तीन मागी लोक सत्य गोष्ट किंवा कल्पित कथा?
“C + M + B”
या अक्षरांचा आपणाकरिता काही अर्थबोध होतो का? आपण जर फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या कॅथोलिक वसाहतीमध्ये राहात असाल तर कदाचित तो होऊ शकेल. तुम्हाला ती अक्षरे व वर्ष ही खडूने दाराच्या कपाळपट्टीवर लिहिलेली दिसतील. ते असे का?
ही अक्षरे ज्यांना मागी किंवा “ज्ञानी लोक” म्हणून संबोधितात त्यांच्या नावाची जर्मन भाषेतील आद्याक्षरे आहेत अशी प्रसिद्ध दंतकथा आहे. ती आद्याक्षरे म्हणजेच, Gaspar (जर्मन भाषेत, Caspar), Melchior, आणि Balthasar.a अशी समज पसरलेली आहे की, मागी लोकांची हाडे इ. स. ११६४ मध्ये कॅल्गेने येथे स्थलांतरीत केली, नंतर ती शहरातील प्रमुख मंदिरात गाडण्यात आली व याप्रकारे कॅल्गेने शहरास त्यांच्या भक्तीचे यात्रा स्थळ बनविण्यात आले. दरवर्षी जानेवारी ६ ला तीन पवित्र राजांच्या सणाचा दिवस पाळला जातो, त्या दिवशी तरूणांचे घोळके पुरातन काळच्या राजांसारखे कपडे घालून दारोदार जातात व खडूने ती अक्षरे दाराच्या कपाळपट्टीवर लिहितात. यामुळे घरमालकाला आपत्तीपासून संरक्षण मिळते असे समजले जाते.
धार्मिक कलाकृती तसेच परंपरा हे सूचित करते की, या तीन मागी किंवा “राजे” यांची वाट एका “ताऱ्याने” जेथे येशूचा जन्म झाला होता तेथपर्यंत मार्गदर्शित केली. या ‘राजां’ना जो सन्मान, इतकेच काय पण भक्ती वाहिली जाते ते पाहता, हा प्रश्न उद्भवतो की, हा विश्वास शास्त्रवचनांवर आधारीत आहे का.
या पाहुण्यांचा उल्लेख फक्त मत्तय शुभवर्तमानात आढळतो. (मत्तय २:२-१२) पण ते तिघेच होते, राजे होते असा मत्तयाने उल्लेख केला का, तसेच त्याने त्यांची नावे टिपली का? किर्चेनझेईटंग फर दास बिस्टूम अचेन हे कॅथोलिक वर्तमानपत्र याची कबुली देते की, “या तीन पवित्र राजांचा पवित्र शास्त्रात तसा उल्लेख नाही. सहाव्या शतकाच्या सुरवातीपासून या ज्ञानी लोकांना . . . राजे असे मानण्यात येऊ लागले. . . . त्या फलज्योतिषांच्या संख्येविषयी, . . . मत्तय कोणताच तपशील देत नाही. . . . नवव्या शतकात ते प्रथमतःच गॅसफर, मेलकीओर आणि बेलथासर या नावांनी प्रकट झाले.” आणखी, लेक्सिकन फर थिऑलॉजी ॲण्ड किर्चे हे कॅथोलिक लिखाण म्हणते की, मॅʹगोई या ग्रीक शब्दाचा अर्थ राजे नसून ज्योतिषीविषयक गूढ ज्ञानाचे जाणकार असा होतो. जस्टीन मार्टर, ऑर्जीन तसेच टर्टुलिन या प्रत्येकांनी त्या शब्दाचा अर्थ “ज्योतिषी” असाच घेतला. आधुनिक शास्त्र भाषांतरेही मत्तय २:१, ७ येथे “ज्योतिषी” हा शब्द उपयोगात आणून आहेत.—लिव्हिंग बायबल; ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन.
येशू बाळाच्या जन्माचे दृश्य जेथे दाखविण्यात येते तेथे सहसा “तीन राजे” दाखविले जातात. पण वस्तुतः हे येशूच्या जन्माच्या वेळी हजर होते का? लेक्सिकन पुढे म्हणतेः “मत्तय २:१६ हे सूचित करते की, ही भेट येशूच्या जन्मानंतर एक किंवा अधिक वर्षानंतरची असावी.” जेथे या लोकांनी “बाळकास पाहिले” ते ठिकाण गव्हाणी नव्हे तर “घर” होते असे ११ वे वचन अगदी खरेपणाने सांगते.—किंग जेम्स व्हर्शन.b
मग, “पवित्र राजे” या संज्ञेबद्दल काय? पाहुण्यांना पवित्र म्हणणे योग्य आहे का? शास्त्रवचनांनी तर त्यांचे तसे कोठेच वर्णन केले नाही. ती माणसे खरे पाहता, ईश्वरी आज्ञेचा भंग करणारी होती. यशया ४७:१३, १४ म्हणते की, देव “आकाशातील गणांची भक्ती करणारे [“ज्योतिषी,” सेप्ट्युजंट भाषांतर] व नक्षत्रे पाहणारे” यांचा धिक्कार करतो. (पडताळा अनुवाद १८:१०.) हे ज्योतिषी “पूर्वेकडून” आल्याचा उल्लेख आहे म्हणजेच जे भूतविद्येचे केंद्रस्थान, अपवित्र बाबेलोन, जेथे केवळ खोट्या दैवतांची भक्ती चाले, तेथून ते आले होते. यामुळेच त्यांच्या कल्पनेनुसारचा दिशा दाखवणारा “तारा” यामुळे त्यांना मार्गदर्शन मिळाले, पण असा हा तारा बघितल्याचे इतर कोणीही कळवले नाही. तसेच मत्तयमधील अहवाल म्हणतो की त्या “ताऱ्या”ने त्यांना प्रथम, येशूचा घात करू पाहणाऱ्या हेरोद राजाकडे नेले.—मत्तय २:१, २.
नाही, देवाने त्यांना येशूकडे पोहंचविण्यास असला कोणताही “तारा” दाखविला नाही. तर मग, हा “तारा,” ज्याने येशू मोठा होऊन त्याला देवाकरवीची नेमणूक पूर्ण करता येऊ नये म्हणून त्याच्या जन्मानंतर घात करण्याची इच्छा धरली होती त्याने तर दाखविला नसावा हे उघड होत नाही का?—पडताळा उत्पत्ती ३:१५.
देवाच्या वचनात “संप्रदाय” मिळवून ते “रद्द” करण्याचे प्रयत्न होतील असा इशारा येशूने दिला होता. (मत्तय १५:६) तद्वत, मागी लोकांच्या अनुषंगाने असणारा सांप्रदाय निश्चितच अशास्त्रीय आहे. तर मग, ज्योतिषांना पवित्र मानणे किंवा त्यांना विभूषित करणे हे चुकीचे आहे हे तुम्हास पटत नाही का?
[तळटीपा]
a याच्या खुलाशासाठी पाद्रीवर्ग त्या लॅटिन संज्ञेकडे निर्देश करतात, जी आहेः Christus mansionem benedicat, म्हणजे “ख्रिस्त या घरावर आशीर्वाद पाठवो.”
b ज्योतिषांच्या आगमनाबद्दलच्या अधिक माहितीसाठी द वॉचटावरचा डिसेंबर १५, १९७९ चा अंक, पृष्ठ ३० पहा.