थोर चित्रकार यहोवा!
“सूर्योदय व सूर्यास्त यांची अनेक चित्रे चित्रकारांनी काढली आहेत व ती शेकडो काय पण हजारो डॉलर्सना विकली गेली आहेत. तरीपण यहोवा देव, थोर चित्रकार तसेच सूर्योदय व सूर्यास्ताचा संघटक आपल्याला प्रत्येक दिवस फुकट देतो. हे सूर्योदय व सूर्यास्तांचे देखावे चित्रांपेक्षा कितीतरी अधिक पटीने भरदार वाटतात. या कारणामुळे आपल्याला निर्माणकर्त्याविषयी अधिक रसिकता वाटायला नको का?” अशा पद्धतीने हवाई येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना भेट देणाऱ्या प्रवासी देखरेख्यांनी मंडळीत दिलेल्या आपल्या भाषणात विचार मांडले.
त्या सभागृहात हे भाषण एक नास्तिक स्त्री ऐकत होती. ती या सभेला प्रथमच आली होती. तिने वक्त्याचा विवाद लक्षपूर्वक ऐकला तरीपण देवाविषयीच्या अस्तित्वाबाबतच्या आणखी काही शंका तिला राहिल्या. तथापि, साधारण दोन वर्षांनी एकदा ती कामावरून आपल्या घरी जात असता रहदारीमध्ये अडकून पडली तेव्हा तिला विलोभनीय सूर्यास्त बघायला मिळाला. तेव्हा तिच्या स्मरणात प्रवासी देखरेख्याचे भाषण पुन्हा आले.
ती म्हणतेः “रहदारीत अडकून पडल्यामुळे चिडून जाण्याऐवजी मी तो सूर्यास्त न्याहाळला आणि मला वक्त्याने, यहोवा देवाची एक चित्रकार व निर्माता या नात्याने रसिकता दाखविण्याविषयी जे म्हटले ते लक्षात आले. मी विचार केलाः ‘कदाचित त्यांचे म्हणणे खरेही असू शकेल; कोणी निर्माणकर्ता असला पाहिजे.’ मी घराकडे निघाले तेव्हा याचाच विचार करीत राहिले आणि मला राज्य सभागृहातील सभेला येण्याचे आमंत्रण देणाऱ्या मित्राची त्या रात्री मी भेट घेतली. मी पवित्र शास्त्राचा अभ्यास आरंभिला आणि आता मी यहोवाची माझा देव व निर्माणकर्ता या नात्याने भक्ती करीत आहे.”
या स्त्रीने, स्तोत्रकर्त्याप्रमाणेच यहोवा हा निर्मितीचा थोर चित्रकार आहे एवढेच मानले नाही तर त्याची स्तुतीही तिने गायिली. स्तोत्रकर्त्याने लिहिलेः “यहोवाचे स्तवन करा, आकाशातून यहोवाचे स्तवन करा. . . . अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा. सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो, त्याचे स्तवन करा. . . . ती यहोवाच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली.”—स्तोत्रसंहिता १४८:१-५.