वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ७/१ पृ. ३-४
  • विभाजित चर्च ते किती वाईट आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विभाजित चर्च ते किती वाईट आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चर्च किती विभाजित आहे?
  • दुहेरी दर्जे
  • “तुम्हामध्ये फुटी होऊ नयेत”
  • विभाजित चर्च त्याचा बचाव होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ७/१ पृ. ३-४

विभाजित चर्च ते किती वाईट आहे?

“एक मोठे आणि चकित झालेले कुटुंब, ढासळून पडण्याच्या मार्गावर असलेल्या व ज्याच्या समोरील भिंती अचानक कोसळल्या अशा घरात राहते त्याप्रमाणे, जवळजवळ प्रत्येक खोलीत “येशूची मुले” नावाच्या गटाचे सदस्य, कानठळ्या बसतील असा डफ वाजवत गोंगाटा करून, काळे रेशमी वस्त्र परिधान केलेल्या सभ्य अँग्लो-कॅथलिक पुरूषगमन करणाऱ्‍या लोकांवर किंचाळत आहेत.”—द संडे टाईम्स, लंडन, एप्रिल ११, १९९३.

हे कुटुंब चर्च ऑफ इंग्लंड आहे. स्त्रियांना पाळकत्व देण्याविषयीचा तो गोंगाट आहे. भयंकर विभक्‍ततेचे सचित्र वर्णन, सर्व ख्रिस्ती धर्मजगताला लागू होते. कर्मठ चर्चचे कुलपिता आणि पोप यांनी, स्त्रियांनी पाळक होण्याच्या निर्णयाला धिक्कारल्यामुळे झालेला एकूण परिणाम, त्याविषयी एक अहवाल सांगतो की, “ख्रिस्ती धर्मजगताचे बाकीच्या भागासोबत पुनर्मिलनाच्या स्वप्नाची पूर्तता अशक्य कोटीतली आहे.”

चर्च किती विभाजित आहे?

आम्ही मत्तय ७:२१ मध्ये वाचतो त्याप्रमाणे, येशू ख्रिस्त म्हणाला की, अनेक जण त्याला प्रभुजी असे म्हणून त्याच्यावर विश्‍वास असल्याचा दावा करतील परंतु तरीही, ‘त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यात’ अपयशी ठरतील. मॅक्लिन्स मासिक असे निरीक्षण करते: “तारणाचा शोध करणाऱ्‍या मत्तयाच्या वाचकांचा, देवाची इच्छा म्हणजे नक्की काय आहे याविषयी गोंधळ झाला आहे म्हणून त्यांची क्षमा केली जाऊ शकते, परंतु ख्रिस्ती लोकांचे आणि त्यांच्या चर्चचे या प्रश्‍नावर गहनरीत्या मतभेद आहेत.” कॅनडीयन लोकांमधील चाचणीनंतर, त्या मासिकाने अशी समाप्ती केली की, “कॅनडीयन ख्रिस्ती लोकांचा विश्‍वास आणि प्रथांमध्ये प्रचंड वैचित्र्य आहे—वास्तविक पाहता, विविध पंथाच्या सदस्यांमधील तफावतीपेक्षा एकाच पंथातील सदस्यांमध्ये अधिक तफावत आहे.”

एका पाहणीनुसार, ९१ टक्के कॅथलिक, त्यांच्या चर्चने नकार केलेला असला तरी, कृत्रिम संततिनियमनाचा वापर करण्याला संमती देतात; ७८ टक्के लोक विचार करतात की, स्त्रियांना पाळक बनण्यास परवानगी दिली पाहिजे; आणि ४१ टक्के लोक, “विशिष्ट परिस्थितीत” गर्भपात करण्यास स्वीकार करतात. “ईश्‍वरशास्त्रीय प्रश्‍नांच्या समूहावरील” विविध पंथाचा मतभेद, “प्रचलित चर्चच्या विघटनाला कारणीभूत असणाऱ्‍या विभक्‍तीला अधोरेखित करते” असे मॅक्लिन्स म्हणते.

दुहेरी दर्जे

दुहेरी दर्जे तसेच परस्परविरोधी दर्जे नैतिकतेवर आहेत. काही जण पवित्र शास्त्राच्या तत्त्वाला उंचावून धरत असल्याचा दावा करतात, तर इतर त्यांचा उद्दामपणे विरोध करतात. उदाहरणार्थ, टोरंटो येथील मेट्रोपॉलिटन चर्चमध्ये, दोन लेसबियन लोकांचा झालेला “विवाह” समारंभ, देवाच्या इच्छेच्या अनुरूप होता का? त्यात सहभाग घेणाऱ्‍यांचा तसा ग्रह होता. ते म्हणाले, “आम्हाला आमची प्रीती जाहीरपणे आणि देवासमोर साजरी करायची आहे.”

एका स्तंभलेखकाने विचारले की, “एका कॅथलिक मुख्य धर्माध्यक्षावर इतक्या तक्रारी दाखल केल्या असतानाही, लहान मुलांना लैंगिकतेच्या विकृतीला बळी पाडणाऱ्‍या पाळकांना, सेवा करणारे ॲल्टर बॉईज (मुले) भेटतील म्हणून, दुसऱ्‍या चर्चमध्ये पाठवलेच कसे. पाळक ॲन्ड्रु ग्रिली सुचवितात की, २,००० ते ४,००० पाळकांनी, अजूनही वयात न आलेल्या १,००,००० बळी पडलेल्यांबरोबर अनुचित व्यवहार केले आहेत, आणि अनेकवेळा त्याबद्दल काहीच केले जात नाही.

विभक्‍त चर्च, फुटीर लोकांनाच निर्माण करते. बालकन्स्‌ या राष्ट्रात, “ख्रिस्ती” सरबियन आणि क्रोट्‌सना वाटते की, ख्रिस्त त्यांच्या “धार्मिक” युद्धात त्यांच्यासोबत आहे. अनेक जण युद्धात लढावयास जाताना गळ्यात क्रुस घालतात, त्याविषयीचा अहवाल म्हणतो की, एक व्यक्‍ती तर, “युद्ध जेव्हा अधिक तीव्र होत होते तेव्हा तो क्रुस त्याच्या तोंडात धरून लढत असे.”

“तुम्हामध्ये फुटी होऊ नयेत”

हे खरे आहे की, पवित्र शास्त्र काही बाबतींना विवेकावर सोपवून देते. परंतु त्यामुळे अशा प्रकारच्या फुटींना काही स्थान राहू नये. प्रेषित पौलाने स्पष्टपणे ही गोष्ट मांडली: “तुम्हा सर्वांचे बोलणे [आणि वागणे] सारखे असावे . . . आणि तुम्हामध्ये फुटी होऊ नयेत.”—१ करिंथकर १:१०, पंडिता रमाबाई भाषांतर; इफिसकर ४:१५, १६.

प्रेषित पौलाने हे शब्द लिहिल्यानंतर दोन हजार वर्षांनंतरच्या “ख्रिस्ती धर्माकडे” प्रामाणिकपणे दृष्टिक्षेप टाकल्यावर, काही फार गंभीर प्रश्‍न सामोरे येतात. “ख्रिस्ती” इतके विभाजित का आहेत? अशा प्रकारच्या विभाजित चर्चचा बचाव होईल का? संयुक्‍त ख्रिस्ती धर्मजगत कधी होईल का? पुढील लेख या प्रश्‍नांवर विचार करील.

[३ पानांवरील चित्रं]

गर्भपाताविरुद्ध पाळकांचे निदर्शन

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा