संमेलनातून पुढील प्रश्नांची उत्तरं मिळतील:
१. सगळ्यात मोठी आज्ञा कोणती, आणि ती इतकी महत्त्वाची का आहे? (मत्त. २२:३७, ३८; मार्क १२:३०)
२. जगावर प्रेम करण्याचं आपण यशस्वीपणे कसं टाळू शकतो? (१ योहा. २:१५-१७)
३. आपण इतरांना यहोवाच्या नावावर प्रेम करण्यास कसं शिकवू शकतो? (यश. ५६:६, ७)
४. आपण खरं बंधुप्रेम कसं दाखवू शकतो? (१ योहा. ४:२१)
५. आईवडील आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला कसं शिकवू शकतात? (अनु. ६:४-९)
६. यहोवा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे, हे तुम्ही कसं दाखवून देऊ शकता? (१ योहा. ५:३)
७. आपण यहोवासाठी आपलं प्रेम कसं यशस्वीपणे टिकवून ठेवू शकतो किंवा पुन्हा वाढवू शकतो? (प्रकटी. २:४, ५)