वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg पृ. २-३
  • नियमन मंडळाकडून पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियमन मंडळाकडून पत्र
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • मिळती जुळती माहिती
  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • धैर्य धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • ‘खंबीर व्हा व हिंमत धरा!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • खंबीर व्हा यहोवा तुमच्यासोबत आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg पृ. २-३

नियमन मंडळाकडून पत्र

छापील आवृत्ती

प्रिय भाऊबहिणींनो,

येशूने स्मुर्णा मंडळीला असं म्हटलं होतं: “तुला लवकरच जी दुःखं सहन करावी लागणार आहेत त्यांची भीती बाळगू नकोस.” (प्रकटी. २:१०) त्या मंडळीला दिलेला हा संदेश आज “प्रभूच्या दिवसात” राहणाऱ्‍या आपल्या सगळ्यांसाठीही महत्त्वाचा आहे. (प्रकटी. १:१०) सध्याचा हा काळ खरंच “खूप कठीण” आहे. आणि या काळात तुमच्या सगळ्यांच्याच विश्‍वासाची आणि धैर्याची परीक्षा होत आहे. पण या परीक्षांचा तुम्ही किती निडरपणे सामना करत आहात आणि यहोवाला किती एकनिष्ठ राहत आहात हे पाहून आम्हाला खरंच खूप प्रोत्साहन मिळतं!—२ तीम. ३:१-५.

बायबल काळातला एक माणूस एका ओसाड प्रदेशातून चालला आहे.

पण भीतीमुळे ‘माघार न घेता’ आपण विश्‍वासात खंबीर कसं राहू शकतो? (इब्री १०:३९) येणाऱ्‍या काळात विश्‍वासात खंबीर राहणं नेहमीच सोपं नसेल. कारण आपल्याला विरोधाचा, इतकंच काय तर छळाचाही सामना करावा लागू शकतो. आपण स्वभावाने लाजाळू असू किंवा धाडसी, एक गोष्ट आपण करू शकतो. ती म्हणजे, धैर्याने यहोवाची बाजू घेऊन आपण योग्य ते करायची निवड नक्कीच करू शकतो. पण हे करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

यासाठी देवाचं वचन आपल्याला मदत करू शकतं. त्यात धैर्य दाखवलेल्या बऱ्‍याच स्त्री-पुरुषांची उदाहरणं आहेत. तुम्हाला त्यांच्या उदाहरणाचं जवळून परीक्षण करता यावं आणि त्यावर मनन करता यावं म्हणून हे पुस्तक तयार करण्यात आलंय. त्यामुळे बायबलमधल्या या उदाहरणांचा अभ्यास करताना तुम्ही सध्या कोणत्या समस्यांचा सामना करत आहात किंवा भविष्यात तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो यांचा विचार करा. तसंच, यहोवा तुम्हाला धैर्य दाखवायला कशी मदत करू शकतो याचाही विचार करा. आणि शेवटी, या विश्‍वासू स्त्री-पुरुषांनी दाखवलेलं धैर्य तुम्हाला पुढे दिलेल्या परिस्थितींमध्ये कसं बळ देऊ शकतं याचासुद्धा विचार करा:

बदल करायची गरज पडते तेव्हा. (याको. ३:१७) योनाथानचा विचार करा. त्याला कदाचित वाटलं असले, की आपले वडील शौल यांच्यानंतर आपणच इस्राएलचा राजा बनू. पण यहोवाने दावीदला राजा म्हणून निवडलं. दावीद योनाथानपेक्षा वयाने खूप लहान होता. पण योनाथानने यहोवाचा हा निर्णय स्वीकारला. तो खरंच यहोवाला एकनिष्ठ होता आणि त्याने निवडलेल्या राजाला धैर्याने साथ दिली.

काहीही झालं तरी योग्य ते करायची गरज असते तेव्हा. (इब्री ११:३२-३४) हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या धगधगत्या आगीच्या भट्टीत मृत्यू सहन करायला तयार होते. पण मूर्तीची उपासना करून ते कोणत्याही बाबतीत आपल्या विश्‍वासाशी तडजोड करायला तयार नव्हते.

धैर्याने आपल्या विश्‍वासाबद्दल बोलायची गरज असते तेव्हा. (मत्त. २२:१६) तार्सच्या शौलचा विचार करा. यहुद्यांना असं वाटत होतं, की येशूच्या शिष्यांचा छळ करण्यात शौल त्यांना साथ देईल. पण उलट शौल त्यांनाच येशूबद्दल साक्ष देत होता.

या पुस्तकामुळे तुमचा विश्‍वास आणि धैर्य आणखी वाढो हीच आमची प्रार्थना आहे! (स्तो. २७:१४) देवाच्या राज्याला धैर्याने पाठिंबा देण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लोकांना आणि मंडळीतल्या भाऊबहिणींना मदत करत असताना यहोवा तुम्हाला भरपूर आशीर्वाद देवो!

तुमचे भाऊ,

यहोवाच्या साक्षीदारांचं नियमन मंडळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा