धर्म एक निषिद्ध विषय?
“मी दोन विषयांवर कधीच चर्चा करीत नाही: धर्म आणि राजनीती!” यहोवाचे साक्षीदार इतरांबरोबर बायबलविषयी बोलतात तेव्हा हा प्रतिसाद त्यांना नेहमी मिळतो. हा दृष्टिकोन समजण्याजोगा आहे.
राजनीतीबद्दल लोकांचा वाद सुरू झाला, की संतापाचा उद्रेक होऊन भांडणे लागू शकतात. पुष्कळ लोकांना माहीत आहे, की राजकरणी केवळ सत्ता, नावलौकिक आणि पैसा मिळवण्यासाठी झटत असतात आणि म्हणून ते त्यांच्या आश्वासनांना फसत नाहीत. दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेक वेळा राजकीय मतभेद हिंसेकडे निरवले जातात.
तुम्ही म्हणाल, ‘परंतु धर्माच्या बाबतीतही हे खरे नाही का?’ धार्मिक उत्कटतेने सध्याच्या दिवसांमध्ये पुष्कळ झगडे पेटवले नाहीत का? उत्तर आयर्लंडमध्ये रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, फार पूर्वीपासूनच एकमेकांच्या विरोधात होते. बाल्कन्स्मध्ये, पौर्वात्य कर्मठ चर्चचे सदस्य, रोमन कॅथलिक आणि इतर लोक, क्षेत्र मिळवण्यासाठी लढतात. याचा परिणाम? अघोरी कृत्ये आणि कायमचा द्वेष.
मृत्यूच्या भीतीचा सामना करावा लागत असल्यामुळे, अनेक जण त्यांचा स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास लपवण्याचा प्रयत्न करतात. आफ्रिकेत अनेक शतकांपासून ख्रिस्ती धर्मजगतातील लोक आणि इतर विदेशी तसेच विशिष्ट जमातीच्या धर्माच्या लोकांमधील धार्मिक युद्धांनी, पालकांना त्यांच्या मुलांना थोडे संरक्षण पुरविल अशी दोन नावे ठेवण्यास प्रवृत्त केले आहे. ही प्रथा आजही रूढ आहे. अशाप्रकारे एक मुलगा दुसरे नाव न वापरता एकाच नावाने एकतर चर्चचा सदस्य म्हणून किंवा दुसऱ्या धर्माचा असल्याची स्वतःची ओळख करून देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा धार्मिक विश्वास त्याचे जीवन गमावण्यास कारणीभूत ठरत असेल तर तो धर्माबद्दल उघडपणे बोलण्यास काकू करतो यात काही नवल नाही.
इतरांच्या जीवनाला काहीही धोका नसला तरीही धर्म हा त्यांच्यासाठी एक निषिद्ध विषय आहे. त्यांना अशी भीती वाटते की, वेगळ्या धर्माच्या व्यक्तीबरोबर त्यांच्या विश्वासाची बोलणी, निरर्थक वादविवादाकडे निरवील. आणखी इतरांना वाटते, की सर्व धर्म चांगले आहेत. ते म्हणतात, की एखादी व्यक्ती जो विश्वास बाळगते त्यात ती समाधानी असल्यास, भिन्नतेबद्दल बोलणे म्हणजे अर्थहीन कार्य होय.
धर्माच्या स्वरूपाचा अभ्यास करणारे विद्यार्थीच एकमेकांसोबत असहमत आहेत. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका “धर्माचा अभ्यास आणि वर्गीकरण” या आपल्या लेखात कबूल करतो की: “[धर्माच्या] स्वरूपाविषयी विद्वानांमध्ये क्वचितच एकमत राहिले आहे. . . . . अशाप्रकारे संपूर्ण इतिहासभरात, ह्या विषयाबद्दलचा वादविवाद गोवलेला आहे.”
एक शब्दकोश धर्माची व्याख्या “निर्माणकर्ता आणि विश्वाचा शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलौकिक शक्तीवर माणसाच्या श्रद्धेची आणि तिच्याबद्दलच्या हितकारक भयाची अभिव्यक्ती” अशी देतो. नक्कीच, जीवनात धर्माची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मानवी इतिहासाला आकार देण्यात धर्म एक सार्वत्रिक कारण निश्चितच बनले आहे. “धर्माच्या कोणत्या ना कोणत्या प्रकारातून जीवनाला व्यवस्था देण्याचा किंवा त्याला अर्थ देण्याचा, कोणत्याही समाजाने प्रयत्न केला नाही असे नाही,” अशी नोंद ऑक्सफर्ड इलस्ट्रेटेड एन्सायक्लोपिडिया ऑफ पिपल्स ॲण्ड क्लर्चस् करतो. जीवनाला “व्यवस्था” व “अर्थ” देणे या सारख्या मूलभूत गोष्टींचा समावेश असून धर्म नक्कीच वितंडवादापेक्षा काही तरी दुसऱ्या गोष्टीस पात्र आहे. उलटपक्षी, तो कोणा दुसऱ्याबरोबर चर्चा करण्यास पात्र आहे—म्हणजेच त्याच्यावर पूर्ण विचारविमर्श केला पाहिजे. पण कोणाबरोबर आणि त्यातून कोणता फायदा प्राप्त होऊ शकतो?