तुम्हाला आठवते का?
तुम्ही अलिकडील टेहळणी बुरुज मासिकाचे अंक काळजीपूर्वक वाचलेत का? तर मग, तुम्हाला पुढील माहिती आठवू शकेलः
◻ जर आज्ञाभंजक देवदूतांना तार्तरसमध्ये कोंडीत ठेविले आहे तर त्याचा त्यांच्यासाठी कोणता अर्थ होतो? (२ पेत्र २:४)
त्यांना आता यहोवाच्या पवित्र संस्थेमध्ये कोणतेही स्थान राहिले नाही, व ईश्वरी प्रकाशाचा कोणताही किरण दिसत नाही. तथापि, सैतानाच्या मार्गदर्शनाखाली राहून काम करीत असल्यामुळे त्यांनी, पूर्वीसारखे रुपांतरीत होता येत नसले तरी मानवाशी जवळचा संपर्क ठेवून पुरुष, स्त्रिया व मुलांवर देखील आपला प्रभाव पाडण्याचे चालू ठेवले आहे. (प्रकटीकरण १२:१२, १७)—१२/१, पृष्ठ १६.
◻ जे सर्व यहोवाच्या दृष्टीने ‘वाईट त्याचा द्वेष’ करणे का जरुरीचे आहे? (स्तोत्र. ९७:१०)
जे वाईटाचा वीट मानतात ते त्यात गुरफटण्याचे मार्ग शोधणार नाहीत. तथापि, जे त्याचा वीट मानीत नाहीत ते कदाचित शारीरिकरित्या सहभागी होण्याचे इच्छिणार नाहीत, मात्र मानसिकरित्या त्यांना त्यामध्ये सहभागी व्हावेसे वाटेल—१२/१, पृष्ठ २३.
◻ बिरुयातील लोकांनी कोणत्या अर्थी शास्त्रवचनांचा ‘काळजीपूर्वक शोध केला’? (प्रे. कृत्ये १७:११)
त्या बिरुयाच्या लोकांनी पौलाचा व त्याने दिलेल्या संदेशाविषयी संशय धरला नाही; पण येशू हा खराच मशीहा होता का याविषयीचे संशोधन त्यांनी केले. त्यांचेमध्ये पुष्कळ विश्वासी बनले ही गोष्ट, त्यांचा मनोदय शुद्ध स्वरुपाचा होता हे सिद्ध करते. (प्रे. कृत्ये १७:१२)—१/१, पृ. २८.
◻ देवाने इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्राने कोणत्या गोष्टीत पवित्र राहण्यात साहाय्य केले?
यहोवाकडील नियमशास्त्राने इस्राएलांना आध्यात्मिक गोष्टीत, नैतिकतेत, मानसिकतेत, शारीरिकरित्या पवित्र व संमारंभीय सांस्कृतीत शुद्ध राहण्याची मदत दिली. शेवटला शुद्धतेचा प्रकार त्यांच्या उपासनेच्या अनुषंगाने होता.—३/१, पृ. २२
◻ “मानसिक आरोग्य” या संज्ञेचा काय अर्थ होतो?
“मानसिक आरोग्य” याचा अर्थ, ज्या सर्व गोष्टी ‘सत्य, धार्मिक व पवित्र’ आहेत त्यांच्याबद्दल आपल्यापरिने स्वविचारात शुद्ध, पवित्र राहण्यात विवेकतापूर्वक प्रयत्नशील राहून त्याच गोष्टी ‘सतत विचारात बाळगून राहणे.’ (फिलिप्पैकर ४:८)—४/१, पृ. १४.
◻ आम्ही लहानसहान चहाड्याही करू नये यासाठी का दक्षता बाळगावी?
आम्ही कदाचित कोणालाही न दुखविण्याच्या मिषाने एखादे वक्तव्य करू. पण ते भोळसट वाटणारे वक्तव्य जेव्हा परत परत सांगितले जाते तेव्हा ते दुःखदायी, कलंकित किंवा दुटप्पी विचारांचे बनते व ज्याच्याविषयी ते बोलले जाते त्याच्या प्रतिष्ठेस कलंकित करणारे व नावलौकिक हिरावणारे ठरते. (नीतीसूत्रे २०:१९)—५/१, पृ. २६.
◻ कोणा पुरुषाने कोणत्या उद्देशाने ख्रिश्चन देखरेखा बनण्याची आकांक्षा हृदयी बाळगून असावे? (१ तीमथ्य ३:१)
त्याने नम्रपणे इतरांची सेवा करण्याच्या आवडीने देखरेखा बनण्याची इच्छा बाळगून असावे. जेव्हा तो या नीतीमान उद्देशासह प्रगति करतो तेव्हा त्याच्या सर्व हालचाली सर्व संबंधितांच्या बाबतीत आशीर्वाद ठरतात.—५/१, पृ. १०.
◻ प्रापंचिक अधिकारांस “वरिष्ठ” असे म्हणताना आम्ही यहोवाच्या हक्काचा आदर कोणाही प्रकारे कमी करीत असतो का? (रोमकर १३:१)
नाही, कारण यहोवा या “वरिष्ठ” लोकांपेक्षा खूपच उच्चपदी आहे. तो “सेनाधीश प्रभू” तसेच “परात्पर” आहे. (स्तोत्रसंहिता ७३:२८; दानीएल ७:१८, २२) प्रापंचिक अधिकारी हे मानवी व्यवहारात व त्याच्या हालचालीच्या आटोक्यात वरिष्ठ आहेत. त्यांच्यावर समाजाला संभाळण्याची व सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी आहे.—६/१, पृ. १२.