यशप्राप्ती कोणत्याही किमतीवर?
यश मिळविण्याचा निर्धार हे सूचित करतो की, एखाद्यापाशी निश्चित ध्येय आहे. तुमचे जीवनातील ध्येय कोणते आहे? ते गाठण्यासाठी तुमची काय करण्याची तयारी आहे? तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी व समाधानी व्हावे यासाठी प्रामुख्यत्वे कशाचा पाठलाग करण्यास हवा?
जगातील अविकसनशील देशात, सर्वसाधारण राहणीमान ही गोष्ट इष्ट बनली आहे. येथे ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते पाहता, देववचनातील योग्य सल्ला, आम्ही जगात कोठेही वसाहतीस असलो तरी आमच्या ध्येयांची व यशाची मूल्ये वाढविण्यात मदत करील.
गरीबीने घेरलेले असता, अनेकांनी इतर उद्दिष्टांमागे धावण्याऐवजी प्रथम आर्थिक यशप्राप्ती मिळवण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. हे साध्य करण्यात तर काहीजन भ्रष्टाचारी बनले आहेत. पण हेच लोक खरे ख्रिस्ती बनतात तेव्हा त्यांनी पवित्र शास्त्रातील नीतीमान आदर्शाचे अनुकरण करताना अशा प्रवृत्तींना सोडून देण्यास हवे.
तथापि, काही ख्रिस्तीजन परत काही जगीक ध्येयात स्वतःला गुरफटून घेतात. त्यांची प्राप्ती मिळविण्यासाठी ते ख्रिस्तेत्तर वागणूकीच्या मोहात पडतात. पालक आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. काहीजण देवाच्या सेवेकडे दुर्लक्ष करतात. तर मग, यामुळे जीवनात खरे समाधान व सौख्यता ही प्राप्त करण्यातील परिणाम काय असेल असे तुम्हाला वाटते?
या परिणामाबाबतचे इशारे देताना पवित्र शास्त्र म्हणतेः “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि मनुष्यांस नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.
“सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ,” “फार खेदांनी भोसकून घेतले” ही विधाने समाधान वा सौख्यता लाभल्याचे काहीच सांगत नाहीत. सांगतात का? तरीपण गेल्या कित्येक शतकातील तसेच आजच्या काळातील लाखो लोकांचा अनुभव हे सिद्ध करुन सांगतो की, पवित्र शास्त्रातील तो सिद्धांत केवढा सत्य आहे. मग, हे आम्हाला ख्रिस्ती ध्येये व जीवनाक्रमण याविषयी कसली शिफारस करते?
बहकले गेले—कसे?
ख्रिस्तीजन कोणकोणत्या मार्गी विश्वासापासून बहकण्याचा संभव आहे? काही तर एवढ्या दूरवर बहकले आहेत की, ते ईश्वरी नैतिकता आणि विश्वास यांना पूर्णपणे नाकारतात. इतर काही प्रकरणात काहीजण ईश्वरी भक्तीच्या मार्गापासून बाजूला झाले आहेत एवढेच नव्हे तर काहींनी तर या भक्तीमार्गाचा आपल्या स्वार्थाकरता अयोग्य फायदा उचलून इतरांवर आपला प्रभाव पाडण्यात उपयोग केला. यासाठीच, पवित्र शास्त्र “मन [विचार] बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, सुभक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणारे” लोक असल्याचे भाष्य करते. (१ तीमथ्य ६:५) प्रत्यक्षात ख्रिस्तीत्वाचा पूर्णपणात धिक्कार न करता ते कदाचित, ख्रिस्ती विश्वासास अनुलक्षून असणाऱ्या काही मूलभूत व आवश्यक अशा पवित्र शास्त्र तत्त्वांचा भंग करण्याच्या भूमिकेत स्वतःला ठेवीत असतात.
येशूने आपल्या शिष्यांना, इतरांवर धनीपण गाजवितात त्यांच्याप्रमाणे आपण नसावे असे सांगितले. तो म्हणालाः “तुम्हामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे.” यहुदीपंथीय धर्मनेत्यांचा धिक्कार करण्यात येशू आणखीनही बरेचसे बोलला. त्याने म्हटले की, जगीक मानपानास हापापलेल्यांवर देवाचा रोष येतो. (मत्तय २०:२६; २३:६-९, ३३) यास्तव, ख्रिस्तीजनांनी इतरांवर अधिक झळकण्यापेक्षा किंवा त्यांच्यावर आपले अधिपत्य गाजविण्यापेक्षा एकमेकांच्या सेवेचे योग शोधावेत. कोणत्याही किमतीवर यशप्राप्तीचा शोध करणारा धनलोभी अगदी सहजगत्या या मार्गापासून बहकू शकतो.
या संदर्भात, तुम्ही स्वतः कोठे दिसता? तुम्ही आपल्या यशाचे मोजमापन, तुम्ही जो दुसऱ्यावर अधिकार चालविता त्याच्या आधारे करीत आहात असे दिसते का? विशिष्ट अधिकाराचे प्रतिपादन करता यावे वा तो मिळवता यावा यासाठी तुम्ही ख्रिस्ती मुलतत्त्वे व शिकवणी यांना वळवता वा चतुराईने हाताळता का? आपल्या सोबत्यांपेक्षाहि अधिक आपण मिळवीत राहावे आणि यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे तुम्हाला वाटत असते का? आपली श्रीमंती वा कामातील यश याविषयी मोठमोठ्या फुशारक्या मारण्यात, अभिमानी वक्तव्य करण्यात तुम्हाला आनंद वाटतो का? जर होय, तर मी विश्वासापासून दूर बहकत चाललो तर नाही ना, याचे तुम्ही परिक्षण करण्याची गरज आहे.
“यश”प्राप्तीचे खेद
येशूने असेही म्हटलेः “पृथ्वीवर आपणाकरता संपत्ती साठवू नका; . . . कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही असणार. . . . तुमच्याने देवाची आणि धनाचीही सेवा करवत नाही.” (मत्तय ६:१९-२४) जे पालक, आपल्या मुलामुलींचे लक्ष प्रामुख्यत्वे जडवादी ध्येये व जगीक उपजिविकेच्या मार्गाकडे सतत वळवीत असतात ते या उपदेशास पाळून चालतात का? ज्यामुळे मुले सत्यास धुडकावून ख्रिस्ती शिकवणींच्या विरुद्धचे जीवनाक्रमण अनुसरण्यास सुरुवात करतील त्या जगीक यशप्राप्तीचे संपादन करण्यावर दिलेला जोर काही मोलाचा ठरेल का? ‘पृथ्वीवरील संपत्ती’करता आपल्या आध्यात्मिक जीवनाचे अर्पण देणे किंवा निदान तशी जोखीम पत्करणे मोलाचे ठरेल का? जे पालक असे करतात त्यांना मुलांसंबंधी वाटणाऱ्या काळजीमुळे तसेच त्यांना झालेल्या आध्यात्मिक तर काही वेळा शारीरिक नुकसानीमुळे ते स्वतःस “फार खेदांनी भोसकून घेतात.”
संपत्तीचा लोभ हा हक्काची मागणी करणारा स्वामी आहे. तो लोकांचा वेळ, शक्ती, कुशलता यांची मागणी करीत असतो; व सोबत ईश्वरी भक्ती खुंटवितो. हा लोभ लोकांना अमाप संपत्ती मिळवण्यास व जगीक मोठेपण मिळविण्याचे आमिष देतो; आणि याकरवी तो त्यांना विश्वासापासून अधिकाधिक दूर नेत असतो. पवित्र शास्त्र अगदी रास्तपणे म्हणतेः “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही.”—उपदेशक ५:१०.
एका आफ्रिकन व्यापाऱ्याने ख्रिस्ती धर्म स्विकारल्यानंतर देखील आर्थिक यशप्राप्तीच्या प्रेमास आपल्या जीवनात प्रधान स्थानी ठेवले. ऐहिक विचारप्रणालीच्या व्यापारी मित्रमंडळींच्या खाजगी भेटीस्तव त्याचे ख्रिस्ती कार्यांकडे दुर्लक्ष होऊ लागले. मंडळीतील वडिलांनी त्याला मदत देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने स्वतः कसलीच आध्यात्मिक प्रगति केली नाही. या अवस्थेमुळे तो आध्यात्मिक पेचात अडकला गेला—तो अशा स्थितीला पोहंचला जेथे तो अंशतः काहीच नसता आपण ख्रिस्ती आहोत अशी ओळख देऊ इच्छित होता. त्याची ही अवस्था जीवनात सखोल समाधान किंवा दीर्घकालीन सौख्यता देत नव्हती हे आम्ही सर्व चांगले ओळखू शकतो.
अशा लोकांना आध्यात्मिक खेदाला तोंड द्यावे लागते. ज्या लोकांना प्रामाणिकता आणि लैंगिक नैतिकतेची अगदी किंचितशी काचकूच असते अशांसोबत व्यापारात तसेच मित्र म्हणून मजेत सांयकाळ घालविण्यात वेळ घालविणे हे कोणालाही घातक परिणामांना बळी पाडते. अशा परिणामांना तोंड देणाऱ्या ख्रिस्तीजनांना मोठा लढा द्यावा लागतो व अनेकदा आपल्या सद्सद्विवेक बुद्धीशी झगडावे लागते. यामुळे काही ओघाओघाने त्यांच्या मित्रमंडळासारखे बनतात व विश्वासापासून दूर बहकतात. (१ करिंथकर १५:३३) जे अशा आध्यात्मिक व नैतिक अधोगतीला निरविते त्या सांपत्तिक यशाचा काय लाभ? येशूने देखील हेच म्हटले होतेः “मनुष्य सर्व जग मिळवील आणि आपला जीव गमावील तर त्याला काय लाभ होईल?”—मत्तय १६:२६.
अधिक चांगल्या प्रकारातील यश
अनुभवाने हे सिद्ध केले आहे की, पवित्र शास्त्राचा हा सल्ला पाळणे हे सूज्ञतेचे आहेः “या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर . . . देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा” तिचे अनुकारी असल्याचे स्वतःला शाबीत करा. “जगावर व जगातील गोष्टींवर प्रीती करु नका. जर कोणी जगावर प्रीती करतो तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.” होय, आम्ही जगाचे अनुकरण केले नाही व ते जे काही देऊ करते त्याजसाठी अति उत्सुक झालो नाही तर सूज्ञ आहोत. देवाची मर्जी लाभावी हे आमचे प्रमुख ध्येय असावे. हे ध्येय जगातील गोष्टीच्या मागे लागल्यामुळे साध्य होऊ शकत नाही.—रोमकर १२:२; १ योहान २:१५, १६.
याबद्दलचा एक दृष्टांत सांगताना येशूने एका शेतकऱ्याचे उदाहरण दिले जो, आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवून होता पण याला देवाने म्हटलेः “अरे मूर्खा, आज रात्रीच तुझा जीव मागितला जाईल तेव्हा जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल?” या दृष्टांताचा शेवट करण्यात येशूने म्हटलेः “जो कोणी आपणासाठी धनसंचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे.” येशू हे स्पष्ट करीत होता की, “कोणाला पुष्कळ संपत्ती असली तरी ती त्याचे जीवन होते असे नाही.”—लूक १२:१५-२१.
हीच गोष्ट अधिक स्पष्टपणे समजावण्यात येशूने एका श्रीमंत तरुण अधिपतीचे उदाहरण उपयोगात आणले. हा इसम ऐहिक अर्थाने खूप यशस्वी होता; याला नैतिकदृष्ट्या सदाचारी राहण्याची इच्छा होती. तरीपण, येशूने त्याला यशप्राप्तीचा नमुना म्हणून उंचावले नाही. उलटपक्षी, येशूने म्हटले की, अशा लोकांना “देवाच्या राज्यात प्रवेश करणे” फार कठीण आहे. अशा परिस्थितीतील बहुतेक लोक धनाचा लोभ त्यागून आपल्या जीवनात देवराज्याच्या मागे लागण्याला प्रमुख ध्येय बनविण्यास तयार नसतात.—लूक १८:१८-३०.
आध्यात्मिक आस्थेला प्राधान्य देण्यावर जोर देण्यात येशू पुढे म्हणालाः “काय खावे, काय प्यावे व काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवावयास राष्ट्रे खटपट करतात. या सर्वाची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील.” याप्रकारे आमच्या जरुरीच्या गोष्टीत देखील कशाला प्रथमस्थान असावे हे निश्चयाने ठरविले पाहिजे. आम्हाला खरीच यशप्राप्ती मिळवावीशी वाटते, सौख्यता व अस्सल समाधान प्राप्त व्हावेसे वाटते तर जडवादापेक्षा आध्यात्मिक गोष्टींनी पुढे येणे आवश्यक आहे.—मत्तय ६:३१-३३.
आध्यात्मिक यशस्वीता संपादीत राहा
यास्तव, देवाचे राज्य व त्याची धार्मिकता ही मिळविण्यातच खरे यश मिळवणे आहे. यात पवित्र शास्त्राचा अभ्यास करणे समाविष्ट आहे की ज्यायोगे आम्ही स्वतः “देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे.” त्याची इच्छा ही आहे की, तुम्ही आपल्या जीवनात त्याच्या सेवेला प्रथम स्थान द्यावे, ख्रिस्ती उपाध्यपणात पूर्ण सहभाग घ्यावा, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यात हयगय करु नये आणि देवाकडील नीतीमत्वतेच्या अनुरोधातील नैतिक पवित्र जीवन व्यतित करीत राहावे. हेच, येशूने त्या श्रीमंत अधिकाऱ्याला जो उपदेश केला त्यातील सारांश होता. तो म्हणालाः “तुझे जे काही आहे ते विकून दरिद्र्यांस वाटून दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. चल, माझ्या मागे ये.”—रोमकर १२:२; लूक १८:२२.
हे सर्व करीत राहण्यात तुम्ही तुमची स्वतःची तशीच आपल्या कुटुंबाची आध्यात्मिकता वाढवाल. मनात गर्विष्ठता वाढविण्यापेक्षा तसेच अनिश्चित धनावर आशा ठेऊन असणारे बनण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला “जे सत्कर्माविषयी धनवान . . . (व) जे खरे जीवन ते मिळविण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असे साठवण आपणासाठी” करणाऱ्या लोकांत असलेले पहाल. होय, तुमचे ध्येय पुनर्स्थापित नंदनवनमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन असू शकते, कारण हे “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” यापेक्षा अधिक यशस्वीता तुम्हाला कधीच मिळवता येणार नाही.—१ तीमथ्य ६:१७-१९; १ योहान २:१७.
[५ पानांवरील चित्रं]
पैसा हा गुरुकिल्ली आहे का?
[७ पानांवरील चित्रं]
उच्चस्तरीय शिक्षण प्राप्त करुन यशाचा मागोवा घेण्यासाठी पालक आपल्या मुलांना परदेशी पाठवितील का?