राज्य घोषकांचा वृत्तांत
शाळेतील आध्यात्मिक भुकेल्यांना तृप्त करणे
येशूने त्याच्या डोंगरावरील उपदेशात म्हटले की, “आध्यात्मिक गरजाची जाणीव राखणारे ते धन्य” आहेत. (मत्तय ५:३, न्यू.व.) देव आणि त्याच्या अद्भुत उद्देशाबद्दलच्या ज्ञानासाठी अनेक शाळेकरीमुले भुकेले आहेत. त्यांना जीवनासंबंधी असलेल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत आणि देवाची संमती मिळवून कसे आनंदी राहू शकतात याची माहिती ते करु इच्छितात. हे ब्रिटिश व्हर्जिन बेटावरील शाळेच्या संबंधात घडले आहे. त्यासंबंधी एक यहोवाचा साक्षीदार सांगतो:
▫ “स्थानिक शाळेत मी पालक आणि शिक्षकाच्या सभेला उपस्थित होतो, तेथे आमली पदार्थ, पिणे, भेटीगाठी, दूरदर्शन पाहणे, विद्यार्थ्याचे गुणसंपादन व इतर गोष्टींविषयी सांगितले गेले, यास्तव मी यंग पिपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक मुख्याध्यापिकेला सादर करण्याचे ठरविले. पुस्तक चाळल्यानंतर, तिने म्हटले, याचीच त्यांना गरज होती, व शाळेतील १२० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हे पुस्तक मिळू शकते का याची विचारणा तिने केली. याची मी मंडळीच्या वडिलांबरोबर चर्चा केली, व शाळेला पुस्तके भेट म्हणून देण्याचे त्यांनी ठरविले. याचा उल्लेख आम्ही केल्यावर, शिक्षकांनी विनंती केली की आम्ही ती पुस्तके शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांना भेट द्यावीत. दोन साक्षीदार तेथे गेले आणि ती खोली त्यांची वाट पाहात असलेल्या विद्यार्थ्यांनी भरुन गेली होती. बांधव अर्धा तास बोलले, तरुण आणि वयस्करांना पुस्तक वाचल्यामुळे कशी मदत मिळाली हे अनुभव त्यांनी वॉचटावर सोसायटीच्या मासिकातून दाखवले. नंतर उत्सुक विद्यार्थ्यांना ती पुस्तके सादर करण्यात आली.”
प्राथमिक शाळेत चवथ्या आणि पाचव्या इयत्तेसाठी अभ्यासक्रमात या पुस्तकाचा वापर करण्याचे शाळेने ठरविले हे माहीत झाल्यामुळे खरोखर आनंद मिळाला आहे. जीवन आणि भवितव्याबद्दल विद्यार्थ्यांना असलेल्या अनेक प्रश्नांना हे खरेच उत्तर देईल.
पापूआ न्यू गिनियातील आध्यात्मिक भुकेल्यांना तृप्त करणे
पुढील अनुभव एका फिरत्या पर्यवेक्षकाकडून मिळाला आहे. तो अनुभव दाखवतो की त्या देशात लोक आध्यात्मिकतेचे किती भुकेले आहेत व त्यांची भूक क्षमविण्यासाठी पवित्र शास्त्रावर आधारित आमची पुस्तके किती प्रभावकारी आहेत.
▫ एक पर्यवेक्षक म्हणाले, “काम्बराटॉरो या खेडेगावात मी भेटीला जाऊ न शकल्यामुळे, वॅनिमो या लहान मंडळीसोबत काम करण्यात मी माझा वेळ घालवला. तेथे लोकांना फारच आस्था आहे. बिवानी येथील अनेक लोकांनी प्रकाशने स्वीकारली. एका व्यक्तिने मला म्हटले की आपण या गावाला भेट द्या, माझ्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल हे त्याने मला सांगितले. अनेक लोक आमच्या प्रकाशनांशी परिचित आहेत. प्रत्येक वेळी आम्ही वॅनिमो शहरात जातो, तेव्हा पुस्तकांचे तीन बॉक्स नेऊनसुद्धा आम्हाला प्रकाशने अपुरी पडतात. माय बुक ऑफ बायबल स्टोरिज पुस्तकाला सोन्यासारखे मौल्यवान समजले जाते. लोक या पुस्तकाचा शोध करीत असतात. जी पुस्तके मी नेली होती ती फारच लवकर संपली. लोकांना आम्ही आमची प्रकाशने दाखवली तेव्हा, काही असे विचारीत: ‘पिवळे पुस्तक कोठे आहे?’ एका व्यक्तिने सहा पुस्तकांची मागणी केली. त्याने मला त्याचे नाव व पत्ता दिला व मला [पर्यवेक्षकांना] ती पुस्तके मिळाल्यावर रेडिओवरून त्याची घोषणा केली जावी अशी विनंती त्याने केली. मग तो त्याची ती पुस्तके प्राप्त करण्यासाठी त्याच्या खेडेगावातून येऊ शकेल.” फिरते पर्यवेक्षक यात ही भर घालतात: “मला असे दिसून आले की वॅनिमोतील अनेक लोकांनी मॅनकाइन्डस् सर्च फॉर गॉड आणि क्वश्चन्स् यंग पिपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क्स् ही प्रकाशने स्वीकारली आहेत.”
पवित्र शास्त्र आणि यहोवाने “विश्वासू बुद्धिमान दासां”करवी पुरविलेल्या प्रकाशनातील आध्यात्मिक अन्नाचे नम्र अंतःकरणाचे लोक किती भुकेले आहेत हे यावरुन दिसून येते. (मत्तय २४:४५-४७) सत्याच्या भुकेल्या जनांना मदत करण्यात यहोवाच्या साक्षीदारांना किती आनंद वाटतो!
[२९ पानांवरील चित्रं]
पापुआ न्यू गिनियात साक्ष देणे