वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१५ पृ. ३०
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचं नाव काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • देवाचं नाव
    सावध राहा!—२०१७
  • खऱ्‍या विश्‍वासाकडे नेणारे नाव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१५ पृ. ३०

वाचकांचे प्रश्‍न

फिलिप्पैकर २:९ मध्ये, पौल येशूबद्दल म्हणाला: “देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला [दयाळुपणे, NW] दिले.” हे नवे नाव कोणते? आणि येशू यहोवापेक्षा कनिष्ठ आहे तर, येशूचे नाव इतर सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ कसे?

फिलिप्पैकर २:८, ९ मध्ये आपण वाचतो: “मनुष्यप्रकृतीचे असे होऊन त्याने [येशूने] मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्‍यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला [दयाळुपणे] दिले.”

इतर सर्व नावांपेक्षा यहोवाचे नाव सर्वोच्च असल्यामुळे येशू सुद्धा यहोवासारखीच एक व्यक्‍ती असली पाहिजे असा या उताऱ्‍याचा अर्थ होत नाही. फिलिप्पैकर अध्याय २ येथील संदर्भ दाखवून देतो, की येशूला हे श्रेष्ठ नाव त्याच्या पुनरुत्थानानंतर मिळाले. त्याआधी त्याला ते देण्यात आले नव्हते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, यहोवा नेहमीच सर्वश्रेष्ठ आहे व त्याचा दर्जा कधीच बदललेला नाही. येशूला त्याच्या पार्थिव सेवेआधी असलेल्या नावापेक्षा उच्च नाव मिळाले ही वस्तुस्थिती हेच सिद्ध करते, की तो यहोवा सारखा नाही. येशूला इतर सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असे नाव देण्यात आले असे पौलाने म्हटले तेव्हा, आता देवाच्या सर्व सृष्टीमध्ये येशूचे सर्वात श्रेष्ठ नाव आहे असा त्याचा अर्थ होता.

येशूचे ते श्रेष्ठ नाव कोणते? यशया ९:६ आपल्याला याचे उत्तर देण्यास मदत करते. येणाऱ्‍या मशीहाविषयी म्हणजे येशूविषयी भविष्यवाणी करताना ते वचन म्हणते: “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्‌भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील.” (तिरपे वळण आमचे.) येथे येशूचे ‘नाव’ त्याचा उच्च दर्जा आणि अधिकार याजशी संबंधित आहे व त्यावरूनच फिलिप्पैकर २:९ मध्ये उल्लेखित केलेले “सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव” आपण समजू शकतो. यहोवाने त्याला जे उच्च अधिकारपद—इतर कोणत्याही प्राण्याला दिलेल्या अधिकारापेक्षा उच्च अधिकारपद दिले आहे त्याला मान्यता देऊन प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला पाहिजे. या भाषांतरामधील ‘कोणताही’ हा शब्द मूळ ग्रीक पाठाचे थेटपणे प्रतिनिधीत्व करत नाही, तर त्या वचनाच्या अर्थावरून सूचित होतो. येशूचे “नाव” त्याच्या स्वतःच्या नावापेक्षा श्रेष्ठ नाही तर इतर सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे.

सर्व विश्‍वासू देवदूत आणि मानव यांच्यासमवेत येशूच्या नावासमोर गुडघे टेकून त्याला मान्यता देण्यास आपण किती आनंदित आहोत बरे! आपण “देवपित्याच्या गौरवासाठी”—यहोवाने येशूला दिलेल्या उच्च आणि शक्‍तिशाली दर्जाच्या अधीन होण्याद्वारे असे करतो.—फिलिप्पैकर २:११; मत्तय २८:१८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा