वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w86 ७/१ पृ. ३-४
  • शांति व निर्भयता—एक आशा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांति व निर्भयता—एक आशा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • मिळती जुळती माहिती
  • शांती व निर्भयता—कोणत्या उगमा कडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • विफल प्रयत्नांची ५० वर्षे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • शांतता व निर्भयता—देवाच्या राज्याकडून
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • देवाकडील शांती केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
w86 ७/१ पृ. ३-४

शांति व निर्भयता—एक आशा

“संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या जनरल ॲसेंब्लीने १९८६ हे अंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष असे एकमताने जाहीर केले. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या ४०व्यावर्धापन दिनी २४ ऑक्टोबर १९८५ला हे वर्ष निश्‍चयाने जाहीर केले जाईल.”

संयुक्‍त राष्ट्र संघाच्या या अधीकृत निवेदनाबद्दल तुमचा दृष्टीकोन काय आहे? ते तुम्हास भवितव्याबाबत अधीक आत्मविश्‍वासू वाटू देते का? पुष्कळ म्हणतील कोणतीही गोष्ट शांतीकरता दूर्मिळ संधी प्रदान करील तेव्हा प्रयत्नशील असणे बहुमोलाचे आहे. मग “आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष” तसे का असू नये?

खात्रीने असे “शांतीचे वर्ष” हे संयुक्‍त राष्ट्र संघाच्या संस्थापकांच्या उद्देशास अनुसरुन आहे. मागे १९४४ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी घोषित केले होते: “यासाठी आम्ही निश्‍चय केला आहे . . . शांतीप्रीय राष्ट्रांना एकत्र करून ज्यामुळे ते अनेकाचे सदीच्छा ऐैक्याच्या उद्देशाद्वारा व ऐैक्याचे सामर्थ्य अशा ठिकाणी असेल जे खात्री देईल की कोणीही चढाई करणारा किंवा जिंकण्यास सुरुवात करणारा नसेल. यास्तव अगदी युद्धाच्या सुरवातीपासूनच, आमच्या लष्कर योजनांचे साम्य राखण्यासाठी, आम्ही शांती व निर्भयता राखण्यासाठी एका सर्वसाधारण संस्थेचा पाया रोवण्यास सुरुवात केली आहे”

ह्‍या मनोराज्यात पुष्कळजण समाविष्ठ होते. “संयुक्‍त राष्ट्रसंघ अस्तित्वात येण्यासाठी मानवाच्या चांगुलतेच्या योग्यतेवर व त्याच्या आशांचे समर्थन केले जात आहे असे विश्‍वास ठेवणाऱ्‍या महामूर व्यक्‍तींच्या गटाची गरज होती,” असे शर्ले हाझर्ड्‌ ज्यांनी दशकभर राष्ट्रसंघाच्या सचिव मंडळात काम केले त्यांनी त्यांच्या डिफीट ऑफ ॲन आयडीयल या पुस्तकात म्हटले आहे.

नूतन जन्म पावलेल्या संस्थेच्या सनदेत तिच्या संस्थापकाचा विश्‍वास व्यक्‍त केला: “संयुक्‍त राष्ट्रसंघाचा उद्देश: १. आंतरराष्ट्रीय शांती व निर्भयता राखणे . . . २. समानहक्क वा स्वराज्य व्यवस्थेच्या तत्वाच्या आधारावर राष्ट्राराष्ट्रामधील मित्रत्व वाढविणे . . . ३. आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करणे.” अशा उद्दीष्टामध्ये अयोग्य असे कांही आहे का?

संयुक्‍त राष्ट्रसंघाने परिणामकारक सुरवात केली होती हे कबुल करावे लागेल. महत्वाचे जागतिक प्रश्‍न चर्चीले गले होते. १९४८ मध्ये उल्लेखनिय असा सार्वत्रिक मावनीहक्काचा जाहीरनामा जोडला गेला. दारिद्‌य्र, भूक, आजार कमी करणे व निर्वासीतासाठी आश्रयस्थान या मोलवान मानव–हितकारक कार्याची सुरूवात झाली होती. आंतराष्ट्रीय स्थरावर सुरक्षीत जहाज व विमान वाहतूक, कांही विभागातील प्रवाशांच्यासाठी आरोग्य पत्रके, टपाल दरांचे समान स्वरूप व आकाशवाणी ध्वनिक्षेपन या बाबत अंतराळातील योजनाविषयींची नियमावली स्थापली गेली.

१९४७–४९ मधील हिंदुस्तान–पाकीस्तानच्या विवादात शांती प्रस्थापणेच्या प्रयत्नात संयुक्‍त राष्ट्रसंघ घनिष्टपणे अंतर्भूत होता. त्याच्या झेंड्याखालील लष्कर १९५० मध्ये कोरिया व १९६० मध्ये कांगो (सध्या झायेर) येथे पाठविले तेव्हा त्याने आपले लष्करी बळ दाखविले. अजूनही युनोचे शांती–रक्षक सैन्य सायप्रस व मध्यपूर्वेत आहे. होय, गत ४० वर्षात संयुक्‍त राष्ट्रसंघाने त्याच्या लक्ष्याकडे वाटचाल केली. १५० पेक्षा अधीक राष्ट्रांनी त्याचे प्रतिनिधी त्याच्या न्यूयॉर्क शहरातील इस्ट नदीच्या काठावरील भिन्‍नत्वदर्शक मुख्यालयाकडे पाठवून संघाला मान्यता दर्शविली.

परंतु संयुक्‍त राष्ट्रसंघ त्याने राखलेले मूळ उद्दीष्ठ, आंतरराष्ट्रीय शांती व निर्भयता याप्रत कोठवर पोहंचला? घोषित केलेले आंतरराष्ट्रीय “शांतीचे वर्ष” काय परिणाम दाखविणार?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा