या पुस्तिकेचा वापर कसा कराल?
पुस्तिकेत प्रत्येक दिवसासाठी एक शास्त्रवचन आणि त्याबद्दलची थोडी माहिती दिली आहे. तुम्ही हे दिवसभरात कधीही वाचू शकता. पण अनेकांनी अनुभवलं आहे, की दिवसाच्या सुरुवातीला जर याचं वाचन केलं तर जास्त फायदा होतो. कारण त्यामुळे ते दिवसभरात त्यावर विचार करू शकतात. दररोज कुटुंबासोबत मिळून याचं वाचन केल्यामुळे तर आणखीनच फायदा होतो. जगभरातली बेथेल कुटुंबं, सकाळी नाष्ट्याच्या वेळी यावर चर्चा करतात.
प्रत्येक दिवसाची माहिती कुठून घेतली आहे, हे त्या माहितीच्या शेवटी दिलंय. उदाहरणार्थ, “टेहळणी बुरूज२४.०४ २ ¶१, ३” हे कशाला सूचित करतं ते खाली दाखवण्यात आलंय. कोणत्याही दिवसाच्या विषयाबद्दल जास्त माहिती हवी असेल, तर तुम्ही तो लेख वाचू शकता.
टेहळणी बुरूज२४ |
टेहळणी बुरूज अंकाचं वर्ष (२०२४) |
०४ |
टेहळणी बुरूज अंकाचा महिना (एप्रिल) |
२ |
माहिती ज्या पानावर (पानांवर) आहे त्याचा आकडा |
¶१, ३ |
माहिती ज्या परिच्छेदातून घेण्यात आली आहे त्या परिच्छेदाचा (परिच्छेदांचे) आकडा |