वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१५ पृ. ८-९
  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार स्वीडन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार स्वीडन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वृद्धीस इमारतीची गरज आहे
  • उल्लेखनीय वाढीमुळे जलद विस्ताराची आवश्‍यकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • राज्य सभागृहे—ती का व कशी बांधली जातात?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • पूर्व युरोपमध्ये सत्य उपासनेची अखंड वृद्धी
    आमची राज्य सेवा—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१५ पृ. ८-९

संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार स्वीडन

स्कॅन्डिनॅव्हियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस असणारे स्वीडन राष्ट्र उत्तर ध्रुव वृत्ताच्या वरपर्यंत पसरलेले आहे. सदाहरित जंगले आणि पर्वत याकरिता हे राष्ट्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे; विरळ लोकवस्ती असलेल्या युरोपातील राष्ट्रांपैकी स्वीडन हे एक राष्ट्र आहे. तरीदेखील, यहोवाच्या साक्षीदारांनी १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून सत्यावर प्रीती करणाऱ्‍यांचा यशस्वीपणे शोध घेतला आहे. अलीकडील उदाहरणाचा विचार करा.

महिला साक्षीदारासोबत एक स्त्री बायबलचा अभ्यास करत होती; परंतु हे तिच्या पतीला आवडत नव्हते. अभ्यास करण्याचे सोडून देण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला बजावले आणि तिने बायबल अभ्यास करण्याचे थांबवले. हा मनुष्य दारूच्या उत्पादन घटकांच्या संचयासाठी असणाऱ्‍या गोदामामध्ये कामास होता. एके दिवशी ट्रक ड्रायव्हर दहा वर्षाच्या त्याच्या नातवासह गोदामात आला. गाडीमध्ये माल भरतेवेळी मुलाकडे लक्ष देण्यासाठी आजोबांनी या माणसाला सांगितले. या मनुष्याने केवळ संभाषण सुरू करण्याच्या उद्देशाने मुलाला विचारले की, मागील वाढदिवसाला तुला कोणत्या भेटवस्तू मिळाल्या? मी आणि माझे कुटुंब यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे वाढदिवस साजरे करत नाहीत, मुलाचे हे उत्तर ऐकून तो चकितच झाला. वर्षाच्या इतर वेळी मला भेटवस्तू मिळतात तसेच मला उबदार आणि प्रेमळ कुटुंब मिळाल्यामुळे मी कोणत्याही गोष्टींपासून वंचित नाही, असे देखील मुलाने त्याला सांगितले. यापेक्षा कोणत्याही भेटवस्तू अधिक मौल्यवान नाहीत, असेही तो पुढे म्हणाला.

मुलगा त्याच्या आजोबांसह अनेक वेळा गोदामात परत गेला. हा मनुष्य प्रत्येक वेळी मुलाला अनेक प्रश्‍न विचारत असे आणि ज्यापद्धतीने या मुलाने त्याला न कचरता प्रामाणिक व स्पष्ट उत्तर दिले त्यामुळे तो फारच प्रभावीत झाला. मुलाच्या खऱ्‍या मूल्याबद्दलच्या गुणग्राहकतेमुळेही त्याचे हृदय हेलावून गेले. एकदा या मनुष्याने जगाच्या दयनीय स्थितीचे दर्शन घडवणारा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहिला आणि त्याला या गोष्टीची जाणीव झाली की, त्याने आध्यात्मिक गोष्टींचे अधिक गंभीरपणे परीक्षण करण्यास हवे. त्याच्या पत्नीबरोबर अभ्यास संचालित करणाऱ्‍या महिला साक्षीदाराशी त्याने दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि तिला पुन्हा एकदा आपल्या घरी बोलावले. लवकरच तो एका साक्षीदाराबरोबर बायबल अभ्यास करू लागला आणि त्याने शीघ्रतेने प्रगती केली. त्याने एप्रिल १०, १९९४ मध्ये बाप्तिस्मा घेतला. तसेच त्याच्या पत्नीचा सुद्धा आता बाप्तिस्मा झाला आहे.

वृद्धीस इमारतीची गरज आहे

स्वीडन इतर राष्ट्रांच्या अनेक निर्वासितांकरता एक घर आहे आणि त्यांना प्रचार करण्यात स्वीडनच्या साक्षीदारांना उत्तम परिणाम मिळालेले आहेत. सामान्यतः कार्यात एवढे यश मिळाले आहे की, या वाढीला सामावून घेण्यासाठी आता नवीन राज्य सभागृहांची आवश्‍यकता भासत आहे. सन १९८६ ते १९९३ पर्यंत ३७ राज्य सभागृहांची उभारणी त्वरित बांधकाम पद्धतीने करण्यात आली आणि ८ सभागृहांची दुरुस्ती करून त्यांचा विस्तार करण्यात आला. केवळ १९९४ मध्ये आणखी सात राज्य सभागृह उभारण्यात आले आणि तीन राज्य सभागृहांची दुरुस्ती करण्यात आली.

आज येथे ६५ अशा मंडळ्या आहेत ज्या नवीन राज्य सभागृह उभारण्याची किंवा सध्याच्या राज्य सभागृहामध्ये विस्तार किंवा त्याची दुरुस्ती करण्याची वाट पाहत आहेत. अशाप्रकारच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये सुमारे २,५०० स्वयंसेवक मदत करत आहेत आणि त्यांच्या प्रेमळ सहकार्याबद्दल मंडळ्या त्यांची फारच कदर करतात.

स्वीडनचा उत्तरेकडील प्रदेश उत्तर ध्रुव वृत्ताच्या वरपर्यंत पसरला आहे आणि काहीवेळेस या प्रदेशाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश असेही म्हटले जाते. कारण उन्हाळ्यात काही वेळा येथे सूर्याचा कधी अस्तच होत नाही. तथापि, संपूर्ण स्वीडनमध्ये सत्याच्या प्रकाशाचे देखील तेजस्वीपणे चकाकणे कायम आहे. यहोवाच्या आशीर्वादामुळे हा आध्यात्मिक प्रकाश मंद पडणार नाही तर उत्तरोत्तर तेजस्वीपणे प्रकाशित होत जाईल.

[८ पानांवरील चौकट]

राष्ट्राची रूपरेषा

१९९४ सेवा वर्ष

साक्ष देणाऱ्‍यांचा उच्चांक: २४,२४६

प्रमाण: ३६२ जणांसाठी १ साक्षीदार

स्मारक विधीची उपस्थिती: ४०,३७२

पायनियर प्रचारकांची सरासरी: २,५०९

बायबल अभ्यासांची सरासरी: ११,३०६

बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ८५०

मंडळ्यांची संख्या: ३५८

शाखा दप्तर: ॲरबोगा

[९ पानांवरील चित्रं]

ॲरबोगा येथील शाखा दप्तर आणि बेथेल गृह

[९ पानांवरील चित्रं]

जो येथील आरंभीच्या साक्षीदारांनी सुमारे १,९०० चौरस मैलाच्या क्षेत्रात प्रचार करण्यासाठी या मिनीबसचा वापर केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा