वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 २/१ पृ. ३-४
  • पवित्र शास्त्र कोणी लिहिले?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पवित्र शास्त्र कोणी लिहिले?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “पवित्र आत्म्याने प्रेरित”—कसे?
  • देवाने मानवांना लिहिण्यास उपयोगात आणले
  • “पवित्र आत्म्याने प्रेरित” झालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • बायबल देवाने कसे प्रेरित केले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • बायबल अद्वितीय पुस्तक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 २/१ पृ. ३-४

पवित्र शास्त्र कोणी लिहिले?

“पवित्र शास्त्र विसंगत गोष्टींनी भरले आहे,” असा टीकाकारांचा दावा आहे. “शिवाय ते मानवी तत्वज्ञान सामावून आहे. तर मग कोण पवित्र शास्त्र हे जीवनासाठी भरवसापूर्ण मार्गदर्शक असे कसे स्विकारू शकतो?”

मानवी विचारसरणीचे वैगुण्य व्यक्‍त करणाऱ्‍या पुस्तकाहून पवित्र शास्त्र अधिक असे नाही या टीकात्मक दृष्टीकोणाचा तुम्ही पुरस्कार करता का? काही धर्मगुरु करतात. दिवंगत स्वीस प्रॉटेस्टंट वेदांती कार्ल बार्थ यांनी त्यांच्या किर्चलीच्‌ डॉगमॅटीक (चर्च मतप्रणाली) मध्ये लिहिलेः “संदेष्टे व प्रेषित बोलण्यात व लिहिण्यात चुका करणारे असे होते.” खरे, एकाच घटनेचा वृत्तांत एकापेक्षा अधिक पवित्र शास्त्र लेखकांनी देताना शब्दातील भिन्‍नत्व सापडू शकते. वरकरणी पाहिल्यास काही विधाने पवित्र शास्त्रात इतर ठिकाणी मिळणाऱ्‍या विधानांच्या विसंगतीमध्ये दिसू शकतात. परंतु ह्‍यात खरोखरी विसंगती आहेत का? पवित्र शास्त्र केवळ मानवी निर्मिती आहे का? वस्तुतः पवित्र शास्त्र कोणी लिहिले?

याचे उत्तर सोपे आहेः “देवापासून माणसे बोलली.” परंतु यांना काय बोलावे व काय लिहावे हे कसे कळले होते? आत्ताच अवतरीत केलेला मनुष्य प्रेषित शिमोन पेत्र स्पष्टीकरण करतो की, ते “पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन” बोलले.—२ पेत्र १:२१.

वास्तविकपणे पवित्र शास्त्र वारंवार, ते “देवाचा शब्द” असल्याचे ठासून सांगते. केवळ स्तोत्रसंहिता ११९ च्या १७६ कवनात हा मुद्दा १७६ वेळा ध्वनित करण्यात आला आहे! साधारणपणे, कोणतेही लेखक विशिष्ट लिखाण त्यांनी लिहिले हे ज्ञात करून देण्यात आस्थेवाईक असतात. परंतु पवित्र शास्त्राचे लिखाण करणारी माणसे तशी नव्हती हे याचे वैशिष्ट्य आहे. सर्व श्रेय देवास देणे होते. ते त्यांचे नव्हे तर त्याचे पुस्तक होते.—१ थेस्सलनीकाकर २:१३; २ शमुवेल २३:२.

“पवित्र आत्म्याने प्रेरित”—कसे?

या मनुष्यांना “पवित्र आत्म्याने प्रेरित” कसे करण्यात आले? पहिल्या शतकातील ख्रिश्‍चन तीमथ्यास लिहिलेले पत्र त्याचे उत्तर पुरवितेः “सर्व शास्त्रवचने इश्‍वरप्रेरित आहेत.” “इश्‍वरप्रेरित” हा शब्दप्रयोग पवित्र शास्त्राच्या ज्या मूळ ग्रीक शब्दापासून भाषांतरीत झाला त्या थि.ओ’नु.स्टोस पासून आहे, ज्याचा शब्दशः अर्थ, “देवाने श्‍वास दिला” असा आहे. देवाने त्याची अदृश्‍य कार्यकारी शक्‍ती—त्याचा पवित्र आत्मा—याचा उपयोग, त्याचे विचार लेखकांच्या मनात “ध्वनिक्षेपित” करण्यास केला. अशाप्रकारे यहोवा देव पवित्र शास्त्राचा स्त्रोत व निर्माता आहे. कोणी व्यावसायिक मनुष्य त्याच्यासाठी पत्र लिहिण्यास सचिवाचा उपयोग करतो त्याप्रमाणे देवाच्या विचारांनी लिखाणास मार्गदर्शन दिले.—२ तीमथ्य ३—१६.

तसेच, “देव निर्मित” ही कल्पना पवित्र शास्त्र वाक्य प्रयोग “पवित्र आत्म्याने प्रेरित” याजसोबत मिळतीजुळती आहे. ती कशी? “प्रेरणेने” हे ग्रीक भाषेत वाऱ्‍याच्या सहाय्याने चालणाऱ्‍या होडीच्या संदर्भाने उपयोगात आणला. (प्रे. कृत्ये २७:१५, १७ पडताळा.) वारे वाहू लागतात आणि शिडाच्या बोटी चालू लागतात त्याचप्रमाणे पवित्र शास्त्र लेखकांचे विचार, बोलणे व लिहिणे देवाच्या मार्गदर्शनाखाली होते जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने ते त्यांच्यावर ‘क्षेपित’ केले.

देवाने मानवांना लिहिण्यास उपयोगात आणले

आम्हाजवळ पवित्र शास्त्र लेखकांचे थोडके आत्मचरित्र आहे. स्वतःस अति महत्वपूर्ण समजण्यापेक्षा त्यांनी नेहमीच स्वतःस पडद्याआड राखून देवास सन्मान दिला. आम्हास ठाऊक आहे की, त्यात शासकीय अधिकारी, न्यायाधीश, संदेष्टे, राजे, मेंढपाळ, शेतकरी व मासेमारी करणारे असे सुमारे ४० जण समाविष्ट होते. अशाप्रकारे, पवित्र शास्त्र देवापासूनचा संदेश असला तरी त्यात उबदारपणा, विविधता व मानवास आर्जविणारे आहे.

पवित्र शास्त्र लेखकांपैकी कित्येकास दुसऱ्‍यांची ओळख नव्हती. ते भिन्‍न शतकात व स्वभाव व अनुभवात तसेच सामाजिक व शैक्षणिक पार्श्‍वभूमीत फारच वेगळे होते. तथापि, ते तरूण किंवा वृद्ध असोत, त्यांचे लिखाण पूर्ण ऐक्य दाखविते. त्यांनी आपले लिखाण १,६०० पेक्षा अधिक वर्षांच्या कालावधीत केले व शेवटी हे पुस्तक पूर्ण झाले. काळजीपूर्वक परिक्षणानंतर तुम्हाला हे आढळून येईल की पवित्र शास्त्र विधाने अप्रतिम सुसंगतपणा प्रवर्तित करतात. अशाप्रकारे, पवित्र शास्त्रासाठी कित्येक लेखकांचा वापर झाला तरीही ते एकाच ग्रंथकर्त्याचा पडसाद देते.

या गोष्टीने आम्हाला, पवित्र शास्त्र या असाधारण पुस्तकाकडे “वाजवीपेक्षा अधिक लक्ष” देण्यास चालना देऊ नये का? पेत्राने काढलेल्या त्या निष्कर्षापर्यंत आम्हालाही येता येणे शक्य होणार नाही का, ज्याने असे म्हटले की, “अधिक असे निश्‍चित असे संदेष्ट्यांचे वचन आम्हाजवळ आहे, ते काळोख्या रात्री प्रकाशणाऱ्‍या दिव्याप्रमाणे आहे, त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष देण्यास होईल तितके करा”?—इब्रीकर २:१; २ पेत्र १:१९, द न्यू इंग्लिश बायबल.

पण आता पवित्र शास्त्र विसंगत आहे या दाव्याबद्दल काय? ते तसे आहे का? तुम्ही कसे उत्तर द्याल?

[४ पानावरील चौकट]

केवढा हा महान ग्रंथ! त्यातील लिखाणापेक्षा त्याची वक्‍तव्याची रीत मला मोठी अचंबीत करते. येथे शब्द झाड, फुल, समुद्र, तारे, आणि मानव स्वतः यासारखे अगदी स्वाभाविक वाटतात. ते फुलतात, वाहतात, चमकतात, हसतात, का आणि कसे ते कळत नसले तरी सारे काही अगदी स्वाभाविक वाटते. होय, हे पुस्तक, मानवी ज्ञानाची साक्ष देणाऱ्‍या इतर सर्व पुस्तकांच्या भिन्‍नतेत, खरेच देवाचे वचन आहे.”—१९ व्या शतकातील जर्मन कवी आणि पत्रकार हेनरिच हेईन्स यांनी पवित्र शास्त्राविषयी दिलेले अभिप्राय.

[४ पानांवरील चित्रं]

वारा होड्यांना पुढे नेतो त्याप्रमाणे पवित्र शास्त्र लेखकांना ‘देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा