वाट पाहण्याचे शिकून घेणे याची समस्या
आम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी थांबून राहणे कदाचित आम्हा मानवांना शिकून घेण्याचा सर्वात कठीण धडा आहे हे स्वीकारण्याची गरज आहे. लहान मुले स्वभावानेच अधीर असतात. कोणत्याही गोष्टीवर त्यांचे लक्ष गेले की त्यांना ती हवी असते, व त्यांना ती लगेच हवी असते! परंतु तुम्हाला हे अनुभवाने माहीत झाले आहे की, उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींना मागणी नाही व त्याचा विचार केला पाहिजे. इतकेच नव्हे तर कायदेशीर इच्छांची पूर्ती होण्यासाठी आम्ही थांबून राहण्याचे शिकले पाहिजे. अनेक लोक हा धडा शिकतात; तर इतरजण कधीही शिकत नाही.
ज्या लोकांना ईश्वरी सम्मती मिळवायची आहे त्यांना थांबून राहण्यासाठी चांगले कारण आहे. यहोवाचा ख्रिस्तपूर्व सेवक यिर्मया याने हे स्पष्ट केले: “परमेश्वरापासून [यहोवा, न्यूव.] येणाऱ्या तारणाची वाट पहाणे आणि तीही मुकाट्याने पहाणे बरे आहे.” पुढे ख्रिश्चन शिष्य याकोबाने लिहिले: “अहो बंधूनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा.”—विलापगीत ३:२६; याकोब ५:७.
यहोवाकडे त्याच्या ईश्वरी उद्देशांची पूर्णता करण्याचे स्वतःचे एक वेळापत्रक आहे. काही गोष्टींना साध्य करण्यासाठी आम्ही त्याच्या नियुक्त वेळेपर्यंत वाट पाहू शकलो नाही तर, आम्ही असमाधानी आणि असंतुष्ट होऊ व त्यामुळे आमच्या आनंदाला बांध घातला जाईल. नहेम्याने जसे त्याच्या देशबांधवांना सांगितले त्याप्रमाणे आनंदाविना देवाचा सेवक आध्यात्मिकतेत कमजोर होईल: “यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे.”—नहेम्या ८:१०, पंडिता रमाबाई भाषांतर.
वाट पाहत राहण्याचे शिकण्यातील सुज्ञता
अविवाहित व्यक्तिला विवाह करण्याची किंवा मूल नसलेल्या जोडप्यांना मुले असण्याची एक स्वाभाविक इच्छा असते. शिवाय, योग्य असलेल्या भौतिक गरजा आणि इच्छांना पूर्ण करण्याची इच्छा बाळगणे चुकीचे नाही. तरीसुद्धा, लवकरच या सद्य व्यवस्थिकरणाचा अंत होईल आणि येणाऱ्या नवीन व्यवस्थेत देव ‘आपली मूठ उघडून प्राणिमात्रांची इच्छा पूरी करील,’ हा विश्वास ठेवल्याने अनेक ख्रिश्चनांनी यातील काही इच्छांना पूर्ण करण्यासाठी अधिक उचित वेळेपर्यंत वाट पाहत राहण्याचा निर्णय घेतला आहे.—स्तोत्रसंहिता १४५:१६.
तथापि, या मजबूत ख्रिश्चन आशेविना असलेले लोक विलंब लावण्यासाठी क्षुल्लक कारण शोधतील. “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्या, यहोवावरील विश्वासाच्या अभावामुळे, आणि ती दाने मिळण्याबाबतच्या शंका बाळगल्याने त्या गोष्टी भवितव्यासाठी राखून ठेवण्यात काय सुज्ञता आहे असा ते प्रश्न करतात. म्हणून ते या संप्रदायाप्रमाणे जगतात की: “चला आपण खाऊ पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.”—याकोब १:१७; १ करिंथकर १५:३२; यशया २२:१३.
समृद्ध देशात, जाहिरातीचा व्यापार, त्वरीत समाधान झाले पाहिजे या स्पष्ट झोकाचा फायदा घेतात. लोकांना त्यांचे फाजील लाड पुरवण्यासाठी उत्तेजन दिले जाते. वाणिज्य आज आम्हाला असा विश्वास करावयाला लावत आहे की, आधुनिक सुविधा आणि सुखसोयी अगदीच आवश्यक आहेत. खासपणे क्रेडीट कार्ड, हप्त्याच्या योजना, आणि “आता खरेदी करा—पैसे नंतर भरा” या योजना सर्व वस्तू प्राप्त करून देतात व लगेच मिळवून देऊ शकतात तर त्यांच्याशिवाय का राहावे? असे आर्जवले जाते. त्याव्यतिरिक्त, ‘जे उत्तम ते तुम्हाला मिळालेच पाहिजे; स्वतःची काळजी घ्या! लक्षात ठेवा, आत्ता त्याचा आनंद घेतला नाही तर कदाचित तो कधीच घेता येणार नाही!’ असा दावा लोकप्रिय घोषवाक्ये करतात.
या दरम्यान, समृद्ध देशातील करोडो लोकांजवळ भरणपोषणासाठी जेमतेम वस्तू आहेत, किंवा त्याही पेक्षा कमी प्रमाणात आहेत. मानवी राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेच्या उणीवेबद्दल याहीपेक्षा हुबेहुब वर्णन कोणी करील का?
लक्षावधी लोक थांबण्यासाठी इच्छुक नसल्यामुळे किंवा असे करण्यामागे त्यांना कोणतेही कारण दिसत नसल्याने, तातडीच्या गरजा भागविण्यासाठी कर्जबाजारी झाले आहेत यावरून वाट पाहत राहण्यात सुज्ञता आहे हे दिसून येते. आजारपण आणि बेरोजगारी यासारख्या अकल्पित समस्या म्हणजे एक प्रकारची विपत्तीच होय. जर्मनीतील १० लाख लोकांना घरे नाहीत असा अहवाल का दिला आहे याविषयी फ्रँकफर्ट आलिजिमिन झिटुंग हे जर्मन वर्तमानपत्र स्पष्ट करते: “वैशिष्ट्यपूर्णपणे, बेघरपणा हा अनेकदा बेरोजगारी आणि बेसुमार कर्जामुळे आलेला आहे.”
त्यांचे बिल भरता न आल्याने, अशा अनेक दुर्दैवी जणांना त्यांचे घर आणि मालमत्ता गमावल्यामुळे दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो. अनेकदा सर्व, वाढत्या तणावामुळे कुटुंबावर ताण आणला जातो. डळमळीत विवाह तुटू लागतात. नैराश्य आणि इतर स्वास्थ्याच्या समस्या अगदी साधारण होतात. ख्रिश्चनांच्या बाबतीत, आध्यात्मिकतेवर त्याचा परिणाम होतो, व यामुळे चुकीचे विचार आणि त्यानंतर अयोग्य वर्तनाकडे निरवले जाऊ लागते. सर्व गोष्टी पाहिजेत असे समजून सुरवात केलेल्या लोकांजवळ शेवटी जवळजवळ काहीच शिल्लक राहत नाही.
पुष्कळांसाठी एक नवीन आव्हान
येशूने स्पष्ट केले की आम्ही या गोष्टीविषयी सावध असले पाहिजे कारण: “प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात.” (मार्क ४:१९) येशूने सांगितलेल्या चिंता, तसेच आर्थिक चिंता पूर्णपणे काढून टाकण्यात कोणत्याही राजकीय व्यवस्थेला यश आले नाही हे आम्ही लक्षात ठेवावे.
पूर्व युरोपातील देशांनी आता नाकारलेल्या कम्युनिस्ट तत्त्वप्रणालीने सरकार नियंत्रित आर्थिकतेच्याद्वारे संतुलित कारभार करण्याचा प्रयत्न केला होता. खाजगी उद्योगधंद्यांना संघटित करणे आणि लाभासाठी कोणत्याही व्याजाव्यतिरिक्त अशा स्पर्धात्मक व्यवस्थेत सरकारने चालविलेला खुला व्यापार, याच्या तुलनेत, कम्युनिस्ट शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या आधीच्या आर्थिक व्यवस्थेने त्या देशातील लोकांना काही आर्थिक सुरक्षितता पुरवली होती, ती देण्यासाठी अनेकदा भांडवलशाही अपयशी होत आहे. तरीदेखील येशूने सांगितलेल्या चिंता मानवी इच्छांचे समाधान करणाऱ्या मालाची कमतरता आणि कमी वैयक्तिक स्वातंत्र्य या प्रकारात बाकी राहिल्या.
सध्या, त्यातील अनेक देशात गिऱ्हाईकाने खरेदी करणे आणि उत्पादकाने विकणे यावर आर्थिक उलाढाली चालू आहेत, त्यामुळे त्यांच्या नागरिकांसमोर नवे आव्हान प्रस्तुत होत आहे. अलिकडचा एक अहवाल म्हणतो: “पाश्चात्य देशाच्या राहणीमानाच्या दर्जाप्रत त्वरीत पोहचण्याच्या इच्छेला निष्कपटपणाची जोड दिली जात आहे.” हे साध्य करण्यासाठी पूर्व जर्मनी येथील नवीन लाँडर येथील अधिकाधिक लोक अशा कर्जात पडत आहेत की ज्यामधून कधीही ते मुक्त होऊ शकणार नाहीत.” तो अहवाल पुढे असे म्हणतो: “नवीन आर्थिक मुक्ततेच्या प्राथमिक अत्यानंदावर आता भय आणि नैराश्य पसरत आहे.” कम्युनिस्ट व्यवस्थेचा भांडवलशाहीत बदल झाला आहे परंतु चिंता तशाच राहिल्या आहेत.
चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी मोठ्या राजनैतिक आणि आर्थिक मुक्ततेने नवीन शक्यता मोकळ्या केल्या आहेत. यास्तव, अनेक जणांची, त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पनेची किंवा चांगल्या नोकरीसाठी दुसऱ्या देशात जाण्याबद्दल अधिक गंभीर विचार करण्याची परीक्षा घेतली जाऊ शकते.
अशा प्रकारचे निर्णय घेणे ही वैयक्तिक बाब आहे. एखाद्या ख्रिश्चनाने त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा करणे चुकीचे नाही. कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आणि “जर कोणी स्वकीयांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे” याची जाणीव असल्यामुळे त्याच्याठायी ती भावना प्रखर होणे साहजिकच आहे.—१ तीमथ्य ५:८.
या कारणामुळे, इतर जो निर्णय घेतात त्याबद्दल त्यांची टीका करणे अयोग्य आहे. त्याच वेळी, ख्रिश्चनाने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी त्यांना पाशात टाकणारे अमाप कर्ज अंगावर ओढवून घेणे सुज्ञपणाचे ठरणार नाही. त्याचप्रकारे, आध्यात्मिक जबाबदाऱ्या आणि आस्थांकडे दुर्लक्ष करून आर्थिक मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न करणे हे देखील चुकीचे ठरेल.
इतरांकडून शिकणे
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या वर्षांमध्ये, हजारो जर्मन लोकांनी युद्धाने जेरीस आलेल्या युरोपातून इतर देशात, विशेषपणे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात देशांतर केले. अनेकांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा केली, परंतु येशूने सांगितलेल्या आर्थिक चिंतेतून एकही मुक्त होऊ शकला नाही. आर्थिक समस्यांना सोडवताना कधीकधी नवीन समस्या उद्भवल्या जसे की, घराची ओढ, अपरिचित भाषा, नव्या प्रकारच्या अन्नाची झालेली सवय, विविध रीतीरिवाज, नव्या मित्रांबरोबर जुळवून घेणे किंवा वेगळ्या मनोवृत्तीचा सामना करणे.
देशांतर केलेल्यातील काही यहोवाचे साक्षीदार होते. अनेकांनी देशांतराच्या या समस्येमुळे त्यांच्या आध्यात्मिकतेला खुंटवू दिले नाही हे प्रशंसनीय आहे. परंतु त्याला काही अपवाद देखील होते. काहीजण संपत्तीच्या मोहाला बळी पडले. आर्थिक हितासाठी मजल मारताना त्यांच्या ईश्वरशासित प्रगतीत ते मागे पडले.
निश्चितच, मूर्खपणाचे निर्णय घेण्या-अगोदर आमच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक परीक्षण करणे सुज्ञतेचे आहे ते यावरून दिसून येते. ख्रिश्चनाला नियुक्ती मिळालेले, व ज्याची कधीही पुनरावृत्ती होणार नाही अशा शिष्य बनविण्याच्या कामात मंद करण्यासाठी भौतिकवादाच्या प्रवृत्त्या कारणीभूत ठरू शकतात. वस्तुतः, ज्या देशाचे नागरिक आर्थिक चिंतापासून मुक्त आहेत असा एकही देश नसल्यामुळे आम्ही कोठेही राहत असलो तरी हे सत्य आहे.
सुयुद्ध करणे
पौलाने तीमथ्याला सूचना दिली: “नीतीमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे.” करिंथमधील ख्रिश्चनांना त्याने म्हटले: “तुम्ही स्थिर व अढळ व्हा प्रभूच्या कामात सर्वदा पुष्कळ करण्याजोगे आहे.”—१ तीमथ्य ६:११, १२; १ करिंथकर १५:५८, न्यूव.
भौतिकवादाबरोबर यशस्वी लढत देण्यासाठी या उत्तम सल्ल्याचा अवलंब करणे हा चांगला मार्ग आहे, आणि ख्रिश्चनांना खरे पाहता, करण्यासारखे पुष्कळ आहे! काही देशात राज्याचे प्रचारक कमी असल्यामुळे, पुष्कळ लोकांना सत्याबरोबर फारच कमी संपर्क आलेला आहे. येशूने अगदी अचूकपणे भाकीत केले होते: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत.”—मत्तय ९:३७.
अशा देशातील आर्थिक चिंतामुळे जवळ असलेल्या आध्यात्मिक गोष्टींपासून त्यांना दूर करण्याची अनुमती देण्याऐवजी, यहोवाचे साक्षीदार सद्याच्या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतात. काही काळापुरते ते बेरोजगार असतात तेव्हा, त्यांच्यातील पुष्कळ जण त्यांच्या प्रचाराच्या कार्यात विस्तार करतात. त्यांची सेवा व सोबत यहोवाच्या स्तुतीचा वाढता गजर त्यांना स्वतःच्या आर्थिक समस्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारा आनंद देतो.
हे साक्षीदार प्रचारकार्यास प्राधान्य देतात आणि आर्थिक हलाखीच्या परिस्थितीला दुय्यम स्थान देतात, या गोष्टी त्यांच्या जागतिक बंधुवर्गाला हे सांगतात की, त्यांची काळजी घेण्यासाठी ते यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवतात. त्याचे अभिवचन आहे की: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:३३.
खऱ्या उपासनेची पुनःर्स्थापना १९१९ मध्ये झाल्यापासून, यहोवाने त्याच्या लोकांना अडखळण्यास अनुमती दिली नाही. त्याने तीव्र छळामध्ये, आणि काही ठिकाणी दशकांपर्यंत भूमिगत चाललेल्या कार्यामध्ये त्यांचा बचाव केला आहे. दियाबलाला जे छळाद्वारे साध्य करता आले नाही ते त्याला भौतिकवादाच्या अधिक धूर्त पाशाद्वारे देखील साध्य करता येणार नाही असा निश्चय यहोवाच्या साक्षीदारांनी केला आहे!
प्रत्येक बाबतीत वाट पाहत राहण्याचे शिकणे
प्रशस्त राज्य सभागृहे, ध्वनिक्षेपणाचे भारी उपकरण, संमेलन सभागृहे आणि आकर्षक बेथेल गृहे देवाची महिमा करतात व तो त्याच्या लोकांना आशीर्वाद देत असल्याची ते मूक साक्ष देतात. अनेक काळापर्यंत कार्याला प्रतिबंध असलेल्या देशातील यहोवाचे साक्षीदार कदाचित असा विचार करतील की इतर देशांतील दर्जांप्रत पोहचण्यासाठी त्यांना पुष्कळ काम करावयाचे आहे. परंतु सर्वात अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक प्रगती करणे ही आहे. भौतिकरीत्या देवाच्या आशीर्वादाचे बाह्य चिन्ह नंतर योग्य समयी दिसून येईल.
यहोवाच्या समर्पित सेवकांनी, जागृत राहण्यास हवे नाहीतर, व्यक्तिगत आस्थेचा पाठलाग करताना, विशिष्ट भौतिक गोष्टीपासून आतापर्यंत वंचित राहावे लागले आहे असा ते विचार करू लागतील. आर्थिक आणि सामाजिक विषमतेपासून मुक्तता मिळण्याची उत्कट इच्छा बाळगणे समजण्याजोगे आहे, परंतु देवाचे सर्वच सेवक मुक्ततेची इच्छा बाळगत आहेत हे यहोवाचे लोक विसरत नाहीत. अंध लोक पुन्हा पाहण्याची इच्छा बाळगतात, जुनाट आजाराने ग्रस्त असलेले पुन्हा स्वास्थ्य प्राप्त करण्याची इच्छा बाळगतात, उदासीन लोक उज्ज्वल गोष्टीची इच्छा बाळगतात, आणि मृत्युमुळे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांना पुन्हा पाहण्याची ते इच्छा बाळगत आहेत.
परिस्थितीमुळे प्रत्येक ख्रिश्चनाला त्याच्या समस्या सोडविण्यासाठी काही बाबतीत यहोवाच्या नवीन जगासाठी थांबून राहण्यास भाग पडते. या सर्व गोष्टीने आम्ही स्वतःला असे विचारावयास लावले पाहिजे की, ‘मला अन्नवस्र असल्यास तेवढ्यात मी तृप्त नसावे का आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता होण्यासाठी थांबून राहू नये का?’—१ तीमथ्य ६:८.
यहोवावर संपूर्ण भरवसा ठेवणारे ख्रिश्चन, वाट पाहत राहण्याची त्यांनी इच्छा दाखवली तर, त्यांच्या सर्वच योग्य इच्छा आणि गरजा लवकरच तृप्त केल्या जातील याची त्यांना हमी दिली जाऊ शकते. कोणीही व्यर्थपणे थांबून राहिलेला नसेल. आम्ही पौलाच्या शब्दांची पुनरावृत्ती करतो: “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा, प्रभूच्या कामात सर्वदा पुष्कळ करण्याजोगे आहे.”—१ करिंथकर १५:५८, न्यूव.
यास्तव वाट पाहण्याचे शिकून घेणे याची समस्या खरोखर मोठी आहे का?
[३१ पानांवरील चित्रं]
वाट पाहत राहण्याचे शिकल्याने तुमचे जीवन वाचू शकते