वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १/१५ पृ. ३२
  • लहान परंतु सामर्थ्यवान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लहान परंतु सामर्थ्यवान
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १/१५ पृ. ३२

लहान परंतु सामर्थ्यवान

कॅनडा येथील रॉबर्ट या तरुण पुरुषाने जीवनातील उद्देश शोधण्यासाठी युरोपचा प्रवास केला. त्याने पुष्कळ गोष्टी पाहिल्या ज्यामुळे भविष्याबद्दल तो निराश झाला.

सेवील, स्पेन येथे एका हॉटेलात बसलेला असताना, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली एक पत्रिका रॉबर्टला देण्यात आली. सुरवातीला, रॉबर्टला संशय आला. तो म्हणाला, “तथापि, मी ते वाचले. मी त्याचे वर्णन करू शकत नाही, परंतु अचानकपणे काहीतरी अर्थबोध झाला असे मला वाटले. मी केलेल्या प्रवासात, पुष्कळ प्रकारचे मानवी नैराश्‍य आणि अधःपात पाहिला होता आणि त्या गोष्टी बदलण्याची कुवत माझ्याजवळ नसल्याबद्दल मी खिन्‍न होतो. पत्रिका वाचल्यावर मी विचार केला, ‘हे “नवीन जग” अस्तित्वात येण्याची काही शक्यता आहे का?’ त्यानंतर मी विचार केला, ‘होय, कदाचित असेल.’”

नवीन आशेसह, रॉबर्टने कॅनडातील यहोवाच्या साक्षीदारांच्या दप्तराला लिहिले आणि तो परतल्यावर, त्याच्या घरी कोणी येऊन बायबल समजण्यास त्याला मदत करावी अशी विनंती केली.

उद्‌गारलेला शब्द सामर्थ्यवान आहे यात काहीच शंका नाही. तथापि, छापील संदेशाच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नये. कितीही लहान असली, तरी बायबल वर आधारित असलेली प्रकाशने जोरदारपणे अपीलकारक आहेत. ती मन व अंतःकरणावर प्रभाव पाडतात आणि भविष्यासाठी एक खात्रीदायक आशा प्रदान करतात.—इब्रीयांस ४:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा