वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १/१५ पृ. ३०
  • कायदेविषयक विजय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कायदेविषयक विजय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १/१५ पृ. ३०

कायदेविषयक विजय

सन १९९५ च्या एप्रिल महिन्यात, एक महत्त्वपूर्ण न्यायालयीन विजय मिळवण्यात आला. जानेवारी २८, १९९२ या दिवशी, २४ वर्षीय लूस नरेडा आसीवेडो क्विलस, हिला, प्वेर्त रीकोतील, अल ब्यूएन पासटोर हॉस्पिटल, येथे वैकल्पिक शस्त्रक्रियेकरता दाखल करण्यात आले तेव्हा हे प्रकरण सुरू झाले. दाखल करण्यात आल्यावर तिने तोंडी तसेच लेखी स्वरूपात सांगितले, की यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असल्यामुळे ती रक्‍त संक्रमण स्वीकारणार नाही. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) तिच्यावर उपचार करणाऱ्‍या डॉक्टरांसहित, इस्पितळाचे संबंधित असलेले कर्मचारी तिच्या इच्छा जाणून होते.

तिच्या शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी, लूसने फार अधिक प्रमाणात रक्‍त गमावले व रक्‍तस्त्रावामुळे तिच्या शरीरात रक्‍ताचा तीव्र अभाव निर्माण झाला. तिच्या सेवेत असलेले, डॉ. होसे रोथ्रीगेथ रोथ्रीगेथ यांच्या मते तिला मदत करण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे रक्‍त संक्रमण देणे हा होता. यास्तव, याबाबतीत तिला अंधारात ठेवून व तिच्या परवानगीशिवाय त्यांनी लूसला संक्रमित करण्यासाठी न्यायालयीन आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला.

लूस पूर्ण शुद्धीवर व स्वतःच्या वतीने बोलण्यास पूर्णपणे समर्थ असूनसुद्धा, डॉ. रोथ्रीगेथ रोथ्रीगेथ, असेच म्हणत राहिले की केसच्या निकडीमुळे कुणाची परवानगी घेण्यासाठी वेळच नव्हता. जिल्ह्याचे वकील एड्‌वॉरडो पेरेथ सोटो यांनी फॉर्मवर सही केली व जिल्हा न्यायाधीश, माननीय ऑङकल लूईस रोथ्रीगेथ रामोस यांनी रक्‍त संक्रमणासाठी एक न्यायालयीन फर्मान जारी केले.

अशा प्रकारे, जानेवारी ३१, १९९२ या दिवशी, लूसला शस्त्रक्रियेच्या खोलीत नेण्यात आले, जेथे तिला संक्रमित करण्यात आले. संक्रमण सुरू असताना, तिला इस्पितळाच्या कर्मचाऱ्‍यांपैकी काहींचे हसणे ऐकू आले. इतरांनी तिला रागावून सांगितले, की तिला जे करण्यात येत होते ते तिच्याच भल्यासाठी होते. ती तिच्या सर्व शक्‍तिनिशी लढली—पण व्यर्थ. त्या दिवसाच्या शेवटापर्यंत, लूसला रक्‍ताचे चार युनिट दिलेले होते.

प्वेर्त रीकोतील यहोवाचे साक्षीदार व रक्‍त संक्रमण या संबंधी, लूसचे प्रकरण पहिले किंवा शेवटले नाही. तिच्या अनुभवापूर्वी, प्रौढ यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रक्‍त संक्रमण देण्यासाठी जवळजवळ १५ न्यायालयीन फर्मान जारी करण्यात आले होते व तेव्हापासून आणखी जारी करण्यात आले आहेत. दुर्दैवीपणे, एका प्रकरणात न्यायालयीन फर्मान अंमलात आणण्यात आले व एका रुग्णाला ती बेशुद्ध असताना जबरीने रक्‍त संक्रमण देण्यात आले.

तथापि, लूसची लढाई त्या शस्त्रक्रियेच्या खोलीत संपुष्टात आली नाही. ऑक्टोबर १९९३ मध्ये, प्वेर्त रीकोच्या राष्ट्रमंडळाविरुद्ध एक खटला भरण्यात आला. हा खटला वरिष्ठ न्यायालयाने ऐकला, व एप्रिल १८, १९९५ या दिवशी तिच्या बाजूने निर्णय देण्यात आला. न्यायालयाने म्हटले, की रक्‍त संक्रमित करण्याचे फर्मान, “असंविधानिक होते व त्याने वादीला, कायद्याच्या रीतसर प्रक्रियेशिवाय धर्मपालनाचे स्वातंत्र्य, तिचा एकांत व शारीरिक स्वयं-निर्धार या हक्कांपासून वंचित केले.”

हा अधिनिर्णय महत्त्वाचा होता कारण प्वेर्त रीकोतील न्यायालयाने रक्‍त संक्रमणासंबंधी खटल्यात यहोवाच्या साक्षीदारांच्या पक्षात निर्णय देण्याची ही पहिलीच वेळ होती. या निर्णयाने फार मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया जागृत केली. एक पत्रकार परिषद घेण्यात आली व त्या परिषदेला वृत्तपत्र, नभोवाणी तसेच दूरदर्शनचे प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते.

त्याच रात्री एका नभोवाणी कार्यक्रमात लूसच्या न्यायप्रतिनिधींपैकी एकाची मुलाखत प्रक्षेपित करण्यात आली. श्रोत्यांना फोन करून प्रश्‍न विचारण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. अनेक डॉक्टर व वकिलांनी फोन केले व या खटल्याप्रती त्यांची अनुकूल प्रतिक्रिया व्यक्‍त केली. त्यापैकी एकाने असे म्हटले: “रक्‍त संक्रमण, जीवन वाचवेल याची खात्री, विज्ञान पटवून देऊ शकले नाही व असे समजणे तर्कदोषीपणाचे आहे.” तसेच “लवकरच, रक्‍त संक्रमण आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील सर्वात मोठे भ्रम व दोष असल्याची इतिहासात नोंद करण्यात येईल,” असेही त्यांनी म्हटले.

एक अतिशय मानांकित कायदा प्राध्यापकांनी नंतर वॉच टावर सोसायटीच्या शाखा दफ्तराला फोन केला व त्यांच्या शब्दात, “एक जोरदार विजय” मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक समाधान व्यक्‍त केले. न्यायालयाचा निर्णय केवळ यहोवाच्या साक्षीदारांचेच नव्हे तर प्वेर्त रीकोतील सर्व नागरिकांच्या संविधानिक हक्कांचे समर्थन करतो असेही ते म्हणाले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा