देव जगावर आधिपत्य गाजवतो का?
रविवारची सकाळ आहे. पुष्कळ लोक बिछान्यातून बाहेर पडतात, तयार होतात, न्याहारी करतात आणि घाईघाईने चर्चला जातात. देव सर्वश्रेष्ठ असून या पृथ्वीवर आधिपत्य कसे गाजवतो व त्याचा अधिकार अद्वितीय कसा आहे याविषयीचे प्रवचन ते तेथे ऐकतात. तो लोकांची अतिशय काळजी करतो असे त्यांना तेथे सांगितले जाते. येशू ख्रिस्ताचा देखील उल्लेख केला जातो. तो राजांचा राजा असून त्याच्या आज्ञाधारकतेत प्रत्येक गुडघा टेकतो असे ते कदाचित ऐकतील.
चर्चला जाऊन आल्यावर, हे लोक टीव्ही लावतील व बातम्या पाहतील. आता ते दुष्काळ, हिंसा, मादक औषधांचा दुरुपयोग, गरिबी याविषयी ऐकतात. तसेच, रोग व मृत्यूची करुणाजनक दृश्ये ते पाहतात.
चर्चमध्ये ऐकलेल्या गोष्टींबद्दल विशेषकरून तेथे कधीही समजावून न सांगण्यात आलेल्या बाबींचा अशा व्यक्ती कदाचित विचार करू लागतील. देव प्रेमळ तसेच सर्वशक्तिमान आहे तर या भयंकर गोष्टी का घडतात? तसेच येशू ख्रिस्ताविषयी काय? स्पष्टतः, त्याला आज्ञाधारकतेने पुष्कळ गुडघे टेकत नाहीत.
[३ पानांवरील चित्रं]
देव जगावर आधिपत्य गाजवतो, तर एवढे दुःख व गोंधळ का आहे?