक विवाहित स्त्री होसफीना, हिने सुद्धा हाच धडा शिकला. तिला सत्य समजण्याआधी जीवन कसे होते याबद्दल ती सांगते: “माझे पती मद्यपी होते, प्यायलेले असताना ते खूप चिडायचे व मला मारझोड करायचे. आमच्या दुर्दैवी विवाहाचा आमच्या मुलावरही वाईट प्रभाव पडत होता. माझे पती व मी दोघेही नोकरीवर होतो, आम्हाला चांगला पैसा मिळत होता पण आम्ही दोघेही आपापल्या पगारातील आधिकांश भाग जुगारात गमावत होतो. माझ्या पतीचे अनेक दोस्त होते, पण मद्याचे पैसे माझे पती देतील या आशेनेच त्यांतील पुष्कळसे जण त्यांच्याशी मैत्री करत होते. तर काही जण केवळ त्यांची टर उडविण्यासाठी त्यांना पाजण्याचा प्रयत्न करत असत.”

“आम्हाला यहोवाची ओळख झाली व आम्ही त्याचे मार्गदर्शन गांभिर्याने घेतले तेव्हापासून सर्व बदलले. माझे पती आता पीत नाहीत, आम्ही जुगार खेळण्याचेही थांबविले आहे व आता आम्हाला खरे मित्र प्राप्त झाले आहेत जे आमच्यावर प्रेम करतात आणि आम्हाला मदत करतात. आमचा विवाह एक आनंदी विवाह बनला आहे आणि आमच्या मुलाचीही उत्तमरित्या वाढ होत आहे. आम्ही आता पूर्वीपेक्षा कमी वेळ काम करतो, पण आमच्याजवळ अधिक पैसा आहे. अनुभवाने आम्हाला शिकविले आहे की यहोवा एखाद्या प्रेमळ पित्यासारखा आहे जो आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतो.”

ध्वनीक्षेपणामार्फत मिळणाऱ्‍या सुचनांद्वारे किंवा साधन परिक्षकाद्वारे, आपला मार्ग दुरुस्त करण्याची गरज आहे असे काही वेळेस वैमानिकांना कळते. तशाचप्रकारे आपल्यालासुद्धा यहोवाच्या सुचनांनुसार दिशा बदलावी लागू शकते. “जेव्हा तुम्ही उजवीकडे फिराल, आणि जेव्हा तुम्ही डावीकडे फिराल तेव्हा तुझे कान तुझ्यामागे वाणी ऐकतील, ती म्हणेल की, हाच मार्ग आहे; यात तुम्ही चाला.” (यशया ३०:२१, पंडिता रमाबाई भाषांतर) त्याच्या वचनाद्वारे व संघटनेद्वारे आपल्याला आध्यात्मिक धोक्यांविषयी सावध करणारे मार्गदर्शन प्राप्त होते. त्यापैकी एक संगतीविषयी आहे.

संगतीमुळे आपली दिशाभूल होऊ शकते

आवश्‍यक दुरुस्ती केल्या नाहीत तर एखाद्या लहानशा विमानाची सहज दिशाभूल होऊ शकते. तशाचप्रकारे, आज ख्रिश्‍चन लोकांना बाह्‍य प्रभावाचे सतत तडाखे बसत असतात. आपण दैहिक विचारधारेच्या जगात राहतो जेथे अनेक लोक पैसा व सुखविलास यांना अधिक महत्त्व देऊन आध्यात्मिक मुल्यांना तुच्छ लेखतात. पौलाने तीमथ्यास इशारा दिला होता की शेवटले दिवस “कठीण” असतील. (२ तीमथ्य ३:१-५) स्वीकृती व प्रसिद्धीची आकांक्षा करणाऱ्‍या युवकांना विशेषतः वाईट संगतीचा अधिक धोका आहे.—२ तीमथ्य २:२२.

एक १७ वर्षीय मुलगी, अमॅन्डा सांगते: “थोड्याफार प्रमाणावर माझ्या वर्गसोबत्यांमुळे, काही काळासाठी माझा विश्‍वास दुर्बल झाला होता. ते सतत म्हणायचे की माझा धर्म प्रतिबंध लावणारा व अव्यवहार्य आहे आणि यामुळे मी नाउमेद होऊ लागले. तथापि, ख्रिस्ती मार्गदर्शन प्रतिबंध लावण्याऐवजी आमचे संरक्षण करते, असे समजण्यास माझ्या पालकांनी मला मदत केली. ही तत्त्वे मला माझ्या पूर्वीच्या शाळा-सोबत्यांपेक्षा अधिक समाधानी जीवन जगण्यास मदत करत आहेत याची मला आता जाणीव होते. माझ्याविषयी खरोखर काळजी करतात अशांवर, अर्थात माझ्या पालकांवर व यहोवावर भरवसा ठेवण्यास मी शिकले आहे तसेच मी पायनियर सेवेचासुद्धा आनंद लुटत आहे.”

आपण कोणत्याही वयोगटातील असो, आपल्या विश्‍वासांविषयी तुच्छतेचे उद्‌गार काढणारे लोक आपल्याला भेटतीलच. ते कदाचित ज्ञानी आहेत असे भासेल, परंतु देवाच्या नजरेत ते स्वाभाविक वृत्तीचे आहेत, आध्यात्मिक नाहीत. (१ करिंथकर २:१४) पौलाच्या दिवसांत करिंथमध्ये, ज्ञानी संशयवादी लोकांचा एक चलतीचा गट होता. संभवतः, या तत्त्वज्ञानी लोकांच्या शिकवणुकींमुळेच काही करिंथकर ख्रिश्‍चनांनी पुनरुत्थानाच्या आशेवरील आपला विश्‍वास गमावला. (१ करिंथकर १५:१२) प्रेषित पौलाने ताकीद दिली, “फसू नका.” “कुसंगतीने नीति बिघडते.”—१ करिंथकर १५:३३.

उलटपक्षी, चांगले सोबती आपल्याला आध्यात्मिकरित्या बळकट करतात. ख्रिश्‍चन मंडळीत, विश्‍वासू जीवन जगणाऱ्‍या लोकांसोबत संगती ठेवण्याची आपल्याला संधी आहे. सन १९३९ मध्ये सत्य शिकलेले नॉर्मन नामक एक बंधू अजूनही सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांची आध्यात्मिक दृष्टी कशामुळे तल्लख राहिली आहे? ते उत्तर देतात, “विश्‍वासू बांधवांसोबत भेटीगाठी करणे व जिव्हाळ्याचे मैत्रीसंबंध राखणे अत्यावश्‍यक आहे. अशा प्रकारच्या संगतीने मला, सैतानाच्या व देवाच्या संघटनेतील फरक स्पष्टपणे पाहण्यास मदत केली आहे.”

द्रव्याचा मोह

एक अनुभवी वैमानिक, ब्रायन स्पष्ट करतात की, “काहीवेळेस केवळ स्वतःच्या उपजत बुद्धीला पटत नाही म्हणून—एखाद्या वैमानिकास आपल्या साधनांवर विश्‍वास ठेवणे कठीण जाते. जमिनीवरील दिवे ताऱ्‍यांसारखे दिसत असल्यामुळे लष्करातील अनुभवी वैमानिकांनी उलटे विमान चालवले असल्याचे वृत्त आहे;—त्यांच्या साधनांनी याउलट सूचना दिल्या असल्या तरीसुद्धा त्यांनी असे केले.”

तशाच प्रकारे, आपली स्वार्थी उपजत बुद्धी देखील आध्यात्मिक अर्थाने आपली दिशाभूल करू शकते. येशूने म्हटले की द्रव्य ’मोहात’ पाडू शकतात व पौलाने ताकीद दिली की ‘द्रव्याच्या लोभामुळे कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत.’—मार्क ४:१९, १ तीमथ्य ६:१०.

मोहक लुकलुकत्या दिव्यांप्रमाणे लक्षवेधक भौतिक ध्येये आपल्याला चुकीच्या दिशेने निर्देशित करू शकतात. “आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” करण्यात आनंदी असण्याऐवजी आपण नाहीशा होत असलेल्या संसाराविषयीच्या फुशारकीने मार्गभ्रष्ट होऊ शकतो. (इब्री लोकांस ११:१; १ योहान २:१६, १७) ऐषारामाच्या जीवन-शैलीस आपलेसे ‘करू पाहिल्यास,’ आपल्याजवळ कदाचित आध्यात्मिक उन्‍नतीसाठी फार कमी वेळ उरेल.—१ तीमथ्य ६:९; मत्तय ६:२४; इब्री लोकांस १३:५.

पॅटरिक नामक एका तरुण विवाहित मनुष्याने कबूल केले की त्याने व त्याच्या पत्नीने अधिक चांगल्या राहणीमानाचा आनंद लुटता यावा म्हणून आध्यात्मिक ध्येयांचा त्याग केला. तो वर्णन करतो: “मंडळीत ज्यांच्याकडे महागड्या मोटारी होत्या व सुखसोयींनी युक्‍त घरे होती अशा लोकांचा आमच्यावर प्रभाव पडला. राज्याच्या आशेचे आम्हाला कधीच विस्मरण झाले नसले तरीसुद्धा, त्यादरम्यान थोडा ऐषाराम मिळवावा असे आम्हाला वाटले. तथापि, कालांतराने आम्हाला जाणीव झाली, की खरा आनंद यहोवाची सेवा करण्याद्वारे व आध्यात्मिकरित्या वाढ करण्याद्वारे मिळतो. आता आमची राहणी पुन्हा एकदा साधी झाली आहे. आम्ही आमच्या नोकरीच्या वेळेत कपात केली आहे व नियमित पायनियर बनलो आहोत.”

विश्‍वास ग्रहणशील अंतःकरणावर अवलंबून असतो

यहोवाविषयी खात्री विकसित करण्यात ग्रहणशील अंतःकरणाचा देखील मोठा वाटा असतो. “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलची खातरी” [किंवा, “खात्रीलायक पुरावा,” तळटीप, NW] आहे, हे खरे आहे. (इब्री लोकांस ११:१) तथापि, ग्रहणशील अंतःकरण असल्याखेरीज आपल्याला खात्री पटण्याची फार कमी शक्यता आहे. (नीतिसूत्रे १८:१५; मत्तय ५:६) याच कारणास्तव प्रेषित पौलाने म्हटले की “सर्वांच्या ठायी विश्‍वास आहे असे नाही.”—२ थेस्सलनीकाकर ३:२.

तर मग, आपण उपलब्ध असलेल्या सर्व खात्रीलायक पुराव्यांप्रती, आपले अंतःकरण प्रतिक्रियाशील कसे राखू शकतो? ईश्‍वरी गुण, अर्थात विश्‍वासास समृद्ध करणारे व त्यास चालना देणारे गुण विकसित करण्याद्वारे आपण असे करू शकतो. पेत्र ‘आपल्या विश्‍वासात सात्विकतेची, ज्ञानाची, इंद्रियदमनाची, धीराची, सुभक्‍तीची, बंधुप्रेमाची, व प्रेमाची भर घाला,’ असे आपणास आर्जवतो. (२ पेत्र १:५-७; गलतीकर ५:२२, २३) उलटपक्षी, जर आपण एक आत्म-केंद्रित जीवन व्यतीत केले किंवा यहोवाची केवळ नाममात्र सेवा केली, तर मग आपला विश्‍वास विकसित होईल अशी आपण उचित अपेक्षा करू शकणार नाही.

यहोवाच्या नियमशास्त्राचे वाचन करून त्याप्रमाणे चालण्याचा एज्राने “निश्‍चयच केला होता.” (एज्रा ७:१०) त्याचप्रमाणे मीखाचे अंतःकरण देखील ग्रहणशील होते. “मी तर परमेश्‍वराची [यहोवाची] मार्गप्रतीक्षा करीन मी आपल्या तारण करणाऱ्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.”—मीखा ७:७.

यापूर्वी उल्लेखलेली मागदालेना देखील, धीराने यहोवाची वाट पाहते. (हबक्कूक २:३) ती म्हणते: “आध्यात्मिक परादीस तर आपल्याकडे आहेच. पुढचा टप्पा म्हणजे भौतिक परादीस, लवकरच येईल. त्यादरम्यान लक्षावधी लोक मोठ्या लोकसमुदायामध्ये सामील होत आहेत. देवाच्या संघटनेत इतके लोक एकत्रित होताना पाहून मी रोमांचित होते.”

आपल्या तारण करणाऱ्‍या देवाकडे दृष्टी लावणे

शेवटपर्यंत आपली खात्री दृढ राखण्यासाठी विश्‍वास धरणे व यहोवा आणि त्याच्या संघटनेमार्फत मिळणारे मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकणे आवश्‍यक आहे. यासाठी प्रयत्न करणे खचितच व्यर्थ ठरणार नाही. लांब व कठीण प्रवास संपवून एक वैमानिक जेव्हा विमान खाली उतरवून शेवटी घनदाट ढगांतून बाहेर पडतो तेव्हा त्यास मनःपूर्वक समाधान वाटते. त्याच्या नजरेसमोर पसरलेली हिरवीगार धरणी जणू त्याचे स्वागत करत असते. खाली, त्याचे स्वागत करण्यासाठी विमानतळाची धावपट्टी तयार असते.

आपल्याला सुद्धा एका हर्षवर्धक अनुभवाची प्रत्याशा आहे. या निराशमय दुष्ट जगाच्या ठिकाणी धार्मिकतेची नवीन पृथ्वी येईल. आपल्यासाठी एक ईश्‍वरी स्वागत राखून ठेवले आहे. स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांकडे लक्ष दिल्यास आपण तेथे जाऊ शकतो: “कारण तू माझी आशा आहेस; हे प्रभू, यहोवा, माझ्या तरुणपणापासून तू माझा भरवसा आहेस. . . . मी निरंतर तुझीच स्तुति करीन.”—स्तोत्र ७१:५, ६, (पं. र. भाषांतर).

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा