वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१५ पृ. ३२
  • शुद्ध हातांनी यहोवाची उपासना करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुद्ध हातांनी यहोवाची उपासना करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१५ पृ. ३२

शुद्ध हातांनी यहोवाची उपासना करा

स्तोत्रकर्ता दावीद, याने प्रेरित होऊन असे गायिले: “हे परमेश्‍वरा, [यहोवा, NW] मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन.”—स्तोत्रसंहिता २६:६.

या शब्दांची रचना करताना, वेदीवर चढून मग अग्नीवर यज्ञार्पण ठेवण्याच्या इस्त्राएलातील लेवीय याजकांच्या रूढीबद्दल, दावीद अप्रत्यक्षपणे उल्लेख करत असावा. परंतु, उपासनेचे हे कृत्य करण्याआधी, याजकांना त्यांचे हात व पाय धुवावे लागत असत. ही काही किरकोळ बाब नव्हती. हे प्राथमिक पाऊल न उचलल्यास एखाद्या याजकास त्याचे जीवन गमवावे लागू शकत होते!—निर्गम ३०:१८-२१.

लाक्षणिक धुतले जाणे, आध्यात्मिक व नैतिक शुद्धतेत परिणीत होते. (यशया १:१६; इफिसकर ५:२६) यहोवाची इच्छा आहे, की आज आपण त्याची सेवा करण्याद्वारे त्याच्या ‘वेदीला फेरा घालावा.’ पण आपण शुद्ध हातांनी—दावीदाने म्हटल्याप्रमाणे, “निर्दोषतेने” धुतलेल्या हातांनी हे करावे असे तो अपेक्षितो. ही एक क्षुल्लक अपेक्षा नव्हे, कारण जे अशुद्धपणाने चालतात त्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. (गलतीकर ५:१९-२१) ईश्‍वरी कार्यात जीवन घालवत असल्यामुळे, अनैतिक वर्तनात भाग घेण्याचा परवाना मिळत नाही. या कारणास्तव प्रेषित पौलाने लिहिले: “तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्‍यांस घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.”—१ करिंथकर ९:२७.

जे ईश्‍वरी स्वीकृती व खरा आनंद शोधतात अशांनी शुद्ध हातांनी यहोवाची सेवा केली पाहिजे. दावीदाप्रमाणे, ते “खऱ्‍या मनाने व सरळतेने” चालतात.—१ राजे ९:४.

तुम्ही भेटीचे स्वागत करणार का?

अशा या त्रस्त जगात राहत असतानाही, देवाविषयी, त्याच्या राज्याविषयी आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या अद्‌भुत उद्देशाविषयी बायबलमधून अचूक ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा