आजच्या नियमन मंडळाशी सहकार्य करणे
“तो त्याला आपल्या सर्वस्वावर नेमील.”—लूक १२:४४.
१. इ. स. ३३ मध्ये ख्रिस्त कोणत्या राज्यात अधिकार गाजवू लागला व कोणत्या माध्यमाने?
इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्ट समयी येशू खिस्त हा मंडळीचा मस्तक आत्म्याने अभिषिक्त अशा दासांच्या राज्यात क्रियाशीलपणे अधिकार गाजवू लागला. ते कसे? पवित्र आत्मा, दिव्यदूत व दृश्य अशा नियमन मंडळाद्वारे. प्रेषित पौलाने सूचित केले की, देवाने ‘अभिषिक्त जनांना अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.’—कलस्सैकर १:१३-१८; प्रे. कृत्ये २:३३, ४२; १५:२; गलतीकर २:१, २; प्रकटीकरण २२:१६.
२. मग, १९१४ पासून कोणत्या अधिक राज्यात ख्रिस्ताने आपली कारकीर्द आरंभिली?
२ “विदेश्यांच्या काळाच्या समाप्ती”ला यहोवाने ख्रिस्ताचा बादशाही अधिकार वाढवून तो ख्रिस्ती मंडळीपलिकडे नेला. (लूक २१:२४) होय, १९१४ मध्ये देवाने आपल्या पुत्राला “राष्ट्रे,” “जगातील राज्ये,” म्हणजे सबंध मानवजात यावर बादशाही अधिकार बहाल केला.—स्तोत्रसंहिता २:६-८; प्रकटीकरण ११:१५.
“आपल्या सर्वस्वावर” नेमिले
३, ४. (अ) येशूने दिलेल्या रुपयांच्या दृष्टांतात उमराव कोणाचे प्रतिनिधित्व करतो? (ब) १९१८ व १९१९ मध्ये राज्याविषयीच्या कोणत्या घडामोडी घडल्या?
३ येथे येशूने दिलेला उमरावाचा दाखला लक्षात घेण्याजोगा आहे. (लूक १९:११-२७) राज्य मिळविण्यासाठी परदेशी जाण्याआधी दाखल्यातील माणसाने आपल्या दासांना व्यापारासाठी रुपये दिले. परत आल्यावर हा माणूस, जो येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करतो, “ज्या दासास पैका दिला होता त्याने काय काय व्यापार केला हे पहावे म्हणून . . . आपणाकडे” बोलावतो. (लूक १९:१५) हे येशूने आपला बादशाही अधिकार मिळवल्यानंतर कसे घडले?
४ १९१८ मध्ये सिंहासनाधिष्ट राजा येशू ख्रिस्ताला ख्रिश्चनांचा एक लहान गट धन्याच्या पृथ्वीवरील मिळकतीची काळजी वाहत असल्याचे दिसले. या गटाने आधी ख्रिस्तीधर्मजगत सोडले होते. यांची अग्नीने करतात तशी शुद्धी केल्यावर येशूने या दासांना १९१९ मध्ये वाढीव अधिकार दिला. (मलाखी ३:१-४; लूक १९:१६-१९) त्याने यांना “आपल्या सर्वस्वावर” नेमले.—लूक १२:४२-४४.
“यथाकाळी शिधासामग्री”
५, ६. (अ) ख्रिस्ताच्या कारभाऱ्याला कोणती विस्तृत नेमणूक मिळाली? (ब) १९१४ नंतर कोणते भविष्यवाद पूर्ण होणार होते, आणि या कारभारी वर्गाला या भविष्यवादांच्या पूर्णतेत कसा सहभाग घ्यायचा होता?
५ राज्य करीत असलेल्या राजा येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरील आपल्या कारभाऱ्यास, किंवा घरच्या व्यवस्थापकाला विस्तृत नेमणूक दिली. अभिषिक्त ख्रिश्चनांना देवाचे “वकील,” पृथ्वीच्या लोकांवर राज्य करण्याची नेमणूक मिळालेल्या मुकुटमंडित राजाविषयीची रदबदली करायची होती. (२ करिंथकर ५:२०; दानीएल ७:१४) आता त्यांची सामूहिक जबाबदारी केवळ ख्रिस्ताच्या अभिषिक्त जनांच्या वर्गास “यथाकाळी शिधासामग्री” देणे ही नव्हती. (लूक १२:४२) आता त्यांना १९१४ मध्ये देवाच्या राज्याची प्रस्थापना झाल्यावर जे भविष्यवाद पूर्ण होणार होते त्याच्या अनुषंगाने क्रियाशील सहभाग घ्यायचा होता.
६ तर मग, याचा वस्तुतः काय अर्थ होत होता? त्याचा अर्थ ‘राज्याची ही सुवार्ता सर्व जगात’ व्यापक रुपात प्रसारीत करायची होती. (मत्तय २४:१४) यासोबत, सैतानाचे दुष्ट व्यवस्थीकरण व त्याच्या पाठीराख्यांविरुद्ध न्यायाचे प्रबळ संदेश प्रकाशित करायचे होते. याचा परिणाम ‘राष्ट्रांना हलवून सोड’ण्यात झाला. यामुळे, “इष्ट वस्तु” म्हणजे ख्रिस्ताची “दुसरी मेंढरे” सामोरी येऊ लागली. (हाग्गय २:७; योहान १०:१६) १९३५ पासून यहोवाच्या संस्थेकडे जगभरात “मोठा लोकसमुदाय” येऊ लागला. (प्रकटीकरण ७:९, १०) यामुळे संघटनात्मक प्रगतिशील सुधारणा करण्याची गरज प्रस्तुत झाली. लाक्षणिकपणे बोलायचे तर दगडांऐवजी लोखंड, लाकडाऐवजी तांबे, लोखंडाऐवजी चांदी आणि चांदीऐवजी सोने यावयाचे होते. (यशया ६०:१७) हे सर्व १९१९ पासून येशू ख्रिस्ताच्या क्रियाशील व लक्षपूर्वक मार्गदर्शनानुरुप घडत गेले. त्याने आपले सर्वस्व म्हणजे राज्यविषयक आस्था आपल्या विश्वासू दास वर्ग व त्याच्या नियमन मंडळाकडे सुपूर्द केली.
७. कारभाऱ्याच्या वाढत्या जबाबदारीत काय समाविष्ट होते?
७ धन्याचा दास, कारभारी किंवा घरचा व्यवस्थापक याजवर जी वाढलेली जबाबदारी येऊन पडली होती, त्यात बरेच लिखाण व संपादकीय कार्ये यांचा समावेश होता. द वॉचटावर मासिकात आध्यात्मिक अन्नाचे नियमित रुपात प्रकाशन होणे जरुरीचे होते. “परिवारा” ची उभारणी करण्यासोबत जाहीर लोकांतील आस्था अधिक वाढवावी यासाठी नंतर १९१९ मध्ये द गोल्डन एज (एक सोबतीचे मासिक ज्याचे नाव प्रथम कोन्सोलेशन व नंतर अवेक! असे बदलले) प्रकाशित करण्यास आरंभ झाला. (मत्तय २४:४५) याशिवाय वर्षानुवर्षे पुस्तके, पुस्तिका व हस्तपत्रिका यांचे प्रकाशन महामूरतेने करण्यात आले.
शुद्धता जारी
८. पहिल्यांदा नियमन मंडळाच्या सदस्यांची ओळख कोठे मिळत होती, आणि १९४४ मध्ये द वॉचटावरने काय विधान मांडले?
८ “शेवटल्या काळा”त मागे पाहता सुरवातीला नियमन मंडळ वॉच टावर संस्थेच्या संपादकीय विभागात काम करणाऱ्या कामगारांसोबत सहवास राखून होते हे पाहणे आश्चर्याचे नाही. (दानीएल १२:४) द वॉचटावरच्या नोव्हेंबर १, १९४४ च्या अंकात प्रकाशित झालेल्या “द थिऑक्रेटिक अलायन्मेंट टुडे” या लेखात म्हटले आहेः “प्रकट करण्यात आलेल्या पवित्र शास्त्रीय सत्याचे प्रकाशन करण्याची जबाबदारी ज्यांचेवर होती, त्यांना प्रभुने निवडलेले नियमन मंडळ या दृष्टीने पाहिले जात होते ते व्यवहार्य होते. यांनी, देवाची आत्म्याने व खरेपणाने उपासना करणाऱ्यांना तसेच या प्रकटविण्यात आलेल्या सत्यांची इतर भूकेले व तहानलेल्या लोकांत भागीदारी करून प्रभूची सेवा करणाऱ्यांचे मार्गदर्शन केले.”
९. नंतर नियमन मंडळ कोणाच्या सहवासात आले व का?
९ पण मासिके व इतर पवित्र शास्त्रीय प्रकाशने प्रकाशित करण्यामध्ये कायदेशीर गरजा उपस्थित झाल्या. यासाठीच वॉच टावर बायबल ॲण्ड सोसायटीची स्थापना झाली व त्याची अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्यात कायदेशीर नोंद झाली. काही वर्षासाठी नियमन मंडळाची ओळख, या संस्थेच्या संचालकपदी असणाऱ्या सात सदस्यांच्या गटासोबत मिळे. हे संचालक मंडळ जगभरातील प्रभूच्या लोकांना आवश्यक असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या पवित्र शास्त्रीय मार्गदर्शक साहित्याचे प्रकाशन करीत असे.
१०, ११. १९४४ मध्ये कोणत्या सुधारणा झाल्या व याविषयी द वॉचटावरमध्ये कोणते विवेचन आले?
१० संस्थेचे सात संचालक विश्वासू ख्रिस्ती होते. पण कायदेशीर संस्थेतील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना असे सुचविले गेले असावे की, त्यांचे नियमन मंडळात असलेले पद हे वॉच टावर संस्थेच्या कायदेशीर सदस्यांमार्फतच्या निवडणूकीवर विसंबून आहे. याशिवाय असे हे सदस्यत्व व निवडणूकीचा हक्क हा केवळ जे विशिष्ठ लोक संस्थेला अनुदान देत त्यांनाच कायद्याने खुला होता. ही व्यवस्था बदलण्याची जरुरी होती. हे ऑक्टोबर २, १९४४ रोजी वॉच टावर संस्थेच्या पेन्सिल्व्हेनियाच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत केले गेले. संस्थेची नियमावली बदलण्यात आली व त्यामुळे आता संस्थेचे सदस्यत्व हे आर्थिक आधारावर विसंबून राहणार नव्हते. यहोवाच्या विश्वासू सेवकांमधून सदस्यांची निवड केली जाणार होती. यात संस्थेच्या न्यूयॉर्क येथील ब्रुकलिनमध्ये तसेच त्याच्या जगभरातील शाखेत पूर्ण वेळ काम करणाऱ्या पुष्कळांचा भरणा झाला.
११ या सुधारणेविषयीची माहिती कळवताना नोव्हेंबर १, १९४४ च्या द वॉचटावर मासिकात कळवले गेलेः “आर्थिक अनुदानाचे प्रतिनिधित्व करणारा पैसा हा आता ठरविण्याचे प्रमाण नाही; खरे म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांच्या पृथ्वीवरील नियमन मंडळात भरणा होण्यासाठी पैशाचे कसलेही काम नाही. . . . तर यहोवा देवाकडून येशू ख्रिस्ताच्या द्वारे येणारा पवित्र आत्मा, त्याची क्रियाशील शक्ती ही या प्रकरणात निश्चय ठरविणारी व मार्गदर्शन देणारी गोष्ट आहे.”
संचालक मंडळापासून वेगळे
१२. नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाकरवी करण्यात आलेल्या सुधारणेवर यहोवाने आशीर्वाद पाठविल्याचे कसे सिद्ध झाले?
१२ या नंतरच्या दशकात प्रचार कार्याच्या अनुषंगाने जी प्रगति साधली गेली ती, यहोवाने, वर नमूद असलेल्या सुधारणा प्रक्रियेवर आपला आशीर्वाद पाठविल्याची पुष्टी देते. (नीतीसूत्रे १०:२२) सबंध जगभरातील राज्य घोषकांची संख्या १९४४ च्या १,३०,००० पासून १९७० पर्यंत १४,८३,४३० पर्यंत पुढे गेली! तरीपण आणखी सुधारणा व्हावयाच्या होत्या.
१३. (अ) १९७१ पर्यंत नियमन मंडळाची काय स्थिती होती? (ब) १९७१ मध्ये संस्थेच्या वार्षिक सभेत काय घडले?
१३ १९७१ पर्यंत नियमन मंडळाच्या सदस्यांची ओळख वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनियाच्या संचालक मंडळाशी मिळत होती. जगभरात संस्थेच्या शाखा दप्तरांमध्ये जे कामकाज होई त्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची प्रमुख जबाबदारी संस्थेच्या अध्यक्षांवर असे. पण ऑक्टोबर १, १९७१ रोजी सर्वसाधारण वार्षिक सभेत फार महत्त्वाची भाषणे देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष “पवित्र स्थळ योग्य स्थितीत आणणे” या विषयावर तर उपाध्यक्ष “कायदेशीर संस्थेपासून भिन्न असणारे नियमन मंडळ” या विषयावर बोलले. मग, आता कायदेशीर संस्था आणि नियमन मंडळ यात कोणता फरक आहे?
१४. कायदेशीर संस्था व नियमन मंडळ यात कोणते फरक आहेत?
१४ आपण आधीच पाहिले आहे की, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया या संस्थेचे सात सदस्यांचे संचालक मंडळ आहे. या समर्पित ख्रिश्चनांची संचालकपदावर तीन वर्षे राहण्यासाठी संस्थेच्या सदस्यांकरवी निवड होते. या सदस्यांची संख्या ५०० पेक्षा अधिक नसून ते बहुतांशी अभिषिक्त ख्रिस्ती नाहीत. याखेरीज, संस्थेचे अस्तित्व हे शुद्ध कायदेशीर स्वरुपाचे असून त्यात भौगोलिक दप्तर समाविष्ट असल्यामुळे त्याजवर कैसर किंवा राज्याकरवी बंदीही आणता येऊ शकते. (मार्क १२:१७) तथापी, नियमन मंडळ हे काही कायदेशीर साधन नाही. त्याच्या सदस्यांची निवड होत नाही. त्यांची यहोवा देव व येशू ख्रिस्त यांच्यामार्फत पवित्र आत्म्याकरवी नियुक्ती होते. (पडताळा प्रे. कृत्ये २०:२८.) याचप्रमाणे नियमन मंडळात आत्म्याने नियुक्त असणारे लोक आहेत ज्यांच्यावर विशिष्ठ भौगोलिक स्थानाचे किंवा दप्तराचे बंधन नाही.
१५. द वॉचटावर मासिकाच्या डिसेंबर १५, १९७१ च्या अंकात संस्थेविषयी कोणते विधान मांडण्यात आले आहे, आणि आधुनिक काळातील नियमन मंडळाविषयी काय म्हणता येईल?
१५ वैचारिक बाबतीत ही जी सुधारणा करण्यात आली त्याविषयी डिसेंबर १५, १९७१ चे द वॉचटावर मासिक म्हणतेः “यहोवाचे ख्रिस्ती साक्षीदार हे ओळखतात व समजतात की, ही काही एका मनुष्याकरवीची धार्मिक संस्था नाही. पण तिला आत्म्याने अभिषिक्त असणाऱ्या ख्रिश्चनांचे नियमन मंडळ आहे.” अभिषिक्त दास वर्गाचे नियमन मंडळ तसेच दुसरी मेंढरे याजमध्ये असणारे त्यांचे लाखो सहकारी यांना संस्थेच्या देखरेखीच्या दप्तराची काळजी घेण्यासाठी प्रगतिशीलपणे तयार करण्यात आलेले आहे.
१६. १९७१ पासून ख्रिस्ताची पृथ्वीवरील मिळकत कशी वाढत आहे, आणि यापैकी काही गोष्टी कोणत्या आहेत ज्या विश्वासू व बुद्धिमान दास व त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नियमन मंडळाला सोपविलेल्या आहेत?
१६ राजा येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील मिळकतीची सतत वाढ होत आहे. १९७१ पासून साक्षीदारांच्या १६,००,००० पेक्षा कमी असणाऱ्या संख्येत वाढ होत राहून ती १९८९ मध्ये ३७,००,००० पेक्षा अधिकावर गेली. देवाच्या आशीर्वादाचा केवढा हा पुरावा! (यशया ६०:२२) या वाढीमुळे संस्थेचे मुख्यालय व त्याच्या शाखा दप्तरांच्या सोयीत विस्तार याचप्रमाणे पुस्तकांची निर्मिती व त्यांचे वितरण यांचे आधुनिकीकरण करण्याची गरज आली. यामुळे जगभरात पुष्कळ राज्य सभागृहे व अधिक संमेलन सभागृहांची निर्मिती झाली. हे सर्व होत असता नियमन मंडळही प्रचार कार्यावरील देखरेख, पवित्र शास्त्र साहित्याची निर्मिती आणि शाखा दप्तर, प्रांतिय, विभागीय व मंडळ्यातील देखरेख्यांची नियुक्ती याविषयीची जबाबदारी पूर्ण करीत आले आहे. या त्या राज्य-आस्था आहेत ज्या ख्रिस्ताने आपल्या विश्वासू व बुद्धिमान दास वर्गाला व त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नियमन मंडळाला सोपविलेल्या आहेत.
१७. देखरेखीसंबंधाने कोणत्या सुधारणा १९७१, १९७४ व १९७६ मध्ये करण्यात आल्या?
१७ पहिल्या शतकातील नियमन मंडळाची वाढ होऊन त्यात येशूच्या प्रेषितांशिवाय अधिकांचा भरणा झाला. जेव्हा सुंतेचा प्रश्न सोडविण्यात आला तेव्हा त्या मंडळात “प्रेषित व यरुशलेमातील वडीलजन” यांचा समावेश होता हे उघड आहे. (प्रे. कृत्ये १५:१, २) याचप्रमाणे १९७१ मध्ये तसेच १९७४ मध्ये नियमन मंडळाचा विस्तार झाला. देखरेखीच्या कामात सुविधा व्हावी यासाठी नियमन मंडळाने पाच समित्यांची नेमणूक केली, ज्या जानेवारी १, १९७६ पासून कार्यवाहित झाल्या. प्रत्येक समितीमध्ये सहा सदस्य आहेत; या सर्वांना विशिष्ठ विषयाच्या बाबतीत आपले मत प्रदर्शित करण्याचा समान अधिकार आहे. प्रत्येक समितीचा अध्यक्ष एक वर्षभर सेवा करतो आणि नियमन मंडळाचे विशिष्ट सदस्य एक किंवा अधिक समित्यांवर सेवा करतात. या पाच समितीतील प्रत्येक ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील मिळकतीच्या विशिष्ट भागाकडे लक्ष देते. सहावी समिती, जी अध्यक्षांची समिती आहे, तिचे सभासदत्व दरवर्षी बदलत राहाते, तातडीच्या समस्यांची हाताळणी करते.
नियमन मंडळाशी क्रियाशील सहकार्य
१८. नियमन मंडळाचे कार्य कसे चालते, आम्ही त्याविषयीचे आपले सहकार्य कसे दाखवू शकतो?
१८ नियमन मंडळाच्या समित्या दर आठवडी सभा घेऊन त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टींची उजळणी करतात, प्रार्थनाशील विचार करून निर्णय घेतात व भावी ईश्वरशासित कार्य हालचालीच्या योजना आखतात. आपण आधी पाहिले त्याप्रमाणे प्रेषितांची कृत्ये याचा १५ वा अध्याय, एका गहन प्रश्नाच्या बाबतीत काही ठराव संमत व्हावा यासाठी तो पहिल्या शतकाच्या नियमन मंडळाकडे विचारासाठी पाठविण्यात आला, याची माहिती देतो. तसेच आजही, महत्त्वाच्या प्रश्नांना सबंध नियमन मंडळाच्या विचारासाठी पाठविले जाते, ते दर आठवडी किंवा जरुर भासेल तर अधिक वेळा एकत्र भेटते. सध्या १२ सदस्य असलेले नियमन मंडळ, शास्त्रवचने व प्रार्थनेकरवी यहोवा देवाच्या मार्गदर्शनाचा शोध घेते. आम्ही या नियमन मंडळाच्या सहकार्याविषयी आपली आत्मीयता आपल्या दररोजच्या प्रार्थनेत या खास नेमणूक लाभलेल्या सदस्यांसाठी प्रार्थना करून व्यक्त करू शकतो.—रोमकर १२:१२.
१९. नियमन मंडळाकडील सूचना मंडळ्यास कशा पोहंचतात?
१९ नियमन मंडळाकडील सूचना व निर्णय मंडळ्यांकडे कसे पोहंचतात? पहिल्या शतकातील नियमन मंडळाने पवित्र आत्म्याच्या मदतीने आपला निर्णय घेतल्यावर त्यांनी सर्व मंडळ्यांना पत्र पाठविले. (प्रे. कृत्ये १५:२२-२९) तथापि, आज ख्रिस्ती प्रकाशने हा प्रमुख मार्ग आहे.
२०. (अ) १९७६ मध्ये आणखी कोणती संघटनात्मक सुधारणा केली गेली? (ब) शाखा समित्या नियमन मंडळास कसे सहकार्य देतात?
२० फेब्रुवारी १, १९७६ पासून वॉच टावर संस्थेच्या प्रत्येक शाखेत एका शाखा समितीची नियुक्ती करण्यात आली आहे, जीत नियमन मंडळाकरवी नियुक्ती लाभलेली कार्यक्षम मनुष्ये असतात. एका किंवा अधिक देशांसाठी नियमन मंडळाचे प्रतिनिधी असल्यामुळे या बंधूंनी विश्वासू, निष्ठावंत असले पाहिजे. येथे आम्हाला प्राचीन इस्राएलात मोशेला न्यायदान करण्याच्या कामी मदत देण्यासाठी ज्या योग्य, देवभिरु आणि विश्वासपात्र पुरुषांची निवड झाली होती, त्यांचे स्मरण येते. (निर्गम १८:१७-२६) शाखा दप्तरातील सदस्य संस्थेची पुस्तके, मासिके व आमची राज्य सेवा याकरवी आणि साधारण पत्रे व खास अशा स्थानिक समस्यांविषयी पत्रे लिहून सूचना लागू करतात. प्रत्येक देशातील कामाची प्रगति आणि उद्भवणाऱ्या समस्या याविषयी शाखा समित्या नियमन मंडळाला अद्ययावत माहिती देत असतात. सर्व जगभरातून आलेल्या या अहवालाद्वारे नियमन मंडळाला संस्थेच्या प्रकाशनात कोणते विषय घेतले जाण्यास हवे ते ठरविता येते.
२१. फिरत्या देखरेख्यांची कशी नियुक्ती होते, आणि त्यांची कोणती कर्तव्ये आहेत?
२१ शाखा समित्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली प्रौढ व आध्यात्मिक पुरुषांची विभागीय व प्रांतिय देखरेखे यांच्या कामासाठी शिफारस करतात. नियमन मंडळाकडून थेट नियुक्ती लाभल्यावर ते फिरते देखरेखे म्हणून सेवा करतात. हे बांधव विभाग व मंडळ्यांना भेटी देऊन बांधवांना नियमन मंडळाकरवी प्राप्त झालेल्या सूचनांचा कसा अवलंब करावा याची तसेच आध्यात्मिक गोष्टींची मदत देतात. (पडताळा प्रे. कृत्ये १६:४; रोमकर १:११, १२.) फिरते देखरेखे शाखा दप्तराला आपला अहवाल कळवतात. पवित्र आत्मा तसेच प्रेरित शास्त्रवचने याद्वारे ते, नियमन मंडळ वा त्याच्या प्रतिनिधीमार्फत मंडळ्यात उपाध्य सेवक किंवा वडील या नात्याने नियुक्ती मिळावी म्हणून बांधवांची शिफारस करण्यासाठी स्थानिक वडीलांसोबत सहभाग घेतात.—फिलिप्पैकर १:१; तीत १:५; पडताळा १ तीमथ्य ३:१-१३; ४:१४.
२२. (अ) मंडळीतील वडील नियमन मंडळाशी कसे सहकार्य करतात? (ब) या ईश्वरशासित व्यवस्थेला यहोवाचा आशीर्वाद मिळत आहे हे कशावरुन दिसते?
२२ आता ज्यांचा मिळून वडीलांचा वर्ग बनतो, तो ‘आपल्याकडे व ज्या कळपात त्यांना पवित्र आत्म्याने देखरेखे केले आहे त्या कळपाकडे लक्ष’ देतात. (प्रे. कृत्ये २०:२८) हे देखरेखे, यहोवा देव व येशू ख्रिस्त विश्वासू व बुद्धिमान दास व त्याचे नियमन मंडळ याद्वारे देत असलेल्या सूचनांचे विश्वासूपणे अवलंबन करतात. या ईश्वरशासित व्यवस्थेला देव आशीर्वादित करीत आहे कारण ‘मंडळ्या विश्वासात स्थिर होत आहेत व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे.’—प्रे. कृत्ये १६:५.
२३. नियमन मंडळाच्या बाबतीत काय करण्याचा आमचा निर्धार असला पाहिजे?
२३ यहोवा देव व येशू ख्रिस्त हा धनी नियमन मंडळ्याद्वारे देवाच्या लोकांविषयी आपला आधार प्रगट करीत आहेत हे किती सुंदर आहे बरे! (स्तोत्रसंहिता ९४:१४) यहोवाच्या संस्थेचा एक भाग असल्यामुळे आम्हाला व्यक्तीगतपणे या आधारामुळे लाभ मिळत आहे. (स्तोत्रसंहिता १४५:१४) यामुळे देवाच्या व्यवस्थेशी सहकार्य करण्याचा आमचा निश्चय अधिक बळकट होण्यास हवा. आम्ही काळाच्या ओघात जसजसे पुढे जात राहू आणि मग तो दिवस येईल जेव्हा “सागर जसा जलपूर्ण आहे तशी यहोवाच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल,” तोपर्यंत नेहमीच यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाशी सहकार्य करीत आहोत असे आमच्या बाबतीत दिसून येवो.—यशया ११:९.
लक्षात ठेवण्याजोगे मुख्य मुद्दे
◻ १९१९ मध्ये कारभारी वर्गाला कोणत्या वाढत्या जबाबदाऱ्या मिळाल्या?
◻ कित्येक वर्षे दृश्य नियमन मंडळाची कोणासोबत ओळख मिळत असे?
◻ नियमन मंडळाच्या सदस्यांच्या नेमणूकीविषयी कोणत्या प्रगतिशील सुधारणा केल्या गेल्या?
◻ ख्रिस्ताने दास वर्ग व त्याचे नियमन मंडळ याला सोपविलेल्या सर्वस्वातील वा मिळकतीतील काही कोणत्या आहेत?
◻ आम्हाला नियमन मंडळाला कसे सहकार्य देता येईल?
[१६, १७ पानांवरील चित्रं]
न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील जागतिक मुख्यालयातून नियमन मंडळ वॉच टावर संस्थेच्या जगभरातील ९३ शाखांकरवी यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचार कार्य तसेच त्यांची प्रकाशने यावर निरिक्षण ठेवते
जर्मनी
जपान
दक्षिण आफ्रिका
ब्राझिल