‘प्रत्येक जण त्यांच्यासारखा असता तर!’
हे शब्द, लेट्सब्योगर झूरनाल नामक लक्झेम्बर्ग वृत्तपत्राच्या एका स्तंभलेखकाचे होते. तो कोणाबद्दल बोलत होता?
ऑश्विट्झच्या स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वार्षिकोत्सवाला उपस्थित राहण्याकरता तो पोलंडला गेला होता व ज्यांनी तेथे अतिशय सोसले होते अशा एका समूहाचा अजिबात उल्लेख करण्यात आला नव्हता असे त्याच्या लक्षात आले. फेब्रुवारी २, १९९५ च्या आपल्या स्तंभांतर्गत, त्याने या समूहाची यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळख करून दिली व लिहिले: “अत्यंत कठीण तुरुंगवास अथवा छळछावणी, उपासमार बराकीत, कुऱ्हाडीने किंवा गिलोटीनने, दयनीयपणे मरण्याची भीती, यापैकी काहीही त्यांना त्यांचा विश्वास नाकारण्यास भाग पाडू शकले नाही.” तो पुढे म्हणाला: “यहोवाचे साक्षीदार ज्या धैर्याने त्यांच्या मृत्यूला सामोरे गेले ते धैर्य पाहून अमानुष एसएस गार्ड्सनी सुद्धा आश्चर्य केले.”
यहोवाचे साक्षीदार हुतात्मे होण्यास उत्सुक नव्हते. परंतु पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांप्रमाणे, त्यांच्यातील हजारोंनी ख्रिस्ती तत्त्वांची तडजोड करण्याऐवजी मृत्यू पत्करला. अशा या विश्वासाने त्यांना नात्सी शासनाच्या अंधकारमय काळात ठळकपणे वेगळे असे दाखवले.
त्या स्तंभलेखकाने निष्कर्षास असे म्हटले: “सर्वच लोक यहोवाच्या साक्षीदारांसारखे असते तर!“ जर असते, तर दुसरे महायुद्ध कधीच झाले नसते.