वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ११/१५ पृ. २०
  • सुफलता व युद्धाच्या देवता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुफलता व युद्धाच्या देवता
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ११/१५ पृ. २०

सुफलता व युद्धाच्या देवता

एब्ला, सिरीया येथे उत्खननाच्या मोहिमेत, सुफलता व युद्धाची बॅबिलोनी देवता, इश्‍तार हिचे चित्र असलेला अवशेष सापडला. पुराणवस्तूसंशोधक पॉलो मॉटीआय त्याचे वर्णन असे करतात, “लंबवर्तुळाकार मोहर, ज्यावर उंच बारीक अशा आधारावर डोके बसवलेल्या एका दैवी मूर्तीसमोर बुरखाधारी पुजारीण असलेल्या पूजेचे दृश्‍य आहे.”

हा शोध महत्त्वपूर्ण आहे, कारण ती मूर्ती सा. यु. पू. १८ व्या शतकाच्या सुरवातीच्या काळातली आहे. मॉटीआय यांच्या मते, इश्‍तार उपासना सुमारे २,००० वर्षे चालत होती यास तो “निर्णायक पुरावा” देतो.

इश्‍तारची उपासना बॅबिलोनमध्ये सुरू झाली व नंतरच्या शतकांमध्ये ती रोमन साम्राज्यात पसरली. वाग्दत्त देशातून खोट्या धर्माच्या प्रत्येक मागोव्याचा नायनाट करावा अशी आज्ञा यहोवाने इस्त्राएलांना दिली होती, पण असे करण्यात ते अपयशी ठरल्यामुळे, अश्‍तोरेथची (इश्‍तारशी जुळणारी कनानी देवता) उपासना त्यांच्याकरता एक पाश ठरली.—अनुवाद ७:२, ५; शास्ते १०:६.

इश्‍तार व तिच्याशी जुळणारी अश्‍तोरेथ देवता आता अस्तित्वात नसली, तरी त्यांनी प्रतिनिधीत्व केलेले विशेष गुण—अनैतिकता व हिंसा—आज फोफावत आहेत. सुफलता व युद्धाच्या या देवतांची उपासना करणाऱ्‍या प्राचीन संस्कृतींपेक्षा आजचा आधुनिक समाज खरोखर इतका भिन्‍न आहे का असे आपण योग्यपणे स्वतःला विचारू शकतो.

[२० पानांवरील चित्रं]

टॉनीटला मुलांचे बळी देखील दिले जात होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा