वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 २/१ पृ. १०-११
  • शोमरोन उत्तरेकडील राजधान्यांतील राजधानी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शोमरोन उत्तरेकडील राजधान्यांतील राजधानी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • जेझरील येथे काय सापडले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • निर्दयी अश्‍शुर दुसरे प्रबळ जागतिक साम्राज्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • एका दुष्ट राणीला शिक्षा होते
    बायबलमधून शिकू या!
  • निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 २/१ पृ. १०-११

वचनयुक्‍त देशाचे देखावे

शोमरोन उत्तरेकडील राजधान्यांतील राजधानी

बाबेल, निनवे व रोम या पवित्र शास्त्र काळातील राजधान्या होत. तरीही शास्त्रीय भाषेत बोलावयाचे झाल्यास, स्वतः यरुशलेम सोडून शोमरोनसारखी लक्षात राहणारी राजधानी त्यांच्यापैकी एकही नव्हती. ती इस्राएलातील दहा वंशीय राज्याची सुमारे २०० वर्षे राजधानी होती. याशिवाय, अनेक भविष्यवादित संदेशांचा रोख शोमरोनावर होता. पण शोमरोनाबाबत आपणास काय माहिती आहे? ती उत्तरेकडील राजधान्यांतील एक राजधानी का होती?

समोरील नकाशा लक्षात घेऊन हे आठवा की, इस्राएलाचे दहा वंश यहोवाचा राजा व यरुशलेमातील मंदिर यापासून वेगळे झाले तेव्हा काय घडले. ज्याने हे उत्तरेकडील राज्य स्थापण्यात पुढाकार घेतला होता त्या यराबामाने नैऋत्येकडील डोंगराळ भागातील शखेम येथून काही वर्षे राज्य केले. नंतर त्याने आपली राजधानी तिरसा येथे नेली; जे स्थळ फरहावाडीत होते. यार्देन दरीतून निघालेला एक मार्ग तिरसा ओलांडून पुढे पहाडी प्रदेशातील मार्गाकडे वळतो. आपल्याला हे ठाऊक आहे का की, तिरसा हे नादाब, बाशा, एलाह, जिम्री व अम्री यांच्या काळात इस्राएलाच्या दहावंशीय राज्याच्या राजधानीचे शहर होते?—उत्पत्ती १२:५-९; ३३:१७, १८; १ राजे १२:२०, २५, २७; १४:१७; १६:६, १५, २२.

तथापि, सहा वर्षांनी अम्रीने एका नव्या राजधानीची प्रस्थापना केली. पण कोठे? आपल्याला डावीकडे जो डोंगर दिसत आहे ना, तो शोमरोन त्याने विकत घेतला. (१ राजे १६:२३-२८) शेतीची तसेच इतर कृषीची कामे उरकण्यास डोंगर माथ्यावर बराचसा समृद्ध सपाट प्रदेश होता तरी त्याने या जागेची निवड, वरील सपाटीवरुन सहज प्रतिहल्ला करता येऊ शकतो हे पाहून केली. त्याचा पुत्र अहाब याने शोमरोनची मजबुती करण्याचे चालू ठेविले व सभोवताली भक्कम वेशी उभारल्या. त्याने येथे बालदैवताचे मंदिर तसेच स्वतःसाठी व आपली सिदोनी बायको, इजबेल हिच्यासाठी भव्य महाल बांधला. अलिकडील उत्खननात सापडलेल्या अहाबाच्या महालाचे अवशेष पुढील पानावरील चित्रात दाखविले आहेत. हा महाल सुखचैन व भारी दुष्टाचाराच्या बाबतीत प्रसिद्ध होता. (१ राजे १६:२९-३३) आपल्या डोळ्यांसमोर हे दृश्‍य आणा की, महालाकडे जाणाऱ्‍या रुंद मार्गावरून एलिया संदेष्टा वाटचाल करीत या शहराकडे, अहाबाचा बालभक्‍तीसाठी धिक्कार करण्यास वर चढून येत आहे.—१ राजे १७:१.

१९१० मध्ये, भूगर्भसंशोधकांना तेथे लिखाण असलेले मडक्यांचे तुकडे सापडले, ज्यावर द्राक्षारस, जैतुनाचे तेल यांच्या निर्यातीच्या व कर भरल्याच्या नोंदी होत्या. पण त्यावरील अनेक व्यक्‍तीगत नावे बʹआल अक्षराच्या रुपात लिहिलेली होती. शिवाय आपणास लक्षवेधक वाटेल की, येथे चित्रात दिसतात तसे अनेक हस्तिदंत जडावाचे काम केलेले स्तंभही उत्खननाचे कामात भूगर्भसंशोधकांना सापडले. अहाबाने “हस्तिदंती गृह” बांधले होते याचा खूप वर्षांआधी १ राजे २२:३९ मध्ये उल्लेख केलेला आहे तो आठवा. यात कदाचित हस्तिदंत जडावाचे काम केलेले साहित्य असावे, कारण एक दशकानंतर आमोस संदेष्ट्याने असे म्हटले की, “हस्तिदंती पलंगावर” ते निजत. (आमोस ३:१२, १५; ६:१, ४) त्यावरील नक्षीकाम मिसरी दंतकथेतील देवदेवतांसारखे पंख असलेल्या प्राण्यांच्या रुपात कोरलेले असे.

अहाब व ईजबेल यांचा उल्लेख आम्हाला ते कसे मेले याची आठवण करून देईल. अरामी लोकांसोबत केलेल्या मूर्खपणाच्या युद्धात अहाबाने आपला जीव गमावला. जेव्हा त्याचा रथ “शोमरोनच्या तळ्याजवळ धुतला . . . (तेव्हा) कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्‍त चाटून खाल्ले.” एलियाने म्हटल्याप्रमाणे ते खरे झाले. (१ राजे २१:१९; २२:३४-३८) इजबेल राणीला महालाच्या खिडकीतून खाली टाकून दिले व ती मेली. हा शोमरोनातील तोच महाल का? नाही. उत्तरेकडील इज्रेलच्या खोऱ्‍यात अहाबाचा आणखी एक महाल होता. त्याने जवळपास असलेला नाबोथाचा मळा हडप केला होता. महालाच्या उंच बुरुजावरून पहारेकरी पूर्वेकडे नजर रोखून असता येहू मोठ्या सपाट्याने रथ हाकीत दरीतून वर येत होता. तेथेच शोमरोनची माजी राणी खाली पडून रक्‍ताच्या थारोळ्यात मेली. तिचा दंड न्यायानुसार मिळाला.—१ राजे २१:१-१६; २ राजे ९:१४-३७.

शोमरोन जरी बराच काळ राजधानीचे शहर म्हणून राहिले तरी त्याला देवाची संमती किंवा आशीर्वाद मिळाला नाही. उलटपक्षी, त्याने नेहमीच दक्षिणेकडील त्याची राजधानी यरुशलेम याविषयी द्वेषबुद्धी व शत्रुत्व प्रदर्शित केले. यहोवाने आपल्या अनेक संदेष्ट्यांना शोमरोनच्या अधिपतींना व लोकांना त्यांची मूर्तिपूजा, लैंगिक स्वैराचरण व त्याच्या नियमशास्त्राचा त्यांनी केलेला अवमान याविषयी ताकीद देण्यासाठी पाठविले होते; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. (यशया ९:९; १०:११; यहेज्केल २३:४-१०; होशेय ७:१; १०:५; आमोस ३:९; ८:१४; मीखा १:१, ६) यास्तव इ. स. पूर्वी ७४० मध्ये शोमरोन न्यायदंडाखाली आले व अश्‍शुरकरवी ते उद्‌ध्वस्त करण्यात आले. त्याजमधील अनेक लोकांना गुलाम बनवून नेण्यात आले व त्यांची जागा विदेशी लोकांकरवी भरून काढली गेली.—२ राजे १७:१-६, २२-२४.

कालांतराने खासकरुन थोर हेरोदाच्या काळी, ग्रीक तसेच रोमी लोकांनी शोमरोनची काही वैशिष्ट्ये परत रूजविली. या कारणास्तव, येशू आणि त्याचे प्रेषितही उत्तरेकडील राजधान्यांतील या राजधानीसोबत चांगले परिचित होते.—लूक १७:११; योहान ४:४.

[१० पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

इज्रेल

तिरसा

शोमरोन

शखेम

यरुशलेम

यार्देन नदी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा