दहा वर्षांपासून एककालीन!
दहा वर्षाआधी इंग्रजीसोबत स्पॅनिश भाषेत वॉचटावर एककालीन आवृत्ती प्रकाशित होण्यास आरंभ झाला तेव्हा एका स्नेही स्पॅनिश बहिणीला त्याबद्दल कसे वाटले हे विचारले असता, तिने प्रतिसाद दिला: ‘मला तो एक आशीर्वादच वाटला कारण आता आपण बरोबर आहोत, तुम्ही ते इंग्रजीत कसे व्यक्त कराल? इंग्रजीत म्हणायचे तर सर्वदा मी (यहोवाच्या) संघटनेविषयी विचार करते. आम्ही संघटनेचा उल्लेख “ममा” (आई) प्रमाणे करतो. आम्हाला तिच्या अगदी निकटच्या सहवासात असल्याचे वाटते. तो सहवास सुरेख आहे. तो अद्भुत आहे! होय ना!’
या विश्वासू बहिणीने इंग्रजी वाचता न येणाऱ्या अनेक वाचकांच्या भावना प्रकट केल्या. गत काळामध्ये, इंग्रजी भाषेत प्रकाशित झाल्यानंतर सहा महिन्यांनी ते लेख स्पॅनिश भाषेच्या वॉचटावर आवृत्तीत येत होते. इतर भाषेत देखील असाच उशीर होत होता. तेच साहित्य इतर अनेक भाषेत देखील एकाच वेळी प्रकाशित करण्याची उत्कट इच्छा होती हे समजण्याजोगे आहे.
यास्तव, एप्रिल १, १९८४ पासून इंग्रजी आवृत्तीसोबत स्पॅनिश आवृत्ती ही पहिली एककालीन आवृत्ती ठरली. त्यानंतर इतर भाषा देखील (एककालीन) झाल्या. १९८५ च्या आरंभाला, २३ भाषेतील आवृत्त्या एककालीन होत्या. अधिक भाषांतरकार आल्यावर त्यांना प्रशिक्षण दिले तसे, इतर अनेक भाषांच्या आवृत्त्या इंग्रजीच्या बरोबरीने आल्या.
वॉचटावरचा स्पॅनिश भाषेतील नियतकालिकाचा हा अंक एककालीन प्रकाशनाचे दहावे वर्ष चिन्हित करतो. वॉचटावर आता ११६ भाषेत प्रकाशित होते, त्यापैकी ८५ एककालीन आहेत. याचा अर्थ, वॉचटावर अंकाच्या सरासरी १६,१,००,००० उत्पादनाच्या ९९.३ टक्के प्रतींचे उत्पादन एकाच प्रकारचे मुखपृष्ठ व लेखांची रचना असे केले जाते. साप्ताहिक वॉचटावर अभ्यासाला उपस्थित राहणाऱ्या, ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लोक एकाच वेळी एकाच प्रकारच्या साहित्याचा अभ्यास करतात.
वॉचटावर मासिकाच्या जोडीचे अवेक! मासिक आता त्याच्या ७४ भाषांपैकी ३७ भाषेत एककालीन आवृत्तीत प्रकाशित होते. यहोवाच्या साक्षीदारांचा वार्षिक अहवाल दर वर्षी १८ भाषांमध्ये प्रकाशित होतो. असे एककालीन प्रकाशन, देवाच्या लोकांना “एकचित्ताने व एकमताने” जोडण्यास मदत करते.—१ करिंथकर १:१०.