प्रेमाच्या शब्दातील सामर्थ्य
“चिंतेच्या मनावरील दडपणामुळे माणूस वाकून जातो; प्रेमाच्या शब्दाने मन प्रसन्न होते.”—नीतीसूत्रे १२:२५, कॉमन लँग्वेज भाषांतर.
ख्रिस्ती पूर्णतः विपत्तीपासून सुरक्षित नाहीत. ‘शेवटल्या काळातील कठीण दिवसात’ जगत असल्यामुळे काहीवेळा ते चिंतेचा अनुभव घेतात.—२ तीमथ्य ३:१.
अशा दुःखद घटनांना तोंड देत असताना; विश्वासू मित्राकडून प्रेमाचे शब्द ऐकणे हा किती मोठा आशीर्वाद आहे! बायबल असे म्हणते, “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतीसूत्रे १७:१७) निष्ठावान मनुष्य ईयोब अशाप्रकारचा मित्र असल्याचे ज्ञात होते. अलीफजसुद्धा त्याच्याविषयी म्हणालाः “तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहे, लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत.”—ईयोब ४:४.
तथापि, जेव्हा स्वतः ईयोबाला धैर्याची आवश्यकता होती तेव्हा अलीफज आणि त्याच्या सोबत्यांनी प्रेमाचे शब्द व्यक्त केले नाहीत. गुप्ततेत काहीतरी अपराध केल्यामुळे त्याच्यावर हे संकट आले, अशाप्रकारचा दोषारोप त्यांनी ईयोबावर केला. (ईयोब ४:८) द इंटरप्रीटर्स बायबल विवेचन देते: “ईयोबाला मनुष्याकडून मनःपूर्वक दयेची गरज होती. परंतु त्याला ‘सत्य’ आणि साचेबंद धार्मिक सांप्रदाय ऐकण्यास मिळाले.” अलीफज आणि त्याच्या सोबत्यांचे भाष्य ऐकल्यानंतर अस्वस्थ झालेल्या ईयोबाला आक्रोश करण्यास भाग पाडण्यात आले: “तुम्ही कोठवर माझ्या जिवास दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार?”—ईयोब १९:२.
आपण, आपल्या अविचारी आणि अव्हेलनात्मक शब्दांमुळे देवाच्या सहउपासकांना दुःखामुळे आक्रोश करावयास लावू नये. (पडताळा अनुवाद २४:१५.) बायबलचे नीतीसूत्र असा इशारा देते: “तुम्ही जे बोलाल त्याद्वारे जीवन वाचविले जाते अथवा नाश केले जाते; म्हणून तुमच्या शब्दांमुळे होणाऱ्या परिणामांचा स्वीकार तुम्ही केलाच पाहिजे.”—नीतीसूत्रे १८:२१, टीईव्ही.
बोलण्याच्या सामर्थ्याची जाण ठेवून, आपण प्रेषित पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करुया. पौल मासेदोनियामध्ये असताना, “अनेक उत्तेजनपर शब्दांनी त्याने बोध केला.”—प्रेषितांची कृत्ये २०:२, सुबोध भाषांतर.