तुम्हास आठवते का?
तुम्हाला टेहळणी बुरुज नियतकालिकाचे अलिकडील अंक तुमच्या व्यावहारिक मूल्याची होती असे दिसून आले का? तर मग पुढील प्रश्नांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या स्मरणशक्तीची चाचणी का घेऊ नये बरे:
▫ यहोवाचे साक्षीदार त्यांच्या शेजाऱ्यांना नेहमी भेटी का देतात?
यहोवाच्या साक्षीदारांना स्वतःला वाग्दत्त राज्याद्वारे मिळणारे देवाचे आशीर्वाद हवे आहेत तसेच त्यांच्या शेजाऱ्यांवरील प्रीतीने प्रवृत्त होऊन त्यांना देखील तेच आशीर्वाद मिळावेत असे त्यांना वाटते. अशाप्रकारे येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करून ते त्यांच्या शेजाऱ्यांवरील निःस्वार्थ प्रीतीमुळे त्यांना भेटी देतात. (मत्तय ६:९, १०; २२:३७-३९)—८/१५, पृष्ठे ८, ९.
▫ उत्क्रांतीची समजूत विश्वासाची एक बाब का आहे?
शास्त्रज्ञांनी, जीवनाचा नवा प्रकार निर्माण करणारे बदल,—फायदेकारक बदल—कधीच पाहिले नाहीत; तरीही उत्क्रांतीवादी दावा करतात की अशाच तंतोतंतपणे नव्या जाती अस्तित्वात आल्या. उत्क्रांतीवाद्यांनी जीवनाचे उत्परिवर्तन प्रत्यक्षात पाहिले नाही; तरीही याचप्रकारे जीवनाची सुरवात झाली असा ते आग्रह धरतात.—९/१, पृष्ठ ५.
▫ जीवनातील निर्बंधांद्वारे येणाऱ्या निरूत्साहाला आपण यशस्वीपणे कसे मात करू शकतो?
आपली परिस्थिती कोणतीही असो, आपण जे करु शकत नाही याविषयी चिंताक्रांत होण्याऐवजी जे करु शकतो यावर एकाग्र झालो तर जीवन अधिक समाधानी होईल आणि आपल्याला देवाच्या सेवेत आनंद मिळेल. (स्तोत्र १२६:५, ६)—९/१, पृष्ठ २८.
▫ क्षमा करण्याचे कोणते फायदे आहेत?
इतरांना क्षमा केल्याने चांगले नातेसंबंध प्रस्थापित होतात (इफिसकर ४:३२); ते सहमानवांबरोबरचीच नव्हे तर आंतरिक शांतीही मिळते (रोमकर १४:१९; कलस्सैकर ३:१३-१५); इतरांना क्षमा केल्याने, आपल्या पापांची क्षमा मिळण्याचा मार्ग मोकळा होतो (मत्तय ६:१४); तसेच, आपल्या स्वत:लाही क्षमेची गरज आहे याची आठवण करण्यास ते मदत करते. (रोमकर ३:२३)—९/१५, पृष्ठ ७.
▫ संदेष्टा आमोसचे उदाहरण आपल्याला आपल्या प्रचार कार्यात कसे मदत करते?
आमोसप्रमाणेच आम्ही देवाचा संदेश फेरफार किंवा त्याचे महत्त्व कमी करुन सांगत नाही. त्याऐवजी ऐकणाऱ्यांची कोणतीही प्रतिक्रिया असली तरीही आपण तो आज्ञांकितपणे घोषित करतो.—९/१५, पृष्ठ १७.
▫ आपण देवाच्या कोणत्या गुणलक्षणांचे अनुकरण करावे?
यहोवाची संघटनीय क्षमता आणि त्याचा आनंद ही दोन विशेष गुणलक्षणे आहेत. (१ करिंथकर १४:३३; १ तीमथ्य १:११) देवाची ही गुणलक्षणे संतुलित असल्यामुळे ते एकदुसऱ्याला हानी करण्यासाठी बनवलेली नाहीत.—१०/१, पृष्ठ १०.
▫ पालकांनी त्यांच्या मुलांना यहोवाची सेवा करण्यास मदत करणारी कोणती सकारात्मक पावले उचलली आहेत?
महत्त्वाची गुरूकिल्ली म्हणजे, लवकर सुरवात करा. कोवळ्या वयात असताना त्यांच्यावर जो ठसा उमटविला जातो व जे धडे शिकवले जातात ते जीवनभर टिकतील. (नीतीसूत्रे २२:६) त्यांना यहोवा तसेच सर्व सभांमधील त्याच्या उपासनेला अधीनता व आदर दाखवण्यास शिकवणे अतिशय महत्त्वाचे आहे. यशस्वी पालक त्यांच्या मुलांच्या चुकीच्या प्रवृत्तींना ओळखण्यास शिकतात व ते त्यांच्या मुलांना त्या दुरूस्त करण्यास मदत करतात. (नीतीसूत्रे २२:१५) शेवटी, तुमचे मूल तर्कशुद्धपणे जे साध्य करू शकेल अशी ईश्वरशासित ध्येये त्याच्यासमोर ठेवण्यास बालपणापासूनच सुरवात करा.—१०/१, पृष्ठे २७-८.
▫ आपण यहोवाच्या क्षमाशीलतेच्या कोणत्या भिन्न लक्षणाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?
यहोवा क्षमा करतो व विसरतो. (यिर्मया ३१:३४) मानवप्राण्यांना असे करणे कठीण जाते. मत्तय ६:१४, १५ मध्ये लिहिल्यानुसार येशूने असे करण्याच्या महत्त्वावर जोर दिला.—१०/१५, पृष्ठे २५-६.
▫ आपण दयाळू बनण्यामध्ये कोणती तीन अडखळणे आहेत?
आपल्या पापमय स्वभावामुळे, मत्सराची भावना आपल्या अंतःकरणात सहजपणे मूळ धरु शकते. आपण कोणाविषयीही मत्सर बाळगल्यास, त्यांना कनवाळूपणे वागवणे कसे जमेल? आणखी एक अडथळा म्हणजे, अनावश्यकपणे स्वतःला हिंसाचाराच्या प्रभावाखाली आणणे. यामुळे आपल्याला इतरांच्या दुःखाबद्दल काहीच वाटत नाही. शिवाय, आत्मकेंद्रित व्यक्ती देखील दया दाखवण्यात उणी पडू शकते. (१ योहान ३:१७)—११/१, पृष्ठे १९, २०.
▫ ईयोबाबद्दलच्या शास्त्रवचनीय अहवालातून कोणते धडे शिकता येतात?
ईयोबाचा अहवाल आपल्याला सैतानाच्या युक्त्यांविषयी अधिक सावध करतो व यहोवाचे सार्वभौमत्व मानवाच्या सचोटीशी कसे संबंधित आहे हे पाहण्यास आपल्याला मदत करतो. ईयाबाप्रमाणे देवावर प्रीती करणाऱ्या सर्वांचीच परीक्षा झाली पाहिजे. आपणही ईयाबाप्रमाणे टिकून राहू शकतो, सैतानाला लबाड शाबीत करू शकतो आणि देवाच्या राज्याच्या आशीर्वादांचा आनंद उपभोगू शकतो.—११/१५, पृष्ठ २०.
▫ वडीलवर्गाचे अध्यक्ष प्रत्येक वडिलांना योग्य मान्यता कशी दाखवू शकतात?
वडील वर्गाच्या अध्यक्षांनी शक्य तेव्हा, इतर वडिलांना एक कार्यक्रमसूची आगाऊ द्यावी जेणेकरून ज्या विषयांवर बोलणी केली जाणार आहे त्यावर त्यांना काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक विचार करण्यास वेळ मिळेल. वडिलांच्या सभेदरम्यान, अध्यक्ष इतर वडिलांना बोलू न देता स्वतःच सर्व मते ठरवणार नाहीत, तर चर्चा केल्या जाणाऱ्या विषयावर ‘प्रशस्तपणे बोलण्याचे’ उत्तेजन देतील. (१ तीमथ्य ३:१३, NW)—१२/१, पृष्ठ ३०.