वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lff धडा २९
  • मेल्यानंतर आपलं काय होतं?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मेल्यानंतर आपलं काय होतं?
  • कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आणखी जाणून घेऊ या
  • थोडक्यात
  • हेसुद्धा पाहा
  • मृत कोठे आहेत?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • मेलेल्या लोकांसाठी काय आशा आहे?
    देवाकडून आनंदाची बातमी!
  • मेल्यावर आपण कुठे जातो?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
अधिक माहिती पाहा
कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
lff धडा २९
धडा २९. एक जोडपं कबरीजवळ उभं राहून प्रार्थना करत आहे.

धडा २९

मेल्यानंतर आपलं काय होतं?

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

तुम्ही कधी तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्‍तीला गमावलंय का? त्या दुःखाच्या क्षणी तुमच्या मनात असे विचार आले असतील: ‘मेल्यावर माणसाचं काय होत असेल? आपल्या या प्रिय व्यक्‍तीला पुन्हा कधी भेटता येईल का?’ बायबलमध्ये या प्रश्‍नांची, मनाला सांत्वन देणारी उत्तरं आहेत. त्यांबद्दल आपण या आणि पुढच्या धड्यात पाहणार आहोत.

१. मेल्यानंतर आपलं काय होतं?

येशूने मृत्यूची तुलना गाढ झोपेशी केली. गाढ झोप लागल्यावर आजूबाजूला काय होतंय, हे आपल्याला कळत नाही. मग मृत्यू गाढ झोपेसारखा आहे असं आपण का म्हणू शकतो? कारण एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याला कोणतीच वेदना जाणवत नाही, कसलाच त्रास होत नाही. बायबल सांगतं, की “मेलेल्यांना . . . काहीच माहीत नसतं.”—उपदेशक ९:५ वाचा.

२. मृत्यूबद्दलचं सत्य कळल्यावर आपल्याला कसा फायदा होतो?

बऱ्‍याच लोकांना मृत्यूची भीती वाटते आणि काहींना मेलेल्या लोकांचीसुद्धा भीती वाटते. पण बायबलमध्ये मृत्यूबद्दल जे सांगितलंय ते समजल्यावर तुम्हाला खूप दिलासा मिळेल. येशूने म्हटलं: “सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल.” (योहान ८:३२) काही धर्मांत असं शिकवलं जातं की माणसांमध्ये एक अमर आत्मा असतो आणि माणूस मेल्यानंतरही तो आत्मा जिवंत राहतो. पण बायबल असं शिकवत नाही. ते सांगतं की मेल्यानंतर माणसाचं काहीच उरत नाही. त्याचं अस्तित्व संपतं. त्यामुळे मेल्यानंतर त्याला कोणतंही दुःख किंवा कोणत्याही वेदना जाणवत नाहीत. तसंच, मेलेल्या लोकांना काहीच कळत नसल्यामुळे ते आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्या शांतीसाठी कोणताही विधी करायची किंवा त्यांची उपासना करायची गरज नसते. शिवाय त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यातही काही अर्थ नाही.

काही लोक म्हणतात की ते मेलेल्या लोकांशी बोलू शकतात. पण हे कसं शक्य आहे? कारण आपण आताच पाहिलं की ‘मेलेल्यांना काहीच माहीत नसतं.’ मग ज्या लोकांना असं वाटतं की ते आपल्या मेलेल्या प्रिय व्यक्‍तीशी बोलत आहेत, ते खरंतर कोणाशी बोलत असतात? कदाचित असं होऊ शकतं, की ते दुष्ट स्वर्गदूतांशी बोलत आहेत, जे मेलेल्या लोकांचं सोंग घेतात. पण जेव्हा आपल्याला मृत्यूबद्दलचं सत्य कळतं, तेव्हा आपण दुष्ट स्वर्गदूतांपासून सुरक्षित राहतो. दुष्ट स्वर्गदूतांशी संपर्क केल्यामुळे आपलं नुकसान होईल हे यहोवाला माहीत आहे. म्हणूनच तो आपल्याला सांगतो, की आपण मेलेल्या लोकांशी बोलायचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न करू नये.—अनुवाद १८:१०-१२ वाचा.

आणखी जाणून घेऊ या

मृत्यूबद्दल बायबल काय शिकवतं याविषयी जास्त माहिती घ्या. आणि आपल्या प्रेमळ देवावर तुमचा विश्‍वास मजबूत करा, जो मेलेल्या लोकांना कधीही यातना देत नाही.

पत्नीच्या अंत्यविधीच्या वेळी एक माणूस आपल्या दोन मुलांसोबत बाकावर बसला आहे. कुटुंबातले सदस्य आणि मित्र त्यांना सांत्वन आणि दिलासा देण्यासाठी एकत्र जमले आहेत.

३. मेल्यानंतर काय होतं याबद्दलचं सत्य

मेल्यानंतर माणसाचं काय होतं याबद्दल जगभरात लोकांचे वेगवेगळे विश्‍वास आहेत. पण साहजिकच हे सगळेच विश्‍वास खरे असू शकत नाहीत.

  • मेल्यानंतर माणसाचं काय होतं याबद्दल तुमच्या भागातले लोक काय मानतात?

बायबल याबद्दल काय शिकवतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

व्हिडिओ: मृत लोकांची काय अवस्था आहे?—निवडक भाग  (१:१९)

चित्रं: ‘मृत लोकांची काय अवस्था आहे?—निवडक भाग’ या व्हिडिओमधली दृश्‍यं. १. हॉस्पिटलच्या बेडवर असलेला मृतदेह. २. ट्रेनने प्रवास करताना दोन जणांच्या मधे बसलेल्या एका माणसाला झोप लागली आहे.

उपदेशक ३:२० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • या वचनात सांगितल्याप्रमाणे मेल्यानंतर माणसाचं काय होतं?

  • काही लोक म्हणतात त्याप्रमाणे मेल्यानंतर माणसाचा काही अंश जिवंत राहतो का? या वचनातून काय समजतं?

बायबलमध्ये आपल्याला लाजर याच्या मृत्यूबद्दल वाचायला मिळतं. तो येशूचा एक जवळचा मित्र होता. येशूने त्याच्या स्थितीबद्दल काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी योहान ११:११-१४ वाचा. मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • येशूने मृत्यूची तुलना कशाशी केली?

  • येशूने जी तुलना केली त्यावरून आपल्याला मेलेल्या लोकांच्या स्थितीबद्दल काय कळतं?

  • मृत्यूबद्दल बायबलमध्ये जे सांगितलंय ते तुम्हाला पटलं का?

४. मृत्यूबद्दलचं सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला फायदा होतो

मृत्यूबद्दलचं सत्य माहीत झाल्यामुळे आपल्याला मेलेल्या लोकांची भीती वाटत नाही. उपदेशक ९:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • मेलेले लोक आपलं काही नुकसान करू शकतात का?

काही लोकांना वाटतं की मेलेल्या लोकांच्या शांतीसाठी आपण वेगवेगळे विधी केले पाहिजेत किंवा पूजाअर्चा केली पाहिजे. पण बायबलमधली सत्यं जाणून घेतल्यामुळे आपण अशा चुकीच्या समजुतींना बळी पडत नाही. यशया ८:१९ आणि प्रकटीकरण ४:११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण जर मेलेल्या व्यक्‍तीची उपासना केली किंवा तिच्याकडे मदत मागितली, तर यहोवाला कसं वाटेल? तुम्हाला काय वाटतं?

चित्रं: पितरांच्या उपासनेशी संबंधित काही प्रथा. १. एक माणूस कबरीसमोर बसून प्रार्थना करत आहे आणि नैवेद्य दाखवत आहे. २. आदिवासी जमातीतली तीन माणसं विशिष्ट प्रकारचे कपडे घालून नाचत आहेत. ३. मृतांचा दिवस साजरा करण्यासाठी काही जण कवट्यांचे मुखवटे घालून आणि सापळ्यांची प्रतिकृती हातात घेऊन मिरवणूक काढत आहेत.

मृत्यूबद्दलचं सत्य माहीत झाल्यामुळे आपण यहोवाला न आवडणाऱ्‍या प्रथांना बळी पडणार नाही

५. मृत्यूबद्दलच्या सत्यामुळे सांत्वन मिळतं

पुष्कळ लोकांना असं शिकवलं जातं, की मेल्यानंतर माणसाला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. पण बायबलमध्ये जे सांगितलंय त्यामुळे आपल्याला सांत्वन मिळतं. त्यात सांगितलंय की कोणालाही, अगदी वाईट कामं करणाऱ्‍या माणसालाही मेल्यानंतर यातना सहन कराव्या लागत नाहीत. रोमकर ६:७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण आत्ताच बायबलमध्ये वाचलं की एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा तो त्याच्या पापापासून निर्दोष ठरतो किंवा मुक्‍त होतो. तर मग मेलेले लोक कर्मांची फळं भोगत आहेत असं म्हणता येईल का?

आपण जितकं जास्त यहोवाला जाणून घेतो, तितकंच जास्त आपल्याला समजू लागतं की तो मेलेल्या लोकांना कधीच यातना देऊ शकत नाही. अनुवाद ३२:४ आणि १ योहान ४:८ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • या वचनांत जे सांगितलंय त्यावरून तुम्हाला वाटतं का, की यहोवा कधी मेलेल्या लोकांना यातना देईल?

  • मृत्यूबद्दलचं सत्य जाणून घेतल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळाला का? तुम्ही असं का म्हणता?

काही जण म्हणतात: “मला तर मरणाच्या विचारानेच भीती वाटते.”

  • तुम्ही त्यांना सांत्वन देण्यासाठी बायबलमधली कोणती वचनं दाखवाल?

थोडक्यात

एखादी व्यक्‍ती मरते तेव्हा तिचं अस्तित्व संपतं. तसंच, मेलेल्या लोकांना कोणताही त्रास सहन करावा लागत नाही, आणि ते आपल्याला काहीच नुकसान पोहचवू शकत नाही.

उजळणी

  • मेल्यानंतर आपलं काय होतं?

  • मृत्यूबद्दलचं सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो?

  • मृत्यूबद्दलचं सत्य जाणून घेतल्यामुळे आपल्याला सांत्वन कसं मिळतं?

ध्येय

हेसुद्धा पाहा

मृत्यूनंतरही माणसाचा काही अंश अस्तित्वात राहतो का, याबद्दल बायबल काय म्हणतं ते पाहा.

“क्या आत्मा जैसी कोई चीज़ है जो मौत के बाद भी ज़िंदा रहती है?” (वेबसाईटवरचा लेख)

देव दुष्ट लोकांना नरकात शिक्षा देतो का, हे जाणून घ्या.

नरक हे खरंच यातनेचं ठिकाण आहे का?  (३:०७)

मेल्यानंतर काय होतं हे कळल्यावर एका माणसाला दिलासा कसा मिळाला ते जाणून घ्या.

“बायबलमधली स्पष्ट आणि पटण्यासारखी उत्तरं मला खूप आवडली” (ऑनलाईन लेख)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा