यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध भरलेल्या खटल्यावर निर्णय घेण्यात येतो
वारंवार पुढे ढकलल्यानंतर, थेस्सालोनीकि, ग्रीस, येथील अपील न्यायालयाने शेवटी, चार यहोवाच्या स्त्री-साक्षीदारांविरुद्ध भरलेल्या खटल्यावरील सुनावणी ऐकण्यासाठी जून ८, १९९५ रोजी न्यायसभा भरवली. त्यांच्याविरुद्ध उभा केलेला दावा? धर्मांतरित करणे, ज्याचा ग्रीक कायद्याने पाचपेक्षा अधिक दशकांपासून निषेध केला आहे.
तथापि, न्यायसभा भरवण्यात आली तोपर्यंत, फिर्यादी पक्षाचा मुख्य साक्षीदार असलेला पाळक, ज्याने त्या चार स्त्रियांविरुद्ध खटला भरला होता तो जिवंत नव्हता. दुसऱ्या एका पाळकाने त्याच्या जागी साक्ष देण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने त्याच्या विनंतीचा स्वीकार केला नाही. म्हणून, ही चौकशी केवळ १५ मिनिटेच टिकली यात काही नवल नाही! न्यायाधीशाने फिर्यादी पक्षाच्या दुसऱ्या साक्षीदारांची तपासणी केली आणि बेकायदेशीरपणे धर्मांतर करत असल्याच्या आरोपातून, प्रतिवादी निर्दोष आहेत ते पाहिले. हा निर्णय हे दाखवून देतो, की १९९३ मध्ये युरोपमधील मानवी हक्कांचे न्यायालय ज्या निर्णयास येऊन पोहोंचले होते त्याचा आदर व त्याचे पालन करण्यास ग्रीसमधील न्यायालयांची राजीखुशी आहे.
मुख्यतः ज्या तीन स्त्रियांनी फिर्यादी पक्षाच्या वतीने साक्ष दिली होती, त्यांनी प्रतिवादी साक्षीदारांना येऊन भेटणे व मनःपूर्वक त्यांचे अभिनंदन करत असल्याचे पाहणे विस्मयकारक होते. त्यांच्यापैकी एक असे म्हणाली, की “घडलेल्या ह्या सर्व गोष्टींविषयी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,” ती पुढे असेही म्हणाली: “तो आमचा दोष नव्हता. पाळकांनीच आम्हाला तुमच्याविरुद्ध खटला भरण्यास भाग पाडले. पण ते आता काही जिवंत नाहीत तर तुम्ही आमच्या गावी व आमच्या घरी यावे अशी आमची इच्छा आहे.”
अशा प्रकारे, यहोवाने पुन्हा एकदा ग्रीसमधील त्याच्या लोकांकरिता विजय मिळवून दिला आहे. ग्रीस येथे १९३८ आणि १९३९ मध्ये धर्मांतरित करण्याबद्दलचे नियम काढण्यात आले होते. १९९३ मध्ये युरोपमधील मानवी हक्कांच्या न्यायालयाने हे कायदेशीरपणे जाहीर केले, की ह्या नियमांचा वापर करून यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करणे चुकीचे आहे.—पाहा वॉचटावर सप्टेंबर १, १९९३, पृष्ठे २७-३१.
तुम्ही भेटीचे स्वागत करणार का?
अशा या त्रस्त जगात राहत असतानाही, देवाविषयी, त्याच्या राज्याविषयी आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या अद्भुत उद्देशाविषयी बायबलमधून अचूक ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया Watch Tower, H-58, Old Khandala Road, Lonavla, 410401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.