वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ५/१ पृ. ८-९
  • निकदेमास शिक्षण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निकदेमास शिक्षण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मिळती जुळती माहिती
  • निकदेमास शिक्षण
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • निकदेम याच्याकडून धडा घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • पक्का निश्‍चय करा
    लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ५/१ पृ. ८-९

येशूचे जीवन व उपाध्यपण

निकदेमास शिक्षण

इ. स. ३०च्या वल्हांडण सणाला उपस्थित असताना येशू उल्लेखनीय चिन्हे करतो. आणि याच्या परिणामात पुष्कळ लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. सन्हेद्रीन हा यहुदी उच्च न्यायलयाचा अधिकारी, परूश्‍यांपैकीचा एक निकदेम याकरवी उत्तेजित होतो व आणखीन माहिती करून घेण्याची त्याची इच्छा होते. याकारणास्तव तो एका अंधारी रात्री येशूला भेटावयास जातो; उजेडात आपल्याला कोणी पाहिलेच तर इतर यहुदी अधिकाऱ्‍यांत असणारी आपली ख्याति बदनाम होईल याचे भय त्याला वाटले असावे.

“गुरुजी” तो म्हणतो: “आपण देवापासून आलेले शिक्षक आहां हे आम्हास ठाऊक आहे कारण जी चिन्हे आपण करिता ती देव त्याच्या बरोबर असल्यावाचून कोणाच्याने करवणार नाहीत.” त्याच्या उत्तरात येशू निकदेमास सांगतो: “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”

मग एखाद्यास नव्याने जन्म कसा घेता येईल? “त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्‍याने जाववेल व जन्म घेववेल काय?” असे निकदेम विचारतो.

नाही, नव्याने जन्मणे याचा असा अर्थ नाही. येशू त्याची स्पष्टता देताना म्हणतो: “पाण्याने व आत्म्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही.” येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्याच्यावर पवित्रआत्मा उतरला होता. आणि तेव्हा तो “पाण्याने आणि आत्म्याने” जन्मला. शिवाय त्या सोबत जी आकाशवाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे याजवर मी संतुष्ट आहे,” त्याकरवी देवाने हे जाहीर केले की त्याने त्याच्या आत्मिक पुत्राला सामोरे आणले आहे व त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येईल. त्यानंतर इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी इतर बाप्तिस्मा झालेले पवित्र आत्मा पावले व अशाप्रकारे देवाची आत्मिक मुले म्हणून नव्याने जन्मले.

पण देवाच्या खास मानवी पुत्राची भूमिका महत्वाची आहे. “जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला,” येशू निकदेमास म्हणतो, “तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले जाईल यासाठी की जो कोणी विश्‍वास ठेवितो त्याला त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” होय, ज्या इस्राएलांना विषारी सर्पानी दंश केला होता त्यांनी तांब्याच्या सर्पाला पाहिल्याने त्यांचे जीवन बचावले होते त्याप्रमाणे सर्व मानवांना त्यांच्या मरणप्राय स्थितीतून वाचण्यासाठी देवाच्या पुत्रावर विश्‍वास राखण्याची गरज आहे.

याबद्दलच्या यहोवाच्या प्रेमळ उद्देशावर जोर देऊन येशू निकदेमास सांगतो: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याजवर विश्‍वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” अशाप्रकारे, त्याच्या सेवेला सुरुवात करून केवळ सहा महिन्यातच येथे यरूशलेमात येशूने हे स्पष्ट केले की मानवजातीचा बचाव करण्यामध्ये तो यहोवा देवाकडिल साधन असा आहे. योहान २:२३–३:२१; मत्तय ३:१६, १७; प्रे.कृत्ये २:१–४; गणना २१:९.

◆ निकदेमाला भेट घेण्याची इच्छा कशी निर्माण झाली, आणि तो रात्रीच का आला होता?

◆ “नव्याने जन्मणे” याचा अर्थ काय होतो?

◆ आमच्या तारणाकरिता येशूची भूमिका त्याने कशी स्पष्ट केली?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा