“आनंदी स्तुतीकर्ते” यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन
बायबल सूचनांचे तीन ज्ञानसंपन्न दिवस तुमची वाट पाहत आहेत. केवळ भारतातच १६ अधिवेशनांची आयोजना करण्यात आली आहे आणि कदाचित एखादे अधिवेशन तुमच्या जवळपासच्या भागात होईल. शुक्रवारी सकाळी ९:४० मिनिटांनी संगीताने कार्यक्रमाला सुरवात होईल तेव्हा तेथे उपस्थित राहा.
शुक्रवार सकाळचा कार्यक्रम, स्वागत अभिप्राय तसेच “संपूर्ण जगभरात आनंदी स्तुतीकर्ते या नात्याने अलिप्त राहा” हे प्रमूख भाषण सादर करील. दुपारचा कार्यक्रम तरुण, पालक आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करील. “मी विवाह करण्यास तयार आहे का?” हे भाषण युवकांना चुकवण्यास आवडणार नाही. “आपल्या मुलांमध्ये आनंद करणारे पालक” हे भाषण पालकांनी लक्षपूर्वक ऐकावे. दुपारचा कार्यक्रम “शिक्षण—यहोवाची स्तुती करण्याकरता त्याचा उपयोग करा” या भाषणाने समाप्त होईल. चर्चिलेल्या सर्व गोष्टींचा फायदा युवकांना शाळेमध्ये यशस्वी होण्यास मदतदायी ठरला पाहिजे.
शनिवार दुपारचा कार्यक्रम बाप्तिस्मा हा विषय सादर करील, तसेच बाप्तिस्मा घेण्याच्या योग्यतेचे असलेल्यांसाठी संधी पुरवील. आरंभीच्या काळात लोकांना फसविण्यासाठी सैतानाने लैंगिक वासनेचा कसा उपयोग केला त्याची प्रांजळ चर्चा दुपारी केली जाईल. त्यासोबतच, “दियाबलाचे पाश टाळा” हे जोरदार भाषण देखील असेल. आणि “मानवजातीला देवाच्या ज्ञानाची गरज का आहे” या महत्त्वपूर्ण भाषणाने कार्यक्रम समाप्त होईल.
रविवारी सकाळी, “या युगाच्या समाप्तीच्या काळातील आनंदी स्तुतीकर्ते” हा विषय असलेला परिसंवाद, लवकरच आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या आणि जगाला हादरवून टाकणाऱ्या घटनांवर आपले लक्ष केंद्रित करील. मत्तय २४:२१ मध्ये येशूने ज्या ‘मोठ्या संकटाबद्दल’ सांगितले त्याची सुरवात होण्याआधी सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याच्या निकडीवर तो परिसंवाद जोर देईल.
रविवार सकाळचा कार्यक्रम, “योग्यता प्राप्त झालेल्यांचा त्यांच्या उतारवयात सन्मान करणे” या नाटकाने समाप्त होईल. आणि मग दुपारी, “सनातन राजाची स्तुती करा!” हे जाहीर व्याख्यान सादर केले जाईल. हे व्याख्यान अधिवेशनाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य असेल.
उपस्थित राहण्यासाठी आत्ताच योजना करा. तुमच्या घराजवळचा अधिवेशनाचा पत्ता मिळवण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाशी संपर्क साधा किंवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना लिहा.