वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 १२/१ पृ. ३१
  • तुम्हास आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हास आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • दशांश देण्याबद्दल बायबल काय म्हणतं?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • “मशीहा आम्हांस सापडला आहे”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवाचा आशीर्वाद समृद्धी देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • येशू ख्रिस्त देवाबद्दलच्या ज्ञानाची गुरुकिल्ली
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 १२/१ पृ. ३१

तुम्हास आठवते का?

तुम्ही टेहळणी बुरुजच्या अलिकडील अंकांचे काळजीपूर्वक वाचन केले आहे का? पहा, तुम्हाला खालील प्रश्‍नांची उत्तरे येतात का:

▫ बाबेलातल्या हद्दपारीहून परतलेल्या नथीनीम आणि शलमोनाच्या चाकरांच्या वंशजांना दिलेले वाढीव हक्क कशाचे पूर्वसंकेत असू शकतील?

आज, पृथ्वीवर असणारे आध्यात्मिक इस्राएलांचे शेष दिवसेंदिवस कमी होत असताना, दुसरी मेंढरे यांची वाढ होत आहे. आता यापैकी काहीजणांना, नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज यांच्या समानतेत, अभिषिक्‍त शेषांच्या देखरेखी खाली गहन जबाबदाऱ्‍या दिल्या जात आहेत. (यशया ६१:५)—७/१, पृष्ठ ३०,३१.

▫ “कदाचित परमेश्‍वराच्या (यहोवा न्यू. व.) क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल” असे सफन्या संदेष्ट्याने म्हटले तेव्हा त्याचा मतितार्थ काय होता? (सफन्या २:२, ३)

येत्या “मोठ्या संकटा” मध्ये कोणाचेही संरक्षण होण्यात, एकदा तारण झाले म्हणजे सर्वदा झाले, असे प्रकरण नाही. (मत्तय २४:१३, २१) त्या दिवशी आमचे दृष्टीआड होणे हे तीन गोष्टींवर सातत्याने करीत राहण्यावर अवलंबून आहे. आम्ही यहोवाचा शोध केला पाहिजे, धार्मिकता आचरली पाहिजे व नम्रतेचे अवलंबन केले पाहिजे.—८/१, पृष्ठ १४,१५.

▫ “अंतसमयात” मीखाएल कोणत्या अर्थाने ‘उठतो’? (दानिएल १२:१, ४)

१९१४ मध्ये त्याला राजा म्हणून अधिष्ठित केल्यापासून मिखाएल यहोवाच्या लोकांखातर उभा आहे. पण लवकरच हा मीखाएल एका विशिष्ट अर्थी ‘उठणार’ आहे. ते म्हणजे तो यहोवाकडील प्रतिनिधी या नात्याने पृथ्वीवरील सर्व दुष्टतेला समूळ काढून टाकील.—८/१, पृष्ठ १६

▫ खरा आनंद कशावर अवलंबून आहे?

यहोवासोबतचे आमचे मोलवान नाते, त्याची संमती आणि त्याचे आशीर्वाद यांवर खरा आनंद अवलंबून आहे. (नीतिसूत्रे १०:२२) या कारणास्तव, यहोवाचे आज्ञापालन आणि त्याच्या इच्छेला संतोषकारक अधीनता याशिवाय खऱ्‍या आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. (लूक ११:२८)—८/१, पृष्ठ २८,३१.

▫ मत्तय १३:४७-५० मध्ये येशूच्या दाखल्यात उल्लेखलेले “जाळे” कशाचे प्रतीक आहे?

जाळे हे स्वत:ला देवाची मंडळी म्हणविणाऱ्‍या व मासे गोळा करणाऱ्‍या पृथ्वीवरील उपकरणास सूचित करते. यात ख्रिस्ती धर्मराज्य तसेच अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची खरी मंडळी या दोघांचा समावेश होता. यापैकी दुसरी, मत्तय १३:४९ नुसार, दिव्यदूतांच्या मार्गदर्शनाखाली चांगले मासे गोळा करत राहिली आहे.—९/१, पृष्ठ २२.

▫ त्यांना नेमून दिलेले काम पार पाडताना, इस्राएलातील शास्त्यांनी लागू करावयाची काही तत्वे कोणती?

गरीब व श्रीमंत यांसाठी एकच प्रकारचा न्याय, कडक नि:पक्षपातीपणा, आणि लांच न घेणे. (लेवीय १९:१५; अनुवाद १६:१९)—१०/१, पृष्ठ १३

▫ न्यायदानाच्या सुनावणीद्वारे वडील काय साध्य करण्याचा प्रयत्न करतात?

प्रकरणाची वस्तुस्थिती शोधून काढणे हे एक ध्येय असते. व तेही प्रेमाने. एकदा वस्तुस्थिती कळल्यावर, मंडळीचे संरक्षण करण्यासाठी आणि तिजमध्ये यहोवाचे उच्च दर्जे राखून ठेवण्यासाठी आणि त्याच्या आत्म्याचा प्रवाह मुक्‍तपणे वाहू देण्यासाठी वडीलांनी शक्य ते सर्व केले पाहिजे. शक्य असल्यास धोक्यात सापडलेल्या अपराध्याला वाचवण्यासाठी ही सुनावणी असते. (लूक १५:८-१०शी तुलना करा.)—१०/१,पृष्ठ १८,१९

▫ अवैध लैगिंक मनोकल्पना हानीकारक का असतात?

येशूचे मत्तय ५:२७, २८मधील शब्द लक्षात घेतल्यास, अशा मनोकल्पनांमध्ये दंग असणारे सर्व त्यांच्या अंतकरणात व्यभिचार करण्याचे दोषी आहेत. आणि अशा मनोकल्पना अनैतिकते मध्ये परिणत होण्याचा खराखरचा धोका आहे.—१०/१, पृष्ठ २७, २८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा