वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ७/१ पृ. ३०-३१
  • खरा प्रभु न्यायासाठी येतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरा प्रभु न्यायासाठी येतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे नाव तुच्छ लेखणे
  • न्याय व शुद्धीकरण
  • यहोवाचा दिवस येत आहे!
  • मलाखी पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • यहोवाचा दिवस येईल तेव्हा कोणाचा बचाव होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाला विश्‍वासघाताचा वीट आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवाच्या अपेक्षा पूर्ण केल्याने त्याचा महिमा होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ७/१ पृ. ३०-३१

शास्त्रवचनातील धडेः मलाखी १:१-४:६

खरा प्रभु न्यायासाठी येतो

“देवाची सेवा करणे व्यर्थ आहे.” (मलाखी ३:१४) असा हा संशयखोर वाद, मलाखीने इ. स. पू. पाचव्या शतकात संदेश दिला तेव्हा देवाच्या स्वतःच्या लोकांनी केला. पण का बरे? कारण यहुदामध्ये खासपणे याजकवर्गात शोचनीय स्थिती अस्तित्वात होती. त्यांचे प्रमुख ध्येय स्वार्थाने मिळविलेली कमाई ही होती. याकारणास्तव, मलाखीने त्या ढोंगी धर्मनेत्यांना सडेतोड व कडक शब्दात कानउघाडणी करुन त्यांचे पितळ उघडे केले आणि इशारा दिला की खरा प्रभु न्यायासाठी येणार.—मलाखी १:६-८; २:६-९; ३:१.

मलाखीच्या भविष्यवादाची पूर्णता आज आमच्या दिवसात आहे. यास्तव त्यातील धडे आम्ही विचारात घेणे हे चांगले आहे.

देवाचे नाव तुच्छ लेखणे

यहोवा, त्याच्या लोकांनी सर्वोत्तम ते द्यावे अशी अपेक्षा करतो. देव सर्वप्रथमतः आपल्या लोकांविषयीचे प्रेम व्यक्‍त करतो. तरीपण, याजक लोकांकडून अंधळे, रोगी व लंगडे पशु अर्पणासाठी स्विकारुन त्याचे नाव तुच्छ लेखतात. यहोवाला स्वार्थी याजकांमध्ये वा त्यांच्या हातच्या हीन अर्पणाविषयी आनंद वाटत नाही. परंतु, ते काहीही करोत, यहोवाचे “नाव राष्ट्रांमध्ये भयप्रेरित होणार.”—१:१-१४.

शिक्षक असणाऱ्‍यांवर भारी जबाबदारी आहे. (याकोब ३:१) याजक “पुष्कळांना नियमशास्त्रात अडखळण्याचे कारण” झाले. ते कसे? देवाच्या नियमांचे शिक्षण लोकांना देण्यात अपयशी झाल्यामुळे व पक्षपात दाखविण्यामुळे. यहोवा त्यांच्यावर उचितपणे रागावतो, कारण “याजकांच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्यांच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे.”—२:१-९.

वैवाहिक योजनेबाबत तुच्छता दाखविणाऱ्‍यांकडे यहोवा सौम्यपणे पाहात नाही. देवाच्या नियमांना डावलून लावून यहुदातील पुरुषांनी विदेशी बायका केल्या. (अनुवाद ७:३, ४) त्यांनी आपल्या तारुण्यातील स्त्रियांना घटस्फोट देऊन त्यांचा विश्‍वासघात केला. यहोवा ‘सूटपत्राचा द्वेष करतो,’ असा मलाखी इशारा देतो.—२:१०-१७.

न्याय व शुद्धीकरण

यहोवा वाईट सदासर्वकाळ सहन करणार नाही. “खरा प्रभु” त्याच्या मंदिरात “कराराच्या निरोप्या”सोबत येईल. तो लेवीच्या पुत्रांना शुद्ध व स्वच्छ करील. यहोवा स्वतः जादुगार, व्यभिचारी, खोटे साक्षी, लुबाडणूक व जुलूम करणाऱ्‍यांविरुद्ध साक्षीदार होईल.—३:१-५.

यहोवापासून आपली अर्पणे आवरुन धरणारे स्वतःला गरीब करतात. यहोवा बदलणारा नाही. स्वच्छंदी लोक त्याजकडे फिरले तर तो त्यांजकडे दयाळूपणे फिरेल. ते देवास दशमांश व दान देण्यापासून मागे राहून लुटीत होते. परंतु त्यांनी दहावा हिस्सा आणिला तर यहोवा “जागा पुरणार नाही एवढे देण्याच्या” आशीर्वादाचे अभिवचन देतो. त्यांना पिकाच्या नासधुशीचा अनुभव येणार नाही.—३:६-१२.

यहोवाचे नेत्र त्याच्या लोकांवर असतात. देव त्याच्याविरुद्ध कठोरपणे बोलणाऱ्‍यांविरुद्ध वाद मांडतो. पण जे त्याचे भय बाळगतात अशांवर तो सूक्ष्म लक्ष ठेवतो. “त्याच्या नामाचे स्मरण करणाऱ्‍यांची” “एक स्मरणवही” लिहिली जाईल. त्याचे लोक धार्मिक लोक व दुष्ट यांच्यातील भेद पाहतील.—३:१३-१८.

यहोवाचा दिवस येत आहे!

यहोवाच्या दिवसाचा अर्थ दुष्टांचा संपूर्ण नाश असा होईल. यहोवाचा दिवस येत असून त्यात, भट्टीत धसकट भस्म होते त्याप्रमाणे दुष्टांचे पारिपत्य होईल. त्यांचे ‘मूळ फांदी वगैरे’ न उरता भस्म केले जातील. यहोवाचे भय बाळगणारे “न्यायत्वाच्या सूर्याचे” आरोग्यदायी फायद्यांचा आनंद लुटतील. हा महाभयानक दिवस येण्यापूर्वी यहोवा एलिया संदेष्ट्यास पुनर्रचनेच्या कार्यासाठी पाठवील.—४:१-६.

आजच्यासाठी धडाः भक्‍तीच्या बाबतीत आपल्या लोकांनी सर्वोत्तम द्यावे असे यहोवा अपेक्षितो. (पडताळा मत्तय २२:३७, ३८.) देवाच्या वचनांचे शिक्षण देणाऱ्‍यांवर योग्य प्रकारे शिक्षण देण्याची व इतरांना खऱ्‍या भक्‍तीकडे निरविण्याची जबाबदारी आहे. विवाहास योग्य तो आदर देण्यात अपयशी ठरणाऱ्‍यांवर तसेच दुष्टतेत जडून राहणाऱ्‍यांवर न्यायप्रेमी देवाचे नेत्र आहेत हे स्मरण ठेवल्यास आमचे बरे होईल. “यहोवाच्या त्या महाभयानक दिवस येण्याची” आतुरतेने वाटत पाहत असता आम्ही खऱ्‍या प्रभुच्या स्वच्छ व शुद्धीकरणाच्या कामास नम्रपणे अधीन राहू या!

[३१ पानावरील चौकट]

पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण

● १:१०—स्वार्थी, धनासाठी अतृप्त असणारे याजक स्वकमाईसाठी सेवा करीत होते. मंदिरातील सर्वात सोप्या कामासाठी जसे की दारे बंद करणे किंवा वेदीस पेटविणे याकरता ते मोबदल्याची मागणी करीत. तेव्हा यहोवा ‘त्यांच्या हाताच्या अर्पणाने संतोष पावत नव्हता’ हे आश्‍चर्याचे नव्हते!

● १:१३—अविश्‍वासू याजक अर्पणांकडे ती त्रासदायक बोजड सेवा म्हणून पाहण्यापर्यंत पोहंचले होते. ते यहोवाच्या पवित्र गोष्टीकडे तुच्छतेने व उपहासाने पहात. आम्ही “आमच्या ओठांचे फळ” केवळ औपचारिकता म्हणून सादर करण्यास वाव देऊ नये!—होशेय १४:२; इब्रीयांस १३:१५.

● २:१३—पुष्कळ यहुदी पती त्यांच्या तारुण्यातील पत्नीला, कदाचित विदेशी तरुणीसोबत विवाह संपादता यावा याकरता सूटपत्र देत. यहोवाची वेदी जणू अश्रूंनी झाकली होती—स्पष्टपणे ते देवापुढे मंदिरात त्यांचे दुःख सांगण्यात आलेल्या त्या सोडलेल्या स्त्रियांचे होते.—मलाखी २:११, १४, १६.

● ३:१—“खरा प्रभु” यहोवा देव व “कराराचा निरोप्या” येशू ख्रिस्त आहे. या भविष्यवादाची प्राथमिक पूर्णता येशूने मंदिराचे शुद्धीकरण केले तेव्हा झाली. (मार्क ११:१५-१७) हे त्याला अभिषिक्‍त राजा म्हणून अभिषेक होण्याच्या साडेतीन वर्षांनी घडले. याचप्रमाणे येशूला १९१४ च्या शरद ऋतुमध्ये राजा यानात्याने स्वर्गात अधिष्ठित करण्याच्या साडेतीन वर्षांनंतर त्याने यहोवासोबत आत्मिक मंदिरात येऊन देवाच्या लोकांस शुद्ध व स्वच्छ करण्याची निकड पाहिली.

● ३:२, ३—पूर्वीच्या शुद्धीकरणाच्या पद्धतीत बराच वेळ घेतला जात असे. याकरताच शुद्ध करणारा बहुधा बसून “वाट” पाही आणि धातुवरील रासायनिक द्रव चकाकणाऱ्‍या आरशाप्रमाणे होईपर्यंत व त्यात त्याची छटा दिसून येईपर्यंत थांबून राही. याचप्रमाणे यहोवा आज त्याच्या लोकांना त्यांच्यातील अशुद्ध शिकवणूकी आणि चालीरिती पूर्णपणे दूर करीपर्यंत शुद्ध करीत आहे. याकरवी त्यांना देवाच्या अधिक प्रतिरुपाप्रमाणे होण्यास मदत मिळाली आहे.—इफिसकर ५:१.

● ४:२—देवाच्या नावाचे भय बाळगणाऱ्‍यांना भवितव्यात कोणत्या आशीर्वादांचा आनंद मिळेल त्याचे हे वर्णन आहे. त्यांना देवाच्या कृपापंसतीच्या सूर्यरुपी किरणात, जेथे मानवी कुटुंबास ग्रासून टाकणारे शारीरिक, मानसिक व भावनिक आजारापासून बरे केले जाईल तेव्हा राहण्याचे भवितव्य आहे.—प्रकटीकरण २१:३, ४.

● ४:५—हा भविष्यवाद देण्याच्या ५०० वर्षांआधी एलिया संदेष्टा जिवंत होता. पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा करणारा योहानास प्रतिनमुनेदार एलिया असे संबोधिले. (मत्तय ११:१२-१४; मार्क ९:११-१३) तथापि, “एलिया”स “यहोवाच्या दिवसा”चा वाटाड्या म्हणून पुढे येणे होते, हे ख्रिस्ताच्या या वेळेच्या “उपस्थिती”च्या भावी पूर्णतेकडे निर्देश करते.—२ थेस्सलनीकाकर २:१, २.

[३० पानांवरील चित्रं]

येशूने आपल्या पृथ्वीवरील उपाध्यपणात मंदिराची स्वच्छता केली. तो १९१८ मध्ये देवाच्या लोकांची शुद्धता करण्यासाठी यहोवासोबत आध्यात्मिक मंदिरात आला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा