“असत्य जिव्हेने मिळविलेले धन . . . वाफेसारखे आहे”
आजच्या काळात लबाड्या, फसवणूक हे प्रकार चालण्याजोगे समजले जातात व यांचा व्यावसायिक माध्यमात देखील उपयोग होतो. हेच पवित्र शास्त्र काळीही खरे होते. स्तोत्रकर्त्या आसाफाने, ठकबाजीने ‘धनसंचय करणाऱ्यां’ विषयी लिहीले. आपल्या दगलबाजीने मिळविलेल्या धनाद्वारे हे लोक “सर्वदा स्वस्थ” आहेत असे वाटत होते.—स्तोत्रसंहिता ७३:८, १२.
तथापि, आज ख्रिश्चनांनी ‘अनीतीने पैसा मिळविणे’ व अप्रामाणिक व फसव्या व्यावसायिक पद्धतींचे आचरण टाळले पाहिजे. (१ पेत्र ५:२) यासाठीच नीतीसूत्रे २१:६ ही ताकीद देते: “असत्य जिव्हेने मिळविलेले धन इकडेतिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे. मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलवितात.” होय, लबाडी व अफरातफरीने मिळविलेले “धन” “वाफेसारखे” क्षणिक ठरते. “दुष्टाईने मिळविलेली संपत्ति [अधिक काळासाठी] हितकर [ठरत] नाही.” (नीतीसूत्रे १०:२) खरेच, लबाडखोर आपल्या मरणप्राय मार्गाद्वारे “मृत्युच्या मागे” लागत असतो. त्याची लबाडी त्याच्यावर उलटते तेव्हा त्याचे जीवन अकालीच संपते. (पडताळा एस्तेर ७:१०.) अशा लोकांचे जीवन लवकरात लवकर म्हणजे देवाच्या न्यायदंडाच्या दिवशी संपुष्टात येईल.