तुमच्या कौटुंबिक जीवनात देवास प्रथम स्थान द्या
या आधीचे लेखात बॉब आणि जीन या जोडप्याची जी ओळख दिली होती—त्यांनी घटस्फोट घेतला नाही. त्याऐवजी, त्यांनी त्यांच्या प्रकरणाची एका ख्रिश्चन सेवकासोबत चर्चा केली. त्याने लवकरच हे ओळखले की, त्यांचेतील समस्या मुख्यत्वेकरुन त्यांच्या भिन्न पार्श्वभूमीतून उद्भवलेल्या आहेत.
उदाहरणार्थ, बॉब हा कामगार कुटुंबातून होता व त्यामुळे कामगार वर्गात मोडत होता; ज्यांना अधिक अंगमेहनत करावी लागे, यास्तव त्याला रोज सकाळी मनसोक्त उपहाराची गरज होती. जीन जी पांढऱ्या पेशातील कामकऱ्यांच्या घराण्यातून होती ती केवळ कॉफी व टोस्ट त्याच्या पुढ्यात ठेवी. त्यामुळेच न्याहारीबाबतचा वितंडवाद वाढत वाढत त्याचे वादळ बनले.
बॉब व जीन यांनी परस्परातील दळणवळणास सुधारण्याची गरज होती. त्याऐवजी त्यांचेतील अनावस्थेचे मूळ कारण अधिक खोलवर जात राहिले. “आपण दोघांनी परस्परांस कधी १ करिंथकर १३:४चे दृष्टीकोणातून पाहिलेत का?” असे त्या सेवकाने विचारले. ते पवित्र शास्त्रीय वचन असे वाचतोः “प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे; प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई करीत नाही; फुगत नाही.” त्यापुढील वचन म्हणतेः प्रीती “गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहात नाही; चिडत नाही; अपकार स्मरत नाही.” बॉब व जीन या दोघांनीही स्वखुषीने ते शब्द परस्परातील नातेसंबंधांना लागू करण्याचे आनंदाने मान्य केले.
या विवाहीत जोडप्याचे प्रकरणात प्रामुख्याने आध्यात्मिक तोडग्याची जरुरी होती. बॉब व जीन, दोघेही आपआपल्यापरिने देवाशी घनिष्ठ संबंध राखण्याची मनिषा राखून होते; शिवाय त्यांना सर्व प्रथम बायबल तत्त्वे राबविण्याची व हे सतत आठवणीत ठेवणे होते की, “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] घर बांधीत नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत.” (स्तोत्रसंहिता १२७:१) ३ ते ५ वचने कौटुंबिक उभारणी करण्याशी संबंधित आहेत. शिवाय घरगुती सौख्यानंद टिकवून ठेवण्यातील सर्वथोर चेतावणी देवास कौटुंबिक जीवनात प्रथम स्थानी ठेवल्याने अधिक यशस्वीतेत प्राप्त होते.—इफिसकर ३:१४, १५.
देवास प्रथम स्थान देण्यात काय काय समाविष्ठ असते
कौटुंबिक जीवनात देवास प्रथम स्थान देणे हे “ज्या कुटुंबात सर्व मिळून प्रार्थना करतात तेच एकत्रित टिकते,” या म्हणीपेक्षा पुष्कळसे अधिक समाविष्ट आहे. फॅमिली रिलेशन्स नामे मासिकाच्या मते, अनेकांची ही समज आहे की, “धर्म हा कुटुंबात सुदृढता, तसेच परस्पर सहकार अधिक सुकर करतो, शिवाय त्यातील कुटुंबियांना जीवनतृप्तीचे समाधान पुरवितो.” पण केवळ धर्मपालन हे देवास प्रथमस्थान देण्यासमान नाही. अनेकांनी आयुष्यात केवळ सवय, कौटुंबिक प्रथा किंवा सामाजिक फायदेप्राप्तीस्तव धर्मास स्थान दिले होते. देवास, अशांच्या प्रतिदिनी जीवनाबद्दल अल्पशी आस्था असते. याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हटल्यास सर्वच धर्म “देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण” असे नाहीत.—याकोब १:२७.
देवास आमच्या कौटुंबिक जीवनात जर प्रथम स्थान देणे आहे तर आम्ही व आमच्या प्रिय जनांनी जो “सर्व पृथ्वीवर परात्पर आहे,” त्या यहोवा देवाचीच त्याच्या आवश्यकतेनुसार भक्ती करण्यास हवी. (स्तोत्रसंहिता ८३:१८) देवाचा पुत्र, येशू ख्रिस्ताने म्हटले आहेः “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२३, २४) यहोवा देवाची “आत्म्याने” भक्ती करण्यात, त्याजकरिता जी पवित्र सेवा करणे आहे ती, जे अंतःकरण प्रेमाने व विश्वासाने ओथंबलेले असेल त्याकरवी प्रोत्साहीत असावी. (मार्क १२:२८-३१; गलतीकर २:१६) यहोवाची “खरेपणाने (सत्याने)” भक्ती करण्यात, आम्ही धार्मिक खोटेपणास पूर्णपणे काट मारण्याची आणि पवित्र शास्त्रात प्रकट केलेल्या त्याच्या इच्छेशी पूर्णपणे समरुप असण्याची गरज आहे. आमचा धर्म त्याच्या आदर्शांना जुळेसा असल्याविना आम्ही यहोवा देवास प्रथम स्थान देऊ शकत नाही.a त्यांचेपैकी काही कोणते आहेत? व ते अनुसरल्यास तुमच्या कुटुंबाचे त्यात हित आहे ते कसे?
पती या नाते देवास प्रथम स्थान देणे
पहिले करिंथकर ११:३ मध्ये पवित्र शास्त्र म्हणतेः “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे.” तुम्ही जर पती आहात तर तुम्हावर, आपल्या कुटुंबातील समस्यांबाबत अंतिम निर्णय घेण्याची ईश्वरीय जबाबदारी आहे. पण हा हक्क कोणाही पतीस जुलमी किंवा हुकुमशहा बनण्याचा परवाना देत नाही.
आपले निर्णय घेतेवेळी बायबल नेहमी पतींना त्यांच्या पत्नींच्या भावना लक्षात घेण्याचे उत्तेजन देते. (पडताळा उत्पत्ती २१:९-१४.) अर्थात, शास्त्रवचने आम्हा सर्वांस आर्जवितात की, “कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्यांचेही पाहावे.” (फिलिप्पैकर २:२-४) जेथे कोणाही बायबल तत्त्वांचा अंतर्भाव नसेल तेथे खिश्चन पती आपल्या पत्नीचेही म्हणणे, पसंती ऐकेल. तिजबद्दलची स्वतःठायी आवड बाळगून असल्यामुळे तो ही खात्री बाळगून असेल की, ती जबाबदाऱ्यांच्या बोझाखाली बेसुमार भारावलेली नाही. उदाहरणार्थ, ती जर कामकरी स्त्री असल्यास घरकामात तिला हातभार लावील.
प्रेषित पौलाने लिहिलेः “नवऱ्यांनी आपआपल्या बायकोला आपले शरीर असे मानून तिजवर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो, तसेच ख्रिस्तही मंडळीचे करतो.” (इफिसकर ५:२८, २९) येशू ख्रिस्त मंडळीच्या सदस्यांसोबत केवढ्या प्रेमाळूपणाने व्यवहार राखून आहे.
लक्षात घेण्याजोगा प्रेषित पेत्राचाही सल्ला आहेः “नवऱ्यांनो, तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून, सूज्ञतेने सहवास ठेवा. जीवनरुपी कृपादानाचे त्यांचे वतनबंधू असे तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनांना व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) ही केवढी दुःखद, बोचक भावना अंतःकरणास सतावेल की, कोणी आपल्या बायकोस नीट वागविले नाहीत तर नवऱ्याच्या प्रार्थनात व्यत्यय येणार! होय, जर कोणास देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात व उत्तर द्यावे असे वाटते तर त्या मनुष्याने आपल्या बायकोशी प्रीतीने वागलेच पाहिजे.
देवास प्रथम स्थान देण्यात बापाचे लेकरांसोबतच्या नातेसंबंधाचाही अंतर्भाव आहे. त्याने त्यांच्या आध्यात्मिक सुदृढतेची काळजी बाळगलीच पाहिजे. तरीही, अमेरिकेतील मुख्य पाहणीत असे आढळले की, केवळ काहीच पुरुष म्हणालेः “शास्त्रवचनांचा अभ्यास व चर्चागटात सहभागी होणे” हे त्यांच्या कौटुंबिक आध्यात्मिकतेत भर टाकण्यात महत्त्वपूर्ण होते. इतरांना, “जे धार्मिक कार्यक्रम नभोवाणीवर तसेच दूरदर्शनवर होतात ते पाहणे व ऐकणे” किंवा “जीवनाकरवी काय अर्थबोध होतो तो परावर्तन करणे” पुरे!
तथापि, बायबल बापांना सांगतेः “तुम्ही आपल्या मुलांस चिडवू नका; तर प्रभूचे [यहोवा, न्यू.व.] शिक्षण व बोध यांच्यायोगे त्यांचा प्रतिपाल करा.” (इफिसकर ६:४) यहोवाच्या साक्षीदारात, कौटुंबिक उपासनेत बापाने पुढाकार घेण्याचे अपेक्षिले जाते. नियमितपणे, कौटुंबिक बायबल अभ्यास, ख्रिश्चन सभांना उपस्थित राहणे, आणि इतर शास्त्रवचनीय गरजा पुऱ्या करण्यात चाणाक्ष राहून अशी मनुष्ये आपल्या कौटुंबिक जीवनात देवास प्रथम स्थान देत असतात.
पत्नी या नाते देवास प्रथम स्थान देणे
आपण जर पत्नी आहात तर, पतीच्या कुटुंबप्रमुख भूमिकेतील सहकारी राहून देवास प्रथम स्थान देऊ शकता. बायबल म्हणतेः “जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या नवऱ्याच्या अधीन असा.” (कलस्सैकर ३:१८) हे कदाचित, जर तो पुरुष अबोला किंवा कौटुंबिक उपासनेत पुढाकार घेण्यात औदासिन असला तर बरेच अवघड जाते. कोणाही परिस्थितीत असो, पण तेच जर सतत त्याच्या चुका काढत राहिल्यास किंवा त्याहूनही अधिक काही केल्यास, जसे त्याची बदनामी केल्यास, त्यामुळे कौटुंबिक अनवस्थेत भर टाकीत असल्यासारखे होईल.
नीतीसूत्रे १४:१ म्हणतेः “प्रत्येक सूज्ञ स्त्री आपले घर बांधिते, पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकिते.” देवास प्रथम स्थान देणे आणि ‘आपले घर बांधणे’ आहे तर कोणाही विवाहीत सूज्ञ स्त्रीला ते केवळ आपल्या पतीचे अधीन राहून साध्य करता येईल. (१ करिंथकर ११:३) आपल्या जिभेवर सूज्ञतेचे [“कृपायुक्त प्रेमळ,” न्यू.व.] बोल राखून ती आपल्या पतीची अनावश्यक टिका करणे टाळेल. (नीतीसूत्रे ३१:२६) शिवाय त्याचे निर्णय यशस्वी करण्यात ती जिवापाड मेहनत करेल.
देवास, कोणाही विवाहीत स्त्रीने प्रथम स्थान देण्यातील दुसरा मार्ग म्हणजे ती मेहनती पत्नी असण्यास हवी. अर्थात, ती जर मेहनतीची नोकरी करीत असली तर कदाचित तिला हवे तसे घर चांगल्या अवस्थेत राखण्यात ना वेळ ना शक्ती उरत असेल. तरीही ती एखाद्या ‘सद्गुणी [हुषार] स्त्री’ समान असेल, जिच्याबद्दल बायबल म्हणतेः “ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही.”—नीतीसूत्रे ३१:१०, २७.
कोणाही पत्नीस देवाच्या भक्तीस आपल्या जीवनात मुख्यतः प्रथम स्थान देण्याची गरज आहे. जे अनेक, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहास प्रथमच भेट देत असतात, ते तेथील लेकरांच्या टापटीपतेबद्दल प्रशंसा करीत असतात. याबाबतीतील पत्नीचे काम अमूल्य असते. सोबतच तिने प्रार्थना, अभ्यास आणि देवाची सेवा यात आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यात क्रियाशील असावे.
तारुण्यावस्थेत देवास प्रथम स्थान देणे
ॲडलेसेंट काऊन्सलर मासिकातील एका लेखात म्हटलेः “मुलामुलींमध्ये असा कल तसेच तत्त्व बळावत आहे की, त्यांना पालकावर नियंत्रण करण्याची मुभा प्राप्त झाली आहे. . . . जी समाज विनाविलंब अनेक संतोषकारक गोष्टीची आणि जडवादपणाची लय लुटीत राहण्यावर सतत जोर देऊन असतो अशांचे मध्ये वाढ होत राहिल्याने, ‘मला आत्ताच हवे’ या वृत्तीचा तरुणवर्गात प्रसार होत आहे.” आपण जर तरुण आहात तर आपणाठायीही हीच वृत्ती आहे का?
कलस्सैकर ३:२० म्हणतेः “मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा माना; हे प्रभूला आवडते आहे.” जी तरुण व्यक्ती या आज्ञाधारकपणाकडे ईश्वरीय गरज असल्याचे दृष्टीकोणातून पाहाते ती नेहमी आपल्या पालकांचे सहकारात राहते. उदाहरणार्थ, ज्यांना वर्ज करावे असे त्यांचे मत असेल अशा शाळकरी सोबत्यांची संगत राखून गुप्ततेत ती मोडणार नाही. तसेच अप्रामाणिकतेत कोणाही पालकांस आपल्याच म्हणण्याप्रमाणे करण्यास भाग पाडणार नाही. (नीतीसूत्रे ३:३२) याउलट, जे तरुण आपल्या जीवनात देवास प्रथम स्थान देऊ इच्छितात ते आपल्या प्रेमळ पालकांच्या अधीन राहतील.
देवास प्रथम स्थान द्या
कौटुंबिक वर्तुळात तुमचे कोणतेही स्थान असो, आम्हा सर्वांस आपल्या जीवनात देवास प्रथम स्थान देऊन असणे तसेच त्याजसोबत निकटवर्तीय नातेसंबंध टिकवून ठेविण्याची गरज आहे. तुम्ही आणि तुमचे कुटुंबिय हेच करण्याच्या प्रयत्नात आहात का?
या “शेवटल्या दिवसात” आम्ही सर्वच “कठीण” काळास तोंड देऊन आहोत. (२ तीमथ्य ३:१-५) तथापि, आध्यात्मिकतेत उत्कर्षित होण्याची आणि सद्य व्यवस्थीकरणाच्या नाशातून बचावून राहण्याची शक्यता आहे. (मत्तय २४:३-१४) बायबलच्या अचूक ज्ञानाआधारे वर्तणूक राखून, तुम्ही व तुमचे कुटुंबिय नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर अनंतकालिक जीवन मिळविण्याची आशा बाळगू शकतात. (लूक २३:४३; योहान १७:३; प्रकटीकरण २१:३, ४) होय, ते तसे असू शकेल जर, आपण आपल्या कौटुंबिक जीवनात देवास प्रथम स्थान देऊन असाल.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीतर्फे प्रकाशित झालेल्या तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाचा २२वा अध्याय पहा.
[५ पानांवरील चित्रं]
सद्गुणी स्त्री अंतर्यामापासून आवडत असते
[७ पानांवरील चित्रं]
पतीने कौटुंबिक उपासनेत नेतृत्व करण्याचे उत्तेजन बायबल देते