वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ११/१ पृ. ३-४
  • मानवी दुःख त्याचा कधी अंत होईल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मानवी दुःख त्याचा कधी अंत होईल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • देवाला आपलं दुःख कळतं का?
    सावध राहा!—२०१५
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • दुःखितांना सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • दुःख सहन करणे आपल्याकरता लाभदायक ठरू शकते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ११/१ पृ. ३-४

मानवी दुःख त्याचा कधी अंत होईल का?

सारायेवोच्या गजबजलेल्या बाजारात झालेल्या बाँम्ब स्फोटानंतरची ती भयानक दृश्‍ये; र्‌वांडा येथील असहाय लोकांची कत्तल आणि हिंसाचारयुक्‍त अशांतता; अन्‍नासाठी ओरडणारी सोमालियातील उपाशी मुले; लॉस ॲन्जेलेस येथे झालेल्या भूकंपानंतर आपले किती सामान गमावले त्याची पाहणी करणारी गोंधळून गेलेली कुटुंबे; पुरामुळे नासधूस झालेल्या बांगला देशातील असहाय बळी. मानवी दुःखाची अशी दृश्‍ये आम्हाला रोज टीव्ही किंवा मासिक व वृत्तपत्रात पाहावयास मिळतात.

मानवी दुःखाचे हे विषण्ण परिणाम काही लोकांचा देवावरचा विश्‍वास कमी करण्यास कारणीभूत होत आहे. अमेरिकेतील एका यहुदी धार्मिक गटाने प्रकाशित केलेल्या एका विधानानुसार, “दुष्टता अस्तित्वात असल्यामुळेच विश्‍वास ठेवण्यावर नेहमीच गंभीर बांध घातला जातो.” नात्सी छळछावण्यात झालेले मृत्यू, ऑस्विट्‌झप्रमाणे व बाँम्बमुळे झालेले मृत्यू, हिरोशिमात स्फोट झाल्याप्रमाणे आहेत असे लेखक म्हणतात. “एक न्यायी आणि शक्‍तिशाली देव, इतक्या निरपराध लोकांचा नाश होण्यास परवानगी कशी देतो, हा प्रश्‍न धार्मिक विवेक असलेल्या व्यक्‍तीला सतावतो व गोंधळात टाकतो,” असे हे लेखक म्हणतात.

दुःखाची गोष्ट अशी की, वारंवार ऐकायला मिळणाऱ्‍या शोकांतिकेच्या ह्‍या बातम्या मानवी भावनांना बधिर करू शकतात. जोपर्यंत मित्र आणि नातेवाईकांवर अशी संकटे येत नाहीत तोपर्यंत, अनेकांना इतरांच्या दुःखाबद्दल सहसा इतके वाईट वाटत नाही.

तरीही, आपणाला दया वाटण्याची निदान आमच्या स्वतःच्या प्रिय जणांसाठी तरी क्षमता असते, या वस्तुस्थितीने आपल्याला आमच्या सृष्टिकर्त्याबद्दल काहीतरी सांगितले पाहिजे. बायबल म्हणते की, मानवाला ‘देवाच्या प्रतिरूपाचे’ व ‘[त्याच्या] सदृश्‍य’ असे बनवण्यात आले होते. (उत्पत्ती १:२६, २७) याचा असा अर्थ होत नाही की, मानवांचे रूप देवासारखे आहे. नाही, कारण येशूने वर्णन दिले की, “देव आत्मा आहे,” व “आत्म्याला मांस व हाडे” नसतात. (योहान ४:२४; लूक २४:३९, पं.र. भाषांतर) देवाच्या प्रतिरूपात बनवले गेले हे देवासमान गुण प्रदर्शित करण्याच्या संभवतेला सूचित करते. यास्तव, सर्वसामान्य मानवांना दुःख भोगणाऱ्‍यांवर दया येत असल्यामुळे आम्ही या निष्कर्षास येऊ शकतो की, मानवाचा सृष्टिकर्ता, यहोवा देव दयाळू आहे व त्याला दुःख भोगणाऱ्‍या त्याच्या मानवी सृष्टिबद्दल दया वाटते.—पडताळा लूक ११:१३.

देवाने त्याची दया, दुःखाचे कारण काय आहे याचे मानवजातीला लिखित विवरण देऊन प्रकट केली आहे. हे त्याने त्याचे वचन, बायबल यात लिहिले आहे. बायबल स्पष्टपणे दाखवते की, देवाने मानवाला जीवनाचा आनंद लुटण्यासाठी निर्माण केले होते, दुःख भोगण्यासाठी नव्हे. (उत्पत्ती २:७-९) पहिल्या मानवांनी देवाच्या नीतीमान शासनाला धिक्कारून स्वतःवर दुःख ओढवून घेतले हेही ते प्रकट करते.—अनुवाद ३२:४, ५; रोमकर ५:१२.

असे असतानाही, देवाला अजूनही दुःखी मानवजातीविषयी दया आहे. मानवी दुःखाचा तो अंत करणार आहे या त्याने दिलेल्या अभिवचनावरून हे स्पष्ट दिसून येते. “पाहा! देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे; त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४; यासोबत यशया २५:८; ६५:१७-२५; रोमकर ८:१९-२१ देखील पाहा;

ही आश्‍चर्यचकित अभिवचने शाबीत करतात की, देवाला मानवी दुःखाची जाणीव आहे व त्याने त्याचा अंत करण्याचा ठाम निश्‍चय केला आहे. परंतु सुरवातीलाच मानवी दुःखाला नक्की कोणती गोष्ट कारणीभूत ठरली, आणि देवाने तिला आमच्या दिवसापर्यंत चालू राहण्यासाठी अनुमती का दिली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा