बायबल किती मूल्यवान आहे?
अलीकडेच ब्रिटीश ग्रंथालयाने, टिंडेल यांच्या इंग्रजीमध्ये भाषांतरीत केलेल्या ख्रिस्ती ग्रीक शास्रवचनाच्या एका प्रतीसाठी सुमारे पाच कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली. सुमारे ४६८ वर्षांपूर्वी ही प्रत प्रकाशित करण्यात आली आणि टिंडेल यांच्या बायबलच्या याच मूळ एकमेव अखंड आवृत्तीचा नाश करण्याच्या संपूर्ण प्रयत्नांपासून बचाव झाला होता. लंडनमध्ये हे बायबल प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
टिंडेल यांचे बायबल इंग्लडमधील ब्रिस्टॉल बॅप्टिस्ट या महाविद्यालयाकडून विकत घेण्यात आले आणि त्या ठिकाणी ते सन १७८४ पासून ठेवण्यात आले होते. या महाविद्यालयाच्या समितीचे उपाध्यक्ष डॉ. रॉजर हेडन यांनी म्हटले, “ही प्रत म्हणजे राष्ट्रीय, सांकृतिक व अतिमहत्त्वाचा ख्रिस्ती दस्ताऐवज आहे आणि आमची ही इच्छा आहे की, ही प्रत सर्वत्र सहज उपलब्ध व्हावी म्हणूनच आम्ही ती सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे.”
अनेक शतकांपासून बायबल बहुतेक लॅटिन भाषेत उपलब्ध होते आणि पाळक व प्रशिक्षित उच्चपदस्थ लोकच ते वाचू शकत होते. टिंडेल यांच्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या जॉन विक्लिफी यांच्याप्रमाणे टिंडेल यांची देखील हीच इच्छा होती की, सर्वांना वाचता येईल आणि आकलन होईल असे बायबल उपलब्ध करावे. त्यांना विरोध करणाऱ्या पाळकाला त्यांनी एकदा म्हटले, ‘मला आणखी जगण्यास परवानगी दिल्यास तुझ्यापेक्षा अधिक चांगल्यारीतीने शास्रवचन समजण्यासाठी मी एका नांगरधारी मुलाला समर्थ करील.’
सामान्य लोकांना शास्रवचने उपलब्ध करण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला पाळकांनी कडा विरोध केला होता त्यामुळे ही फारच जोखमीची कामगिरी होती. परिणामी, टिंडेल यांनी इंग्लडमधून जर्मनीला पलायन केले. तेथे त्यांनी मूळ ग्रीक भाषेतील “नवा करार” भाषांतरीत केला. सुमारे ३,००० प्रती छापण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांची गुप्तपणे इंग्लडमध्ये निर्यात करण्यात आली. लंडनच्या बिशपने त्याला शक्य होईल तेवढ्या प्रती शोधून त्या जमा केल्या आणि त्यानंतर सेंट पॉल या चर्चच्या प्रांगनामध्ये त्या जाळल्या. अखेरीस टिंडेल यांना पकडण्यात आले, त्यांची परीक्षा घेण्यात आली आणि सर्वमान्य धार्मिक मताविरुद्ध कार्य केल्याच्या आरोपावरुन त्यांना गुन्हेगार ठरविण्यात आले. सन १५३६ मध्ये त्यांना गळा दाबून मारण्यात आले आणि नंतर खांबावर जाळण्यात आले. हे किती मनोरंजक आहे की, बायबलची अगदी घृणा करणारे पाळक आता मात्र त्याचे मूल्य प्रचंड ठरवितात!
यहोवाचे साक्षीदार, अचूक ज्ञानाचा शोध घेणाऱ्या सर्वांना ते प्राप्त करुन देण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करतात. ते इतर भाषांतराची छपाई आणि वाटप करण्याव्यतिरिक्त त्यांनी मूळ भाषांमधून संपूर्ण बायबलचे अचूक तसेच वाचण्यास सोपे असे भाषांतर देखील केले आहे. न्यु वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर या बायबलच्या १९९५ पर्यंत १२ भाषांमध्ये ७,४०,००,००० पेक्षा अधिक प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. निश्चितच, जीवन-दान देणारा संदेश, हे प्रत्येक बायबलचे खरे मूल्य आहे.
[३२ पानांवरील चित्रं]
विल्यम टिंडेल